आठवणीतला गणेशोत्सव
रात्रीचे साडेअकरा वाजले, आणि मी फोनाफोनी सुरू केली. पोलीस कंट्रोल, महापालिका, फायर ब्रिगेड, अन्य वर्तमानपत्रातल्या रात्रपाळीच्या रिपोर्टरांशीही फोनवर बोललो. नवी एडिशन काढावी लागेल असं काही फारसं घडलं नाहीये, याची खात्री करून घेतली, आणि मी आवराआवर केली. तो १९८९ सालातला गणेशचतुर्थीच्या आधीचा दिवस होता. चतुर्थीला सुट्टी होती. ‘उद्या अंक नाही’ अशी चौकट पेपरात ज्या मोजक्याच दिवशी छापली जाते, त्यापैकी हा एक दिवस! मी तयार होऊन थांबलो आणि काही वेळातच एक जाडजूड पिशवी खांद्यावर घेऊन सन्मित्र तानाजी कोलते Tanaji Kolte दाखल झाले. तानाजी तेव्हा माझा सीनियर सहकारी होता.