मुंबई लोकल मधील खरेदी
सध्या कोकणात वास्तव्य असल्याने मुंबईत काही कारणाशिवाय येणं होत नाही. सुरवातीला शिक्षणासाठी आणि मग नोकरीसाठी काही काळ मुंबई मध्ये असल्याने मुंबई लोकलची चांगली माहिती आहे. सेंट्रल, वेस्टर्न, हार्बर तिन्ही मार्गांवर तेव्हा भरपूर भटकून घेतलंय. त्यामुळे लोकलची सवय नसली तरी भीती मात्र नक्कीच नाही. हां पीक अवर्स ना मी जाण्याचं टाळते निश्चित. मुंबईला आल्यावर कधी वेळ आलीच लोकलने फिरायची तर मला खूप उत्सुकता असते. एक तर मी नेहमी स्लो लोकल पकडते. याआधीच्या अनुभवानुसार मी फास्ट लोकल पकडली कि ती सिग्नलला एवढा वेळ काढते कि स्लो पुढे निघून जाते.