नाडी ग्रंथ भविष्य आणि कर्म महात्म्य भाग ३ (अंतिम)
वरील लेखातील उल्लेखित गॉकलाँ बाबत तळटीप...
टीप :- हजारो व्यक्तींच्या जन्मकुंडल्या मिळवून संख्याशास्त्राच्या आधारे ग्रह ज्योतिषाचा 'शास्त्रीय' पाया घालणाऱ्या मायकेल गोकलाँ या फ्रेंच संशोधकाची कर्म सिद्धांताच्या ज्ञानाच्या अभावी कशी दिशाभूल झाली आहे हे 'ग्रहांचा मानवावर प्रभाव पडतो ' ह्या त्यांच्या निष्कर्षावरून दिसून येते. विशिष्ट ग्रहाखाली जन्मणाऱ्या व्यक्ती मधे विशिष्ट गुण प्रवृत्ती आढळून येते म्हणून ग्रहच ती गुण प्रवृत्ती निर्माण करतात किंवा ग्रहाच्या प्रभावाचा तो परिणाम आहे. हा त्याने काढलेला निष्कर्ष तर्कदुष्ट आहे, शास्त्रीय नाही. वरील उदाहरणातील भूकंप झाल्यानंतर एक बाई बाळंत झाली, म्हणून भूकंप हा तिच्या बाळंतपणाचे कारण आहे असे म्हणण्यासारखे आहे. हा तर्कदोष post hoc ergo propter hoc म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणजे दिवसानंतर रात्र येते म्हणून दिवसच रात्रीचे कारण आहे असे समजण्याचा तर्कदोष आहे. या तर्कदोषाला खगोलविज्ञानातील पृथ्वीच्या गतीचे असे अज्ञान कारणीभूत आहे, असे गॉकलाँच्या तर्कदोषाला त्याचे ब्रह्मविज्ञानातील कर्माच्या गतीचे अज्ञान कारणीभूत आहे. पण या तर्कदोषामुळे त्याला विलक्षण सिद्धांत मांडावा लागला आहे. हा विलक्षण सिद्धांत म्हणजे स्त्रीच्या उदरातील गर्भ आकाशातील ग्रहस्थिती पाहून आपला जन्म काळ स्वत :च ठरवतो व जन्मतो. आकाशातील ग्रहस्थितीचे हे ज्ञान त्या गर्भाच्या मेंदूला होते म्हणे! ज्योतिषासारख्या विषयात सुद्धा पाश्चात्य मनावरील भौतिक वादाचा पगडा कसा सुटत नाही याचे हे उत्तम उदाहरण आहे स्त्रीच्या उदरातील गर्भाच्या मेंदूला आकाशातील ग्रहस्थितीचे ज्ञान होते अशी कल्पना मांडणारा गॉकलाँ हे विसरला की तो गर्भ जेंव्हा जन्म घेतो, त्या वेळेची ग्रहस्थिती निर्माण व्हायची झाल्यास त्याच्या बरोबर ९महिने अगोदर त्याच्या मातापित्यांच्या संभोगातील त्यांच्या स्त्री पुरूष बीजांचा परस्पर संयोग घडून यायला पाहिजे, तरच तो गर्भ ९ महिन्यानंतर त्या विशिष्ट ग्रहस्थितीखाली जन्म घेऊ शकेल. आता त्याच्या मातापित्यांच्या स्त्रीपुरूषबीजांचा संयोगकाल कोण ठरवतो व कसा ठरतो? या प्रश्नाचे उत्तर ' गर्भाच्या मेंदूचे ज्ञान' हे असू शकत नाही. कारण त्यावेळी गर्भच अस्तित्वात नसतो. ( उलट त्या बीजसंयोगातूनच तो निर्माण होणार असतो) 'ग्रहांचा प्रभाव' हेही त्याचे उत्तर असू शकत नाही. कारण प्रत्यक्षात व्यक्तींच्या जन्मकाली ग्रहांचा प्रभाव चालू होतो. हे फलज्योतिषाचे मुलभूत गृहीतकृत्य आहे. या प्रश्नाचे उत्तर ब्रह्मविज्ञाच देऊ शकते. ब्रह्मविज्ञानानुसार हा काळ जन्मणऱ्या व्यक्तीचे पूर्वकर्म ठरवते. आणि ते कर्मदेवतेच्या माध्यमातून आकाशलेखनाच्या नोंदीनुसार ठरवले जाते. व्यक्तीची गुणप्रवृत्ती ग्रह ठरवत नसल्याचे खुद्द गॉकलाँच्या आणखी एका संशोधनानेच सिद्ध झाले आहे. शस्त्रक्रियेने कृत्रिमपणे (सिझेरियन पद्धतीने) जन्मलेल्या व्यक्तीवर तिच्या जन्मवेळच्या ग्रहांचा प्रभाव पडत नसल्याचे त्याला आढळून आले आहे! सिझेरियनने जन्मलेल्या व्यक्तीवर त्या वेळच्या ग्रहांचा प्रभाव का पडू नये याचे उत्तर गॉकलाँकडे नाही! ग्रहांचा प्रभाव पडतो हे खरे असले तर सिझेरियनने जन्मलेल्या व्यक्तीवर तो प्रभाव पडावयास नको काय? मग तो का पडत नाही? कारण माणसाची गुणप्रवृत्ती त्याच्या पुर्व जन्मातील कर्मामुळे ठरते त्याच्या जन्मवेळेच्या ग्रहांमुळे, ग्रहांच्या प्रभावामुळे नाही.
