गुढ वाट्याहून प्रेरित होऊन..
मोठ्या हौशीने
बरणी आणली
आधी पत्र्याचं
झाकण होतं
लोणचं घातलं
सतत तेलं खारं
संपर्कामुळे ते
झाकण गंजल...
मग खुप
शोधा शोध केली
बोरं आळी,गंज बाजार
त्याच मापाचं
प्लास्टिक झाकण
शोधून मिळवलं ..
आता लोणचं
नाही टाकलं
मुरांबा केलाय
आंबट गोड
वेलदोडे ,लवंग
स्वादाने भरलेला
बरणीत मुरांबा
आता चांगला
मुरलाय
बरणी आहे 'काचेची'
कर् करून नावं
कोरता येत नाही
मलमलच्या कपडा
तिच्या तोंडाशी
बांधते ओळख
म्हणून...
प्रतिक्रिया
22 Jun 2023 - 3:19 pm | प्रचेतस
बर्याच वेळा मुरांब्याच्या बरणीचं झाकण पिवळं लोणच्याच्या बरणीचं झाकण लाल असलेलं दिसतं.
23 Jun 2023 - 2:22 pm | Bhakti
तेच तर लाल निशाण्यापेक्षा पिवळ निशाण बांधलेल्या बरणीरुपी आयुष्यात मुरांबा घालीत जावा.
23 Jun 2023 - 6:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्तय. लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे