मल्याळम सिनेमाशी माझी ओळख
पुण्यात NFAI च्या कृपेने अनेक परकीय भाषांतील आणि अनेक देशांतील चित्रपट बघायला मिळाले. अन्य देशांचे दूतावास वैगेरे NFAI येथे २-३ दिवसांचे त्यांच्या देशातील चित्रपटांचे महोत्सव अगदी मोफत आयोजित करत. युरोपिअन चित्रपट महोत्सवही सलग २ वर्षे मला बघायला मिळाला. तिथे महोत्सवाची माहिती देणारी छोटी पुस्तिका किंवा पत्रक मिळायचे. अशी मला मिळालेली पत्रके मी जपून ठेवली आहेत. नंतरही ऑस्करच्या परदेशी भाषेतील चित्रपट या वर्गात नामांकन मिळालेले चित्रपट शोधून शोधून पाहत राहिलो. भारतीय भाषांतील चित्रपटांकडे (हिंदी आणि मराठी सोडून) माझे साफ दुर्लक्ष झाले आहे.