वार्याची लहर
फडफडणारा पदर
उधळले रंग विभोर
चालत होते रानवट||
उषेचे स्मित ओठांवर
दवांची माळली धार
अणू रेणूचे नुपूर
चालत होते रानवट||
कोमल स्पर्श अवनी
विखुरलेल्या दिशा वेचुनी
लाटांचे नीरज तोडूनी
चालत होते रानवट||
डोहाच्या तळाशी आठवणी
सुरूंग त्यावर पेरुनी
राखेचा घट उचलूनी
चालत होते रानवट||
अज्ञानाचे सुख त्यागुनी
ज्ञानाची ठेच लागली
ठसे उमटली आरसपानी
चालले ....रानवट||
-भक्ती
प्रतिक्रिया
4 Feb 2022 - 9:05 am | प्रचेतस
कविता आवडली पण रानवट शब्दाचा अर्थ लागला नाही. रानमय असा काहीसा आहे का?
4 Feb 2022 - 10:18 am | Bhakti
रानवट- uncivilized route
शब्दशः 'रानटी' 😅