तमिझ्(तमिळ)शिकण्यासाठी

Primary tabs

उपयोजक's picture
उपयोजक in जनातलं, मनातलं
22 Feb 2017 - 8:32 pm

तमिझ्(तमिळ)ही जगातल्या सर्वात प्रसिध्द अशा भाषांपैकी एक! सर्वात शुध्द द्रविड भाषा! म्हणूनच अन्य भारतीय भाषांच्या तुलनेत थोडीशी अवघड!
कामानिमित्य,प्रवासानिमित्य किंवा एक वेगळी भाषा म्हणून म्हणा,किंवा तमिळ चित्रपट,तमिळ संस्कृती यांची आवड,कुतुहल म्हणून म्हणा 'तमिळ' शिकावीशी वाटते.

अशा तमिळ शिकणार्‍यांसाठी एक WhatsApp समुह सुरु करत आहोत.

पुस्तके,टिव्ही,इंटरनेट याद्वारे तमिळ शिकणारे काहीजण इथे एकत्र येत आहेत.प्रत्येकाची याबाबत प्रगती निरनिराळी! कोणी बालवाडीत,कोणी पहिलीत तर कोणाची त्याहून अधिक!
पण तमिळ शिकण्याची इच्छा हाच समान धागा!
आमच्या सारखेच आणि कोणी धडपडे तमिळ भाषाप्रेमी जर इथे असतील तसंच ही भाषा कोणाला बोलता,लिहिता येत असेल तर त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळावं ही अपेक्षा आहे.

तमिळ शिकण्यासाठी WhatsApp का? मिपावरच का नको?

खरंतर इथेच याबाबतचा धागा सुरु करायला आवडलं असतं,पण काही अमराठी,मराठी जेमतेम मराठी जाणणारे तमिळप्रेमी मित्रही आहेत,येतील.काही इतरही कारणं,मर्यादा आहेत.

तरीही जर बर्‍यापैकी मागणी झाली तर मिपावरही या विषयाचा धागा सुरु करता येईल.

ज्यांना या समुहात सामील व्हायचं असेल त्यांनी व्यनि करुन आपला WhatsApp नं कळवावा.

इतर मार्गदर्शक सूचनांचं स्वागत आहेच!

संस्कृतीकलाइतिहासभाषाव्युत्पत्तीसमाजजीवनमानप्रवासभूगोलराहती जागानोकरीशिक्षणप्रकटनविचारअनुभवशिफारससल्लामाहितीसंदर्भमदत

प्रतिक्रिया

कैलासवासी सोन्याबापु's picture

22 Feb 2017 - 8:40 pm | कैलासवासी सोन्याबापु

व्हाट्सऍप मध्ये रस नाही, इथे धागा आला तर थोडी मदत होईल शिकायला, अर्थात धागा मिपाच्या धोरणात बसला तर.

Nitin Palkar's picture

22 Feb 2017 - 8:53 pm | Nitin Palkar

नक्की आवडेल!
मराठी शिवाय कोणतीही भाषा (मुंबईत बोलली जाणारी सोडून) येत नसल्याची खंत आहेच. कार्यालयीन गरजेमुळे हिंदी, इंग्लीश थोडी तरी समजते, बोलता येते, गुजराथी सहकार्यांमुळे जराशी गुजराथी कळते; पण इतर भारतीय भाषा शिकायला (whats app वर देखील) नक्की आवडेल.

उपयोजक's picture

22 Feb 2017 - 8:58 pm | उपयोजक

नं व्यनि करु शकता!

व्हाट्सऍप मध्ये रस नाही, इथे धागा आला तर थोडी मदत होईल शिकायला,

+१ किंवा फेसबूक पेज तयार करा.

पिलीयन रायडर's picture

22 Feb 2017 - 9:02 pm | पिलीयन रायडर

मागे एकदा लोकंनी वेड्यासारखे स्वतःचे नंबर इथे दिले होते. तसं करु नका फक्त.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला की त्याची लिंक देता येते लोकांना. ती लिंक इथे द्या. ज्याला व्हायचंय जॉइन तो त्या लिंकचा वापर करुन येऊ शक्तो ग्रुपमध्ये.

ग्रुप इन्फो मध्ये ही लिंक मिळेल.

उपयोजक's picture

22 Feb 2017 - 9:19 pm | उपयोजक

मग ही लिंक गावभर फिरते! जे या बाबतीत सिरियस असतील ते ठिकच! पण इथे लिंक दिली की हस्ते परहस्ते कुठे,कोणा टाईमपास करणा्र्‍याकडे जाईल याचा नेम नाही.
मग मूळ विषय सोडून सुरु
गुडमॉर्निंग,गुडनाईट,हा मेसेज आठ ग्रुपमधे पाठवा आणि मिळवा फुकट डेटा!,एक दिवा माझ्या दारी एक. . . .

काही विचारु नका!

सदस्य कमी असले तरी चालतील पण अवांतर पोस्टींग करणारे नसावेत.

पिलीयन रायडर's picture

22 Feb 2017 - 9:25 pm | पिलीयन रायडर

पण मग त्यांना काढुन टाका ना. तुम्ही घेतलेले सदस्यही हे करु शकतातच.

असो हा तुमचा प्रश्न आहे. मी आपली जस्ट माहिती दिली.

संदीप डांगे's picture

22 Feb 2017 - 9:35 pm | संदीप डांगे

सदस्य कमी असले तरी चालतील पण अवांतर पोस्टींग करणारे नसावेत.

Rahul D's picture

22 Feb 2017 - 10:06 pm | Rahul D

अाण्णा भा पो...

वेशीवरचा म्हसोबा's picture

22 Feb 2017 - 11:00 pm | वेशीवरचा म्हसोबा

मला तेलुगू शिकायची आहे. त्याचा व्हाट्सप ग्रुप बनवाल का तुम्ही?

उपयोजक's picture

22 Feb 2017 - 11:18 pm | उपयोजक

तमिळ आली कि तेलुगु सोपी जाईल.

वेशीवरचा म्हसोबा's picture

22 Feb 2017 - 11:22 pm | वेशीवरचा म्हसोबा

कशावरुन? हे म्हणण्यासाठी तुम्हाला तेलुगू आणि तमिळ या दोन्ही भाषांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तुम्हाला ते आहे का?

उपयोजक's picture

23 Feb 2017 - 6:14 am | उपयोजक

तमिळ ही मूळ द्रविड भाषा आहे.त्यामुळे तेलुगु,मल्याळम् यांमध्ये तमिळ शब्दांची संख्या भरपूर आहे.याचा तेलुगू शिकण्यासाठी उपयोग होईल.

समर्पक's picture

22 Feb 2017 - 11:42 pm | समर्पक

तेलुगू तशी संस्कृतच्या अधिक जवळ वाटते... क्रियापदे अगदीच वेगळी पण. ती तशी तामीळीच्याही जवळ नाहीत. फार अवांतर वाटत नसेल तर थोडे तेलगू चर्चेत आणू शकतो तामिळ बरोबर, थोडा तौलनिक अभ्यास... थोडी अवगत आहे मला, 'चकल्या-कडबोळी-जिलब्या' असलेली लिपी लिहायला फार मजेशीर वाटते :-) జిలబ్యా లిహాయలా ఫార్ మజెషిర్ వాటతె!

समर्पक's picture

22 Feb 2017 - 11:42 pm | समर्पक

तेलुगू तशी संस्कृतच्या अधिक जवळ वाटते... क्रियापदे अगदीच वेगळी पण. ती तशी तामीळीच्याही जवळ नाहीत. फार अवांतर वाटत नसेल तर थोडे तेलगू चर्चेत आणू शकतो तामिळ बरोबर, थोडा तौलनिक अभ्यास... थोडी अवगत आहे मला, 'चकल्या-कडबोळी-जिलब्या' असलेली लिपी लिहायला फार मजेशीर वाटते :-) జిలబ్యా లిహాయలా ఫార్ మజెషిర్ వాటతె!

सानझरी's picture

24 Feb 2017 - 6:31 pm | सानझरी

लोल!!
.

समर्पक's picture

23 Feb 2017 - 12:01 am | समर्पक

देवनागरीत लिहून शिकायचे का तमिऴ लिहा वाचायलाही शिकायचे आधी?
काही अक्षरे आपल्याला नव्याने प्रचलित करावी लागतील मग. उदाहरणार्थ, ल ळ पेक्षा वेगळा ऴ

उपयोजक's picture

23 Feb 2017 - 6:04 am | उपयोजक

सुरुवात देवनागरीपासूनच करावी.तमिळ लिपी सर्वांनाच वाचता येईल असं नाही.नंतर हळूहळू अक्षर अोळख,छोटी छोटी वाक्ये असं करु.

