आठवणींचा पाऊस
आजकाल पाऊस म्हणलं की प्रत्येकाच्या मनात, डोक्यात पहिली येणारी गोष्ट म्हणजे आवकाळी …. :) मग तो फायद्या साठी आलेला असू की तोट्यासाठी .प्रत्येकजण आपल्याला जमेल तसा आनंद घेतो, तर काहीजण दुःखाच्या जगात सामाऊन जातात. तर काहीजणांना काहीच फरक पडत नाही ,जणू त्यांचे आयुष्य त्यावर आवलंबूनच नाही असे .
तसचं आठवणीचं असत. यांना ना वेळ न काळ… आवकाळी कधीही मनात घर करून जातात. मग त्या काहीजणांनसाठी सुखाच्या असतात तर काहीजणांना साठी दुःखाच्या.प्रत्येकजण आपापल्या आठवणीच्या घरात सामाऊन जातो .