सारे रोजचे तरीही.....
हवे हवेसे वाटे
निशाचे ते जाणे
आणी उषाचे भेटणे
गवाक्षातून झाके
सोनसळी तिरीप
पुन्हा नव्याने येतो
जगण्या हुरूप
सारे रोजचे तरीही.....
पालवी फुटते
रात्रीच्या स्वप्नानां
अधिरते मन
कवेत घ्यायाला
गेले कालचे विरून
निराशेचे सुर
मन आभाळी आले
ढग आशेचे भरून
सारे रोजचे तरीही
हवे हवेसे वाटे......
दमून भागून
जीव झाला क्लांत
पुन्हा घरट्यात येतो
घ्याया विश्राम निवांत
सारे रोजचे तरीही
हवे हवेसे वाटे
निशाचे ते येणे.....
भगवंताचे देणे
चाले असाच चरितार्थ
सारे रोजचे तरीही.....
कट्ट्यावर येवून
साधावा परमार्थ.
१७-९-२०२२
पुणे कट्ट्यासाठी हार्दिक शुभेच्छा l
👍 .......... 🙂
प्रतिक्रिया
17 Sep 2022 - 9:00 am | कुमार१
सुंदर !
भेटूच....
17 Sep 2022 - 9:05 am | मुक्त विहारि
इथेच वृत्तांत आला तर उत्तम ....
17 Sep 2022 - 9:54 am | धनावडे
कोणी पोहचल आहे का?
17 Sep 2022 - 10:05 am | साहित्य संपादक
स्वसंपादित
17 Sep 2022 - 10:07 am | चौथा कोनाडा
खुप छानसुंदर !
सारे रोजचे तरीही
नवा प्रकाश प्रकाश
.. फिटे अंधाराचे जाळे
....झाले मोकळे आकाश "
या ओळी आठवल्या.
भेटूयात!
17 Sep 2022 - 10:47 am | कर्नलतपस्वी
सकाळीच ऐकताना सुचले.
17 Sep 2022 - 10:39 am | मुक्त विहारि
आता, इथेच वृत्तांत येऊ द्या
17 Sep 2022 - 10:52 am | ॲबसेंट माइंडेड ...
कवितेच्या धाग्यावर वृत्तांत नको. नवा धागा काढावा.
दिशाभुल करणार्या टायटलसाठी कवींचा निषेध.
👎
17 Sep 2022 - 3:39 pm | कर्नलतपस्वी
कवितेद्वारे कट्ट्यावर येण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न होता.
कट्टा संपन्न झाला ,वृतांत व सहभागी सदस्यांचे प्रतीसाद ,लवकरच छायाचित्रासह वेगळा धागा प्रकाशीत होणार आहे.
कट्टा आयोजित करण्यात पाभे यांनी पुढाकार घेतला व शक्य असलेल्या सदस्यांनी उत्स्फूर्त भाग घेतला या बद्दल सर्वांचे आभार.
17 Sep 2022 - 2:31 pm | पाषाणभेद
छान कविता आहे.
लिहीत रहा.
कट्टा आपल्या उपस्थितीत संपन्न झाला आहे.
17 Sep 2022 - 9:59 pm | बिपीन सुरेश सांगळे
लगे राहो कर्नलजी !