कौशी's picture

23 Feb 2017 - 1:46 am | कौशी

शिकायला आवडेल.

उपयोजक's picture

23 Feb 2017 - 6:11 am | उपयोजक

उद्या उपक्रमाला सुरुवात होईल.

स्वामी संकेतानंद's picture

23 Feb 2017 - 7:59 pm | स्वामी संकेतानंद

उत्तम! इथेच सुरू करा.
मी फार वर्षांपूर्वी काही खास तमिळ वर्णांना देवनागरी पर्याय म्हणून नुक्ता वापरणे सुरू केले होते, अजूनही तसेच करतो. ऴ, ऩ, ऱ असे zh -- ऴ

उपयोजक's picture

23 Feb 2017 - 9:03 pm | उपयोजक

समीर २० यांना,
आपण दिलेला मोबाईल क्रमांक ९ अंकी आहे.

अनिंद्य's picture

24 Feb 2017 - 12:45 pm | अनिंद्य

तमिळनाडुशी प्रेमाचे ऋणानुबंध आहेत, काही तमिळ मित्रांशी घरोबा आहे पण भाषा मात्र शिकता आली नाही. इथेच शिकवणी सुरु करा, सामील व्हायला आवडेल.

तेलगू येतं कोंचम कोंचम, पण लिपी नाही येत.

वरुण मोहिते's picture

24 Feb 2017 - 6:46 pm | वरुण मोहिते

पण बाकीच्या राज्यात मराठी येत नाही शिकूया.. धडपड करत असा कोणता ग्रुप आहे का ?मराठी साहित्य छान आहे ते वाचायला शिकूया किंवा मराठी बोलता आलं पाहिजे असं कोणी आहे का?

छे!! तुम्हाला माहीत नाही का? मराठी ही गडी नोकरांची भाषा आहे. ती कशाला कोणी शिकावी?

उपयोजक's picture

24 Feb 2017 - 8:41 pm | उपयोजक

समुह सुरु झाला आहे.
तमिळ जराही येत नाही असं समजूनच शिकवायला सुरुवात केली आहे.
रच्याकने,तमिळ शिकतानाची काही उपयुक्त माहिती इथे नक्की सामायिक करेन!

इन्द्र's picture

24 Feb 2017 - 10:06 pm | इन्द्र

pl add me for tamil learning...8889744418.
indra

बॅटमॅन's picture

25 Feb 2017 - 2:10 am | बॅटमॅन

तमिळ शिकण्यासाठीचे दोन महत्त्वाचे दुवे.

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने तमिळ शिकण्यासाठीचे पुस्तक काढलेले आहे "तमिळ भाषा प्रवेश" या नावाने.

https://msblc.maharashtra.gov.in/pdf/pdf/Tamil%20Bhasha%20Pravesh_marath...

यूट्यूबवर तमिळ व्हर्च्युअल अ‍ॅकॅडमी नामक चॅनल असून त्यांनी ८१ व्हिडिओज़ बनवलेले आहेत. शिकवण्याचे माध्यम आहे इंग्रजी आणि अगदी बाराखडीपासून सुरुवात आहे.

https://www.youtube.com/playlist?list=PL41DA461A06758121

तेव्हा हे दोन रिसोर्सेस वापरा, आणि त्यापुढे मग तमिळ पिच्चर इ. पहा, तमिळ भाषकांशी तमिळमध्ये बोला की काम झालेच म्हणून समजा. साधारणपणे वर्ष दीड वर्ष लागेल बर्‍यापैकी फ्लुएंट व्हायला. व्यक्तिपरत्वे अर्थातच हा कालखंड कमीजास्त होईल.

उपयोजक's picture

26 Feb 2017 - 9:24 am | उपयोजक

हे पुस्तक शिवाय अजुनही या विषयावरची पुस्तके आहेत.फक्त ज्यांना अजिबातच तमिळ येत नाही त्यांना एकदम एवढा अभ्यास कदाचित सोयीचा पडणार नाही.त्यामुळे सध्या हळुहळू प्रगती चालू आहे.

आपण सामील झालात तर आणखी मार्गदर्शन मिळेल.
बाकी तमिळ चित्रपटांच्या वेडाने तमिळ शिकणारे खुप जण आहेत.

व्हिडिओ लिंकबद्दल खरंच धन्यवाद!

संदीप डांगे's picture

26 Feb 2017 - 11:55 pm | संदीप डांगे

ज्यांना अजिबातच तमिळ येत नाही त्यांच्यासाठीच बॅटमॅनने दुवे दिधलेत हो! अगदी बाराखडीपासून शिकवतात..

आता बाराखडीच्याही आधीचं काही शिकायचं असेल तर व्हॉट्सप गृपशिवाय पर्याय नाही हे मात्र खरं हां!

सूड's picture

27 Feb 2017 - 4:23 pm | सूड

तुम्ही मेंबर आहात?

संदीप डांगे's picture

27 Feb 2017 - 4:52 pm | संदीप डांगे

कशाचे म्हणे?

तमीळ शिकवणार्‍या ग्रूपाचे?

संदीप डांगे's picture

27 Feb 2017 - 6:52 pm | संदीप डांगे

आम्हास शिकायास कोण्या गृपची गरज नै बॉ... युनिफॉर्म पहनो और जो क्लास अच्छा लगे उसमें बैठ जाओ!

बॅट्याभाऊने दिलेल्या लिन्का उत्तम आहेत. दोन एपिसोड झाले... अ, आ, इ, मस्त शिकवतेत ते काका...

बॅट्यास अल्लग धन्यवाद!

उपयोजक's picture

28 Feb 2017 - 7:02 pm | उपयोजक

मागे मी विद्युत उपकरणांसंबंधीच्या WhatsApp ग्रुपबद्दल लिहिलं होतं त्यालाही भरपुर विरोध झाला.
जे काही लिहायचं ते इथं लिहा,WhatsApp कशाला असा सूर निघाला.याच विषयावर दोन धागेही निघाले.खरंतर ते चांगले माहितीपुर्ण धागे होते.पण धागे सुरु झाल्यानंतर जेमतेम आठवडाभरंच त्या धाग्यांवर आदानप्रदान झालं.अजूनपर्यंत कोणी तिकडे त्यानंतर परत फिरकलंच नाही.
अशा प्रकारे चांगले उपक्रम बंद पडू नयेत म्हणूनच WhatsApp ची मदत घ्यावी लागतेय.

इतरही तांत्रिक कारणं आहेत.बाकी WhatsApp वाल्यांना मिपाचे शत्रु समजणारेही काहीजण आहेत.असु द्यात.

संदीप डांगे's picture

28 Feb 2017 - 9:09 pm | संदीप डांगे

कसंय दादा! तुम्ही जे लिहिलंय ना वर त्यात एक पैशाचे लॉजिक सापडले नाही मला. व्हॉट्सप असो की मिपा, सदस्य जर काहीच अ‍ॅक्टीविटी करणार नसतील तर चर्चा थंडावतेच. तुम्ही जे वर म्हणताय तेच व्हॉट्सप गृपलाही लागू होतं.. २५० मेम्बरापैकी महिनाभर एकही मेम्बर बोलला नाही तर झुक्या येऊन तमिळ शिकवनार नाही तुम्हाला... किंवा ग्रुप आपोआप पॉप-अप नाही होत... अ‍ॅक्टीविटी लागतेच. त्यामुळे तुम्ही मिपावर तुमच्या धाग्याला प्रतिसाद न मिळण्याचे कारण देत आहात ते तकलादू आहे. इथेच सुरु असलेला व्यायामाचा धागा बघा... अजून काही जास्त बोलायची गरज नाहीये, तेवढे उदाहरण पुरेसे आहे.

व्हॉट्सपवाल्यांना शत्रु नाही समजत मी.. पण मिसळपावच्या आयत्या युझरबेसचा फुकाफुकी फायदा घेणे (किंवा झुक्याला होणे) नैतिकतेला धरुन नाही.

बाकी काही म्हणणं नाही.. चालुद्या!

