चांदण्यांच्या सहवासात

मालविका's picture
मालविका in जे न देखे रवी...
12 Jan 2022 - 8:29 am

वाटते जरा रमावे चांदण्यांच्या सहवासात
गुपित एकेक उलगडावे चांदण्यांच्या सहवासात
हात तुझा हातात घ्यावा चांदण्यांच्या सहवासात
हलकेच विसावे मिठीत तुझ्या चांदण्यांच्या सहवासात
स्पर्शानेच बोलावे चांदण्यांच्या सहवासात
श्वासात मिसळावा श्वास चांदण्यांच्या सहवासात
तारे सारे निरखावे चांदण्यांच्या सहवासात
स्वप्ने असंख्य पहावी चांदण्यांच्या सहवासात
गाणे नवे म्हणावे चांदण्यांच्या सहवासात
लाटा त्या मोजव्या चांदण्यांच्या सहवासात
गोष्टी किती कराव्या चांदण्यांच्या सहवासात
सुरताल असा जुळवा चांदण्यांच्या सहवासात
मेहफिल अशी सजावी चांदण्यांच्या सहवासात
स्मृती जपून ठेवावी चांदण्यांच्या सहवासात

कविता

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

12 Jan 2022 - 11:31 pm | प्रसाद गोडबोले

का?

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 Jan 2022 - 1:56 pm | ज्ञानोबाचे पैजार

चांदण्यांच्या सहवासात आले की असे होणारच

फारच प्रभावी व्यक्तीमत्व आहे आपल्या चांदणे पैलवानांचे

पैजारबुवा,

तुषार काळभोर's picture

13 Jan 2022 - 2:16 pm | तुषार काळभोर

फुलटॉस आहे.
(चांदण्यांच्या सहवासात ) च्या प्रतिक्षेत!

चांदणे संदीप's picture

13 Jan 2022 - 7:05 pm | चांदणे संदीप

चांदण्या... म्हणजे अनेकवचनी शब्दप्रयोग नसल्याने मी त्यात नाही. ;)

(चांदण्यांचा) संदीप

प्रसाद गोडबोले's picture

13 Jan 2022 - 11:34 pm | प्रसाद गोडबोले

चांदण्या

ते मुक्तछंदी अर्थात कसलेच नियम फियम न पाळणारे काव्य आहे . त्यांनी चांदण्या हे अनेकवचनी वापरले नसुन "अरे ए चांदण्या " अशा अर्थाने एकारार्थी संबोधन म्हणुन वापरले असावे असा अर्थ काढण्यास वाव आहे !

=))))

प्रसाद गोडबोले's picture

13 Jan 2022 - 11:36 pm | प्रसाद गोडबोले

किंव्वा तुमचे अजुन कोणी आडनाव बंधु , २ किंव्वा जास्त , त्यांना एकत्र भेटले असावेत अन त्यांच्या सहवासात त्यांनी ही अनेकवचनी कविता लिहिली असावी असेही म्हणता येईल ;)

संजय पाटिल's picture

14 Jan 2022 - 11:33 am | संजय पाटिल

हा बहुवचनी नसून, आदरार्थि असावे....