आधुनिक भारतातले सावकार
छगन तसा एक सरळमार्गी व्यावसायिक आहे. त्याचा धंद्याचे गणित एकदम साधे आहे, आपल्या कामामुळेच लोक आपला संदर्भ पुढे पाठवतात, त्यामुळे प्रत्येक काम जीव ओतून केले पाहिजे हा त्याचा भ्रम आहे. असेच एके दिवशी तो त्याच्या मित्राच्या ऑफिसमध्ये काही कामानिमित गेला असता त्याला तेथे मगन भेटतो. मगन त्याचा लहानपणीचा मित्र, दोघे एकाच शाळेत होते. १० वी नंतर छगन सायन्सला तर मगन कॉमर्सला गेल्याने त्या दोघांचा तसा काहीच संबंध नव्हता. मगन आता एक आर्थिक सल्लागार आहे.