मिपाच्या तांत्रिक मर्यादाही याला कारणीभुत आहेत.पण त्याबद्दल मिपाचे दोष काढणं योग्य होणार नाही.मोफत उपक्रम एवढा चालवणं सोपं नाही.
आयता युझरबेस म्हणता पण हा उपक्रम आहे.व्यवसाय नाही.नाहीतर यापुढे कुणीच इथे सल्ला हवा आहे,मार्गदर्शन हवं आहे,मदत हवी आहे असा धागा बनवून इथे येणार नाही.नाहितर परत त्यात कौन्सिलर,डॉक्टरकडे जाण्याचे पैसे वाचवायला बघतायत असं तुम्हाला वाटायचं!

संदीप डांगे's picture

28 Feb 2017 - 11:16 pm | संदीप डांगे

कॄपया भलतीकडे नेऊ नका.

मिसळपाववर येऊन सल्ला, मदत, मार्गदर्शन मागणारे वेगळा व्हॉट्सप गृप चालवत नाहीत. त्यांच्या समस्यांवर मिळणारे उपाय मिसळपाव ह्या संस्थळावर कायमस्वरुपी सर्वांसाठी खुले असतात. त्याच पद्धतीचे प्रश्न असणार्‍यांठी ते पुढे मागे कामात येते. खुला व सर्वकाळ उपलब्ध मंच असण्याचा तो एक फायदा आणि उद्देशही आहे. जो इथे प्रश्न मांडतो, तो एका अर्थाने संस्थळावर आपले योगदान देत असतो, त्याच्या प्रश्नाच्या अनुषंगाने इथल्या जाणकारांचे प्रतिसाद येऊन मिसळपाव वाचणार्‍या असंख्य वाचकांच्या ज्ञानात भर पडते, जीव समृद्ध होण्यात, उपाय सापडण्यात मदत मिळते. व्हॉट्सप वर क्लोज गृप चालवून हे सर्व होत नाही.

मोफत उपक्रम आहे म्हणून मिसळपावला गॄहित धरण्याची आवश्यकता नाही. तसेच मिपाच्या तांत्रिक समस्या अधोरेखित करुन मिपाला कमीपणा दाखवण्याचीही गरज नाही. व्हॉट्सप वर मेंब्रं मिळवायला शेवटी तुम्हाला इथेच धागा काढावा लागलाय हे लक्षात असू द्या. व्हॉट्सअपवरुन इथे लोक येत नाहीत. वेब अ‍ॅनॅलिटिक्स माहिती असेल तर ह्याचे महत्त्व किती ते कळेल.

हे सर्व तुम्हाला सांगतोय म्हणजे मी मालक समजत नाही स्वतःला मिपाचा, एक सामान्य सदस्यच आहे, पण मिपावर प्रेम करतो, मिपाचा फुकाफुकी लॉन्चपॅड म्हणुन वापर करणे मला पटत नाही.

तुमचं शेवटचं वाक्य पार वाईड बॉल आहे...

धन्यवाद!

उपयोजक's picture

28 Feb 2017 - 11:30 pm | उपयोजक

WhatsApp वरुन मिपावर लोक येत नाहीत हे कोणी सांगितलं?कितीतरी जणांना मिपाची माहिती मिपाकर असणा्र्‍या WhatsApp मेंबर्सकडून दिली जाते.मिपाचा सदस्य होण्याबद्दल सुचवलं जातं.त्यावेळी तो सुचवणारा मी का माझ्या ग्रुपवरुन मिपाची माहिती देऊ असा विचार करत नाही.

ग्रुपची मेबरं मिळवायला जसं मला इथं यायला लागलं तसंच आपल्या मिपावरच्या धाग्याची माहिती WhatsApp ग्रुपवरुन एखादा धागाकर्ता देतो तेव्हा ती जाहिरात होत नाही का?

संदीप डांगे's picture

1 Mar 2017 - 12:02 am | संदीप डांगे

आपल्या मिपावरच्या धाग्याची माहिती WhatsApp ग्रुपवरुन एखादा धागाकर्ता देतो तेव्हा ती जाहिरात होत नाही का?
>> ती त्या व्यक्तीच्या स्वतःच्या लिखाणाची जाहिरात होय...त्यात मिसळपावचा काय संबंध?

बाकी तुम्ही इरेला पेटलाच असाल, तर तुमचे योग्य आहे असे म्हणतो. तुमच्या व माझ्या दृष्टिकोनात मूलभूत फरक आहे. तेव्हा इथेच थांबतो. धन्यवाद!

तुमच्या वॉट्सपगृपला माझ्याकडून शुभेच्छा. तमिळ शिकून तमिळभाषेत एखादे संस्थळ चालवण्याइतके बळ आई जगदंबा तुम्हाला देवो! तुमचे अनेकोनेक व्हॉट्सगृप भरभरुन चालो... शुभम् भवतु!!

ब्याट्या कन्नड शिकायला काही आहे का?

पहिले >>महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने तमिळ शिकण्यासाठीचे पुस्तक काढलेले आहे "तमिळ भाषा प्रवेश" या नावाने.>> डाउनलोड केलेय. भारी आहे.

साधा मुलगा's picture

26 Feb 2017 - 12:21 pm | साधा मुलगा

जे व्हात्साप्प ग्रौप मध्ये नाहीत अथवा येऊ इच्छित नाहीत त्यांच्यासाठी हा धागा जागृत ठेवा , तुमचे रोजचे updates इथेही टाका.
उपक्रमास शुभेच्छा!

उपयोजक's picture

26 Feb 2017 - 8:12 pm | उपयोजक

जरुर.शंका किंवा अधिक माहिती हवी असेल तर तीही विचारेन.मार्गदर्शन हवंच आहे.

उपयोजक's picture

27 Feb 2017 - 9:09 am | उपयोजक

आज मराठी राजभाषा दिन,मराठी आणि तमिळचा संबंध कसा आहे?
मराठी आणि तमिळ भाषेत काही शब्द हे उच्चार व अर्थाच्या संबंधाने बर्‍यापैकी समान आहे.

अक्का - मोठी बहीण
अंडा - हंडा
अतै - आत्या
अप्पप्प - अबब
आत्ताडी - हात्तीच्या
इंगितम् - इंगित
इंदोलम् - हिंदोळा
इट्टीकै - वीट
इडर - इडा(पीडा)
इरावुत्तन् - राऊत
इरुत्तु - रुतणे
इवरदल् -वर्दळ
उश्शी - डोके
ऊरुळी - वर्तुळ(उरळीकांचन?)
ओडै - ओढा
कंकाळम् - घंगाळ
कस्सु - कसा,कंबर
कंजम् - गंज(भांडे)
कत्तरी - कात्री
कप्परै - खापर
करप्पु - काळा (करपणे)
कवळम् - घास
कवाडम् - दरवाजा
काय - कच्चे फळ(कायरस)
कालवाय - कालवा
कावाडी - कावड
किलुकिली - किलबिल
कुंची - डोके
कुडारी - कुर्‍हाड
केळवन् - मैत्री(केळवण)
कै- हात(कैवार)
कोट्टकै - गोठा
शाणम् - शेण
सीळकै - शीळ
शुंभन् - शुंभ
सुयमपाकी - स्वयंपाकी
सुरुळ - सुरळी करणे
सुवडु - चव(स्वाद)
तट्टी - दरवाजा(ताटी उघडा ज्ञानेश्वरा)
तट्टु - ताट
तुतुंबु - तुडुंब
तलै - डोके
दारै - धार(पाण्याची)
नाणल - गवत(नाणेघाट)
नविदन् - न्हावी(नाभिक)

अजुनही बरेच साम्यदर्शक शब्द आहेत.

आणखी काही शब्द सुचताहेत का?

मयुरेश फडके's picture

9 Apr 2017 - 6:05 am | मयुरेश फडके

मस्तय.
उश्शी म्हणजे डोकं. हायला आम्ही उश्शीवरती डोकं ठेवतो. :)

हिंदी-तमिळ (रॅपिडेक्स) उत्तम पुस्तक आहे. त्यातून तमिळ शिकल्यावर ओफिसमधल्या तमिळ अण्णांनी माझ्यासमोर आपसापात तमिळमध्ये ओफिस राजकारण बोलणे बंद केले.
मुख्य म्हणजे तमिळ लोकांना इतरांना त्यांची भाषा समजू लागलेलं आवडत नाही. तसा प्रकार गुजराती, कन्नड,बंगालीचा नाही. तुम्ही शिकताय म्हटलात तर ते आवर्जून त्या भाषेत बोलतील॥ हे सत्य आहे.

संदीप डांगे's picture

27 Feb 2017 - 10:38 pm | संदीप डांगे

विण्टरेस्टींग....