1

प्रकाशवाटा

Primary tabs

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
28 Jul 2022 - 12:14 pm

अमावस्येला आकाश काळ्या चादरीवर चांदण्यांचे बुट्टे लेवून असते. त्याचा सखा शशी आज दूर फिरायला गेलाय जणू! तेव्हा या आकाशाचे पृथ्वीच्या निजरातीशी हितगुज मनमोकळे होत असावे.
म्हणूनच का दिव्यांचे उत्सव त्या आकाशाचा एकाकीपणा घालवायला अमावस्येलाच असतात का?दीपअमावस्या ,दीपावली हे त्यातले उत्सव अग्नि तत्वाशी एकरूप!

मला जशी जाण आली तशी अनेक गोष्टी पंच तत्वाशी जोडायची सवयस जडली. दीपावलीला दिव्यांची रांग ओळ मांडताना ती संपूच असं वाटतं .सगळं जग लखलख उजळून निघताना मनातला अंधार नाहीसा होतो .तिथे एक दीप मंद तेवतो .

दीप अमावस्याचे तत्वही अग्नी! आधी त्या दिव्याला पितांबरी इतर अनेक गोष्टींनी घास घास घासून तो दिवा लख्ख दिसू पर्यंत चैनच पडत नाही. तेव्हा अनेक गोष्टी ज्या आत कुठेतरी मनाच्या, भावनांना तंतूत उगाच चिकटलेल्या आहेत त्याही याबरोबर निघून जाऊ पाहतात .नंतर तो स्वच्छ सुंदर दिवा सम ई पाहून प्रसन्न वाटते.तेल- तूप त्यात ओतताना तेल स्निग्धता देणारी माणसांनी असेच आयुष्य त्यांनी भरून जावे असे वाटते .कापसाच्या वातीचे वळण त्या तेलात सामावल्यावर मऊ होते माणसांची स्निगधता माझाही बिन कामाची सरळता एकरूप करावी असेच वाटते :).
वात प्रज्वलित होत असताना खाली वाहिलेले एक सुंदर फुल त्या अग्नी प्रकाशालाच सुगंधित भासवते.
त्या मंद मंद जळणाऱ्या दिव्या कडे पाहत त्याचे तेजोवलय पाहत आपल्याही भोवती एक सुंदर प्रकाश वलय कायमच असावा असेच वाटते.

त्या अग्नी तत्वाचे दिव्य अंश नेहमी आपल्या मार्गाला पुढे प्रकाशमान करत राहावं असंच वाटतं .
प्रकाशवाटा कायम लाभत राहो.
-भक्ती

मुक्तकआस्वाद

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

28 Jul 2022 - 12:59 pm | ज्ञानोबाचे पैजार

दवणीय आहे पण छान आहे
पैजारबुवा,

प्रचेतस's picture

28 Jul 2022 - 1:39 pm | प्रचेतस

छान लिहिलंय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jul 2022 - 10:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान लिहिले आहे.

-दिलीप बिरुटे

यश राज's picture

28 Jul 2022 - 2:50 pm | यश राज

आवडला लेख

Bhakti's picture

28 Jul 2022 - 4:07 pm | Bhakti

हम्म :)
पैजारबुवा जे सुचले ते लिहिले.
धन्यवाद पैजारबुवा,प्रचेतस,यश राज.

श्वेता व्यास's picture

28 Jul 2022 - 4:35 pm | श्वेता व्यास

छान लिहिले आहे.

सरिता बांदेकर's picture

28 Jul 2022 - 6:55 pm | सरिता बांदेकर

छान लिहीले आहे.

कर्नलतपस्वी's picture

28 Jul 2022 - 7:42 pm | कर्नलतपस्वी

आमच्या सारख्यांना दिव्याच्या आमावस्येची खरी जाणीव ज्यांनी दारात आणी घरात चिमण्या बघितल्या.
एक सुर्योदयाला चिवचिवायची तर दुसरी सुर्यास्त झाल्यावर टिमटीमायची.

विज,जनरेटर, इन्व्हर्टर च्या जमान्यात ज्यांनी जन्म घेतला त्याना काय त्याचे अप्रूप.

हेही खरंय,पण माझ्या सारख्या मनाने पुरातन (कर्मठ नव्हे :)) मुलींना अप्रुप वाटते 😊

श्वेता,सरिता ताई,कर्नलजी धन्यवाद!

श्रीगणेशा's picture

30 Jul 2022 - 8:27 am | श्रीगणेशा

छान ओघवतं लिहिलं आहे!

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

30 Jul 2022 - 9:58 pm | ॲबसेंट माइंडेड ...

छान.