चका-या
'माझ्या मामाची रंगीत गाडी हो|
तीला खिल्लार बैलाची जोडी हो||
अशी कविता शाळेतल्या पुस्तकात होती.आजोळ
शहरात असल्याने मामाच्या घरी बैल,गाडी वगैरे नव्हते. आमच्या कडे गावी बैलगाड्या होत्या.पण रंगीत नव्हत्या.
साध्या होत्या.बैल खिल्लार नव्हते.साधे,गावरान होते.
आमच्या घरी कुठल्याही वस्तूचे असणे,चैनीसाठी
वा षौकासाठी नाही तर त्याची उपयुक्तता किती या निकषावर असे.बैल खिल्लार हवे,गाडी रंगीत हवी
असा आग्रह नसे.काम होण्याशी मतलब.