वळण नसलेल्या वाटेवर
*वळण नसलेल्या सरळ वाटेवर*
जेंव्हा कोणीतरी खास भेटतं
मग सरळ रेषेतलं आयुष्य
नागमोडी होऊन जातं
वादळ आणी पाऊस
मग नित्याच होतं पण
वादळा पूर्वीची शांतता
सोसण मात्र असह्य होतं
सोसाट्याचा वारा ,गारांचा मारा
संतत श्रावणधार, रस्ता चिबं होतो
आणी हवाहवासा गारवा
वाटेवर पसरतो
भिजलेला रस्ता,दाटलेली हिरवळ
पुन्हा एकदा कुशीत येते
अन वाटेवरली मरगळ
त्वरीत निघून जाते
आसेच कुणीतरी
खास भेटावे
प्रत्येकाला वाटते
मग नागमोडी वाट
सुद्धा सरळ भासते
२७-६-२०२२