---------
प्रतिक्रिया
11 Jun 2015 - 8:34 pm | प्रकाश घाटपांडे
पुर्व जन्मातील कर्म म्हणा वा पुर्वसंचित म्हणा अशा अज्ञेय पॅरामिटर्स मुळे वै़ज्ञानिक संशोधन करण्यास निरुपयोगी ठरते जिज्ञासूंनी हे पहावे. http://mr.upakram.org/node/854
12 Jun 2015 - 12:16 am | वगिश
आपले लिखाण मला अगम्य वाटते आहे. मला काहीच समजत नाहीए. ह्या गोष्टी विषयी अधिक जाणून घ्यावे लागेल असे वाटते. फक्त हे सर्व कशासाठी आहे ते सांगा. म्हणजे प्रत्येक कला , शास्र ह्यामागे काहीतरी हेतू असतो. तसे ह्याचा उपयोग काय व तो सामन्यांना कसा करून घेता येईल?
12 Jun 2015 - 5:27 am | कंजूस
माझा पास-
14 Jun 2015 - 1:21 pm | आदूबाळ
माझं तिकीट.
19 Jun 2015 - 8:51 pm | हाडक्या
मग आमचं ऑयस्टर.. ;)
19 Jun 2015 - 9:18 pm | सूड
माझ्यासाठी एक बदलापूर रिटर्न काढ प्लीज, मी पटकन एक पॉपकॉर्नचं पाकीट घेऊन येतो.
13 Jun 2015 - 11:27 pm | योगविवेक
प्रकाशकाकांनी दिलेल्या लिंकमधे ते म्हणतात,
प्रा.गळतगे नेमके तेच म्हणतायत. "ग्रह मानवावर प्रभाव टाकत नाहीत"... यावर ओकांची विचारणा की जर तसे (म्हणजे नवग्रह प्रभाव टाकत नसतील तर) मग त्यांची पुजा करायच्या मागे महर्षींंचा काय विचार आहे?
यावर गळतगे पुढे जाऊन म्हणतात की मानवाने केलेल्या आपल्या आयुष्यातील चुका किंवा पाप दुरुस्त करायचे असेल, त्यांची सुधारणा करायला नवग्रहांना प्रतीक मानून पुजा करायला महर्षी सुचवतात.
या कडे असे पाहता येईल गणित, विषयात कमी मार्क पडले तर असेही म्हणता येईल की सूत्रांच्या मदतीतून पायरी पायरीने विचार करायची पद्धत त्या विद्यार्थ्याला नीट जमली नाही किंवा करायचा सराव कमी पडला. याची ती निशानी आहे. म्हणजेच गणित हा विषय व्यक्तीने सुत्रानुसार पायरी पायरीने विचार करायचे ते प्रतीक आहे. मला असे यातून वाटले.
वगिश सर ...
या धाग्याचा उद्देश नाडी ग्रंथांच्या अवलोकनातून काही शंका निर्माण होतात त्यांचे निरसन करायला वाट मिळावी असा आहे. आपल्याला व अन्य नाडीग्रंथांच्या विषयाला अज्ञ सदस्यांच्या माहितीसाठी -
प्रकाश घाटपांडे सरांच्या आधीच्या धाग्यांना भेट द्यावी.
