वाचु आनंदेे!

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
19 Oct 2022 - 6:28 pm

आज(१५ आक्टोबर) वाचन प्रेरणा दिन! या निमित्त्ताने राज्य मराठी विकास संस्था ने दोन दिवसीय चर्चा सत्र आयोजित केलं होत.

ते ऑनलाईन ऐकण्याची संधी मिळाली .पहिल्या दिवशी ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले,लेखक अच्युत गोडबोले,युवा लेखक प्रवीण सुखदेव आणि रोहन प्रकाशनाचे सर्वेसर्वा हजर होते.खूपच सुन्दर रंगलेल्या या चर्चासत्रात वाचन वसा याविषयी उत्तम चर्चा घडली.

दुसऱ्या दिवशी मनोरंजन क्षेत्रात काम करणारे कलाकार उपस्थित होते त्यात मनोरंजन क्षेत्रात वाचन या बाबत चर्चा घडली.
यातील काही मला लक्षात आलेले मुद्दे लिहिते.

सवडीने हे चर्चासत्र यु ट्यूबवर नक्की ऐका.
वाचन वसा

वाचू आनंदे!!

वाचाल तर वाचाल असेच का म्हणतात?ऐकाल तर जगाल इत्यादी का नाही?
-वाचन हे क्षणिक नाही ,त्याचा परिणाम मर्म,संवेदना जागृत करणारा आणि दीर्घ असतो.

-पुस्तकांच्या साहित्य आणि ज्ञानशाखा अशी विभागणी करता येईल.ज्ञानशाखेवर विपुल लेखन व्हायला हवे.
- शालेय वाचन ,मनोरंजनासाठे वाचन या वेगवेगळ्या संकल्पना असू शकतात
-वाचनाने इतिहास आणि भूगोल यात एकाच वेळी कोठेही वावरता येते.

-आर्थिक विषमतेमुळे वाचनाला सीमा येऊ नये.आर्थिक बरोबर समृध्द जीवन जगण्याकडे कल वाचनाने वाढवावा.
-सेल्फ हिलिंग साहित्याला देखील जनमान्यता मिळावी.
-नव्या पिढीतील लेखकांनी विशेषत: सोशल मिडीयावर लिहिणाऱ्या लेखकांनी दीर्घ,सात्याताने लेखन करावे.

-प्रकाशकांच्या दृष्टीनेसाहित्याची निवड ,मांडणी ,लिहिण्याची पद्धती,त्या पुस्तकाविषयी वलय कसे निर्माण होईल या गोष्टींचा पुस्तक प्रकाशना अगोदर विचार होतो.
-कलाकारांनी कला सादारीकारणा आधी याविषयक वाचन केल्यास नक्केच वेगळा परिणामकारक फरक जाणवतो.

-वाचन कसे करावे ?
१.एकाच लेखकाची जवळपास सर्व लागोपाठ पुस्तके वाचल्यास लेखालाचा लिहिण्यातील विकासही जाणवतो.त्यानुसार वाचकालाही वाचनाचा सुंदर अनुभव मिळू शकतो.
२.इतिहास विषयक पुस्तके वाचतांना अनेक लेखकांची एकाच ऐतिहासिक प्रसंगाबाबत पुस्तके वाचल्यास इतिहास विषयक वेगवेगळे दृष्टीकोन सहज समजतात.यातील जो दृष्टीकोन जवळच वाटतो त्याने आत्मशोध घेण्यास मदत होते.

.३.वाचनाने भाषिक विकास होतो. पुस्तकाच्या दुकानात पुस्तके चाळणे ,वाचनालयात जाणे ही संस्कृती आहे.

वाचन वाढवण्यासाठी आधुनिक उपाय –

१.रील्स-लेखकांविषयी त्यांच्या पुस्तकांविषयी रील्स करावेत जे जास्त पाहिले जातात.
२.पुस्तक लिहिलेल्या लेखकाबरोबर त्या पुस्तकाविषयी सहज गप्पा घडवून आणण्यासाठी पुस्तक विषय निगडीत सफर घडून आणता येईल.
३.सिनेमात किमान काही सीन नायक वा इतर कोणी पुस्तक वाचताना दाखवावे कारण सिनेमाचा आवाका अधिक आहे.
४.मुलांबरोबर ,मुलांना रोज किमान दहा मिनिटे पुस्तके वाचून दाखवावे.
५.पानांची किंमत वाढली आहे. त्यामुळे किंडल यासाधानांचा वापर वाढावा.

यातील सर्व विचार हे चर्चेतील सहभागी मान्यवरांचे आहेत.मी केवळ शब्दांकन केले आहे
-भक्ती
१५/१०/२०२२
#Repost

मुक्तकभाषा

प्रतिक्रिया

अनुस्वार's picture

19 Oct 2022 - 6:46 pm | अनुस्वार

नक्की ऐकेल.

कुमार१'s picture

19 Oct 2022 - 7:22 pm | कुमार१

शब्दांकन छान.