शतकातुनी एखादा रचितो
कवि, शब्दांचा जमवुनी मेळ,
कविता- जी करुनिया अचंबित
विलक्षणाचा मांडी खेळ
जेथ पोचुनी तर्क कुंठतो
तीच वाट पकडे कवि तो
इंद्रजाल शब्दांचे विणी -जे
रसिक कधी भेदू न शकतो
नित्य बदलते दृष्य दिसावे
स्फटिक लोलकातून जसे
वाचत असता ऐसी कविता
पुन्हा नवी का भासतसे?
प्रतिक्रिया
25 May 2022 - 11:08 am | ज्ञानोबाचे पैजार
आवडली, तरल कविता
पैजारबुवा,
27 May 2022 - 8:27 am | श्रीगणेशा
खरं आहे! छान लिहिलं आहे!!