ज्यांची परीक्षा करता येईल अशा न्यात पुराव्यांच्या तपासणी नाडी ग्रंथांच्र्या पुराव्यांचे विष्लेषण करायला काय प्रश्न आहे. पण.... कोणी पुढे येईल काय असा विचार आहे.
कंजुस सर...
आपण पास देऊन धाग्यातील विचारांना मान्यता दिली असे मानायचे की काय?
19 Jun 2015 - 8:54 pm | हाडक्या
बादवे, कोणी पास दिला की मान्यता गृहित कशी धरता येईल ??
14 Jun 2015 - 2:35 pm | संदीप डांगे
फारच चमत्कारिक लेखमालिका आहे. तीनही लेख वाचले, मला काहीही समजले नाही.
स्त्री-पुरुष समागम ते प्रत्यक्ष अर्भक जन्म यात हजारो परमुटेशन्स कॉम्बीनेशन्स असतात. लाखो लोक याचा रोज अनुभव घेतात. तरी अर्भकावर कुठल्या ग्रहांचा नेमका प्रभाव आहे, मुळात आहे की नाही, आहे तर केव्हापासून आहे हे ठरवायला इतका काथ्याकूट, तोही असा ज्याचा काही अर्थ लागत नाही?
एखाद्या गोष्टीची सुरूवात होते आणि अंत होतो ही संकल्पना मानवी मेंदूच्या विचारकक्षेच्या सोयीसाठी योग्य असली तरी प्रत्यक्ष व्यवहारी नाही. जन्म आणि मृत्यू हे ऑन-ऑफ इतके साधं नाही. त्यात कितीही काथ्याकूट करा उपयोग नाही.
माणसाची गुणप्रवृत्ती त्याच्या पुर्व जन्मातील कर्मामुळे ठरते त्याच्या जन्मवेळेच्या ग्रहांमुळे, ग्रहांच्या प्रभावामुळे नाही.
या वाक्यावर हा लेख संपला आहे म्हणून धागाकर्त्यास अपेक्षीत असलेली धारणा म्हणून या वाक्याचा उपयोग करून माझे प्रश्न व चिंतन मांडतो.
१. माणसाची गुणप्रवृती त्याच्या पूर्वजन्मातल्या कर्मामुळे ठरते की त्याच्या जन्मवेळेच्या ग्रहांमुळे? कारण तसे असेल हे दोन्ही वेगळे आणि स्वयंभू पाहिजे. तसे नसेल तर वाक्यात एकाचाच उल्लेख हवा.
२. माणसाची गुणप्रवृत्ती म्हणजे काय? नक्की कशावरून ती प्रत्ययास येते?
३. जन्मवेळेच्या ग्रहांमुळे, ग्रहांच्या प्रभावामुळे नाही. म्हणजे नेमके काय? ग्रह आणि ग्रहांचा प्रभाव वेगवेगळे आहेत का?
या प्रश्नांची उत्तरे अपेक्षित आहेत.
असो.
चौकात ट्रॅफिक पोलिस असतात. वाहनचालकाने कुठे जायचे ते सांगत नसतात. कधी व कसे जायचे ते सांगतात. वाहतुकीवर त्यांचे प्रत्यक्ष नियंत्रण असते. त्यांना चिरिमीरी देऊन पाहिजे तिकडे पाहिजे तसे पाहिजे तेव्हा जाण्याचे सामर्थ्य मिळते. लोकांना ग्रहशांती म्हणजे असेच काही वाटत असते. पण असे नसते.
हाय-वे ला वळणरस्ता, धोकादायक ठिकाणे, गावाची नावे सांगणारे, वेगमर्यादा सांगणारे फलक असतात. ते प्रवासाचे मार्गदर्शक असतात. पण प्रवासाचे कुठलेच नियंत्रण त्यांच्या हातात नसते. तुम्ही कुठे आहात आणि इथून पुढे तुम्ही कुठे जऊ शकता एवढं सूचित करण्याचं काम ते फलक करतात. त्यांना चिरीमिरी देऊन तुमचा प्रवास बदलणार नसतो. वळणरस्ता सरळ-रस्ता होणार नसतो. वेगमर्यादा कमी न करता गेलं तर होणारा अपघात तुमची स्वत:ची जबाबदारी असतो. प्रत्यक्षात ग्रह हे या फलकांसारखे असतात. त्यांचे काम तुम्ही कुठे आहात हे सांगणे असते.
धागाकर्त्याच्या मते प्रत्येकाचे कर्म नाडीत लिहिलेले नाडीमहर्षींना कळते आणि त्यावर ते कर्मशांतीचे उपाय सांगतात. हा दावा जबरदस्त वादग्रस्त आहे. खुलासा अपेक्षित.
वरिल विधान आधीच्या भागातून घेतले आहे. अशी विधाने भोंदूबाबांची आठवण करून देतात. असे बाबा जे गरोदर स्त्रीला तुला मुलगाच होईल असे खच्चून सांगतात. आणि मुलगी झाली तर तू व्रत नीट केले नाही म्हणून पळवाट शोधतात.
जर महर्षींना सर्व माहित आहे तर त्यांना हेही माहित असले पाहिजे की शांति-पूजा करून साधकाला लाभ होईल की नाही. त्याच्याबद्दल इथे काय सांगितले आहे?
19 Jun 2015 - 8:43 pm | योगविवेक
संदीप डांगे यांना,
प्रतिसादाला उशीर झाल्याबद्दल क्षमस्व...
आपल्या या अभिप्रायाबद्दल धन्यवाद...
आपले चिंतन व प्रश्न यावर काही लिखाण –
आपले म्हणणे बरोबर आहे. मानवचे पुर्व कर्म आणि जन्मकालची ग्रहदशा या वेगवेगळ्या स्वयंभू बाबी आहेत. नेमके तेच गळतगे यांचे म्हणणे आहे या धाग्याच्या भाग एक मधे ते म्हणतात, ‘ग्रहांची भ्रमणे व व्यक्तींचे जन्म हे अगोदरच ठरलेले आहेत. या ठरलेल्या 'व्यवस्थे' नुसारच प्रत्येक व्यक्तीचा जन्म व तिच्या जीवनातील इतर घटनाही घडत असतात. या पूर्वनियोजित 'व्यवस्थे' मुळेच ग्रहांचा मानवावर प्रभाव पडत असल्याचा भास होतो. पण मुळात ग्रह मानवावर कसलाच प्रभाव पाडत नाहीत. दोन घटना जेव्हा एकत्र घडतात तेव्हा एक घटना दुसरीवर प्रभाव पाडत आहे अशी माणसाची अर्थात चुकीची समजूत होते.’
हे वाक्य भाग 3 मधे वापरले गेले आहे. गॉकलाँनी खूप पत्रिकांचा अभ्यास करून मंगळग्रहाच्या प्रभावाच्या व्यक्तींमधे युद्धजन्य गुण प्रवृत्ती आढळते असे सिद्ध करायचा प्रयत्न केला होता (तो तसा नाही असे नंतर अनेकांनी दाखवून दिले तो भाग वेगळा.)
नाही.
होय. असे म्हणणे साहसाचे आहे. मात्र हा दावा घागाकर्त्याचा (माझा)नाही. नाडी ग्रंथ पाहिल्यावर त्याची प्रचिती येते आणि म्हणूनच या विधानांचा अर्थ समजावून देण्यासाठी धागा उपस्थित केले गेला होता.
ब्रम्हविज्ञानानुसार ग्रहांची शांती-पुजा ही खरे तर त्या व्यक्तीची आपल्याच कर्मांची शांती पुजा असते. ग्रह हे त्या व्यक्तीच्या कर्मांची केवळ प्रतिके (symbols) आहेत. त्या प्रतिकांची शांती-पुजा म्हणजे त्या व्यक्तीची आपल्या कर्माची शांती-पुजा असते. त्या शांती-पुजेचा त्या व्यक्तीला आपले कर्म सुसह्य करण्यासाठीच उपयोग होतो. कर्म तीव्र वा बलवत्तर असेल तर ते त्याच्या शांती-पुजेमुळे सुसह्य होते;आणि सौम्य असेल तर शांती-पुजेच्या रूपाने ( नाडीग्रंथात सांगितलेला खर्च करून) भोगले जाते. पण कर्म भोग भोगलाच पाहिजे, त्या पासून सुटका नाही.
आकाश लेखनतील नोंदीवरून नाडी महर्षींना प्रत्येक व्यक्तीचे कर्म माहित झालेले असते. आपल्या कर्माची म्हणजे कर्म देवतेची ग्रह देवतेच्या रूपाने कोण पूजा करणार आहे व कोण करणार नाही, हे ही आकाश लेखनतील नोंदी वरून महर्षींना माहित झालेले असते. हेच आहे. (विश्वातील सर्वच घटनांची नोंद आकाशलेखनात असते हे लक्षात ठेवावे) ज