लक्ष्मणपूर, एक पडाव......२
https://www.misalpav.com/node/49710
लक्ष्मणपूर, एक पडाव
मीच लिहीलेला लेख आणी त्यावर मान्यवरांचे प्रतीसाद शांतपणे वाचताना वाटले की मी आपल्या सर्वांच्या बरौबर गप्पाच मारतोय. सर्वाचे धन्यवाद.
https://www.misalpav.com/node/49710
लक्ष्मणपूर, एक पडाव
मीच लिहीलेला लेख आणी त्यावर मान्यवरांचे प्रतीसाद शांतपणे वाचताना वाटले की मी आपल्या सर्वांच्या बरौबर गप्पाच मारतोय. सर्वाचे धन्यवाद.
मराठीच्या अंगणात
अठ्ठेचाळीस स्तंभांचा
स्वर-व्यंजनी महाल
माझ्या माय कवितेचा
नभापार पोचतसे
त्याची बेलाग ही उंची
रेलचेल महालात
जे न देखे रवि त्याची
महालात जाण्यासाठी
जिना जपल्या शब्दांचा
आणि उतरण्या साठी
सोपान हा गहनाचा
चुनेगच्ची सौधावर
नवरस पुष्करणी
पितो मन:पूत तेथे
अद्भुताचे निळे पाणी
परवलीची एकच
खूण इथे चालतसे
एका हृदयीचे दुज्या
सोपवावे लागे पिसे
तिघांनी तीन फोन वर गजर लावून ठेवले होते. 11 ला पोहोचून 12 वाजता साधारण आम्ही झोपलो. 2 वाजता गजराच्या आधीच जाग आली. आवरून, कपडे बदलून, परत सगळी तयारी करून निघालो. खाली पार्किंग मध्ये आलो तर आमच्या सोडून फक्त 3 अजून सायकल होत्या. बाकी सगळे जण आधीच गेले होते. आपल्याला उशीर झालाय की काय या जाणिवेने पोटात गोळा आला. त्यात फक्त 2 तासाच्या झोपेवर अजून 300 किमी अंतर कापायचं होतं. जाणवून जरा दडपण आलं. पण थोडाच वेळ. एकदा सायकलवर बसलो आणि सुसाट सुरू झालो.
400 ची BRM फारच उत्कृष्ट रित्या पार पडली होती. कोणालाही कोणताही त्रास झाला नाही. नाही म्हटलं तरी माझ्या पायाला मागच्या वेळी झालेली जखम सुखत चालली होती. पण जवळपास 24 तास पाय बुटात बंद असल्याने आणि घामाने जखम चिघळली थोडी. पायातला मोजा जखमेला थोडा चिकटला नि तो ओढून काढताना खपली निघाली. घरी येऊन परत डॉ कडे जाणं आलं.
एक स्वप्नपूर्ती - SR होण्याची भाग 3 (400 किमी)
कारण काढून भेटायाचे
किती दुरूनी आलेला तू!
लपवलेस तू मनातले तरी
किती बाभरा झालेला तू!
कळले मजला...
विचारसी तू देऊन हाती चित्रे काही
सापडते का यांच्यामधले लपले अक्षर?
इतके बोलून सहज उभा तू माझ्यामागे
आणि इथे मी चूर लाजुनी शोधीत उत्तर
कळले तुजला?
मधुभासांचे रिंगण पडले सभोवताली
गोंधळले मी तुझा गंध का होते अत्तर?
केसांवरती तव श्वासांची मोहक फुंकर
क्षणाक्षणाला वितळत होते मधले अंतर
कळले तुजला??
'माझ्या मामाची रंगीत गाडी हो|
तीला खिल्लार बैलाची जोडी हो||
अशी कविता शाळेतल्या पुस्तकात होती.आजोळ
शहरात असल्याने मामाच्या घरी बैल,गाडी वगैरे नव्हते. आमच्या कडे गावी बैलगाड्या होत्या.पण रंगीत नव्हत्या.
साध्या होत्या.बैल खिल्लार नव्हते.साधे,गावरान होते.
आमच्या घरी कुठल्याही वस्तूचे असणे,चैनीसाठी
वा षौकासाठी नाही तर त्याची उपयुक्तता किती या निकषावर असे.बैल खिल्लार हवे,गाडी रंगीत हवी
असा आग्रह नसे.काम होण्याशी मतलब.
३०० किमी करायचे ठरवले पण त्यासाठी रूट ठरेना. सावंतवाडी क्लब चा सावंतवाडी - राजापूर - सावंतवाडी असा रूट होता. तर नवी मुंबई कल्याण सायकलिस्ट या क्लब चा वाशी - महाड - वाशी असा रूट होता. सांगली आणि पुणे क्लब चे पण रूट चेक केले. शेवटी या दोन रूट पैकी कुठचा फायनल करायचा हे ठरत नव्हतं. खारेपाटण खूप दमवणारा होता त्यामुळे परत त्याच रूट वर जायला मन धजावत नव्हतं. पण तिकडचे रस्ते सगळे चकाचक होते. तर मुंबई गोवा हायवे रत्नागिरी पर्यंत प्रचंड खराब आहे याची माहिती होती. तरीही बरीच चौकशी केली.
एक स्वप्नपूर्ती - SR होण्याची भाग १ {२००किमी}
स्वप्न जागृतीची सीमा
अर्ध सत्य अर्धा भास
अलौकिकाच्पा कवेत
पडे वास्तवाचा फास
सीमेवर कल्लोळती
नाद रंगांचे सागर
अपूर्वाची अनुभूती
गंध, रस, स्पर्शापार
उंबरा हा अदृष्टाचा
असूनही नसण्याचा
नसलेल्या असण्याशी
उराउरी भेटण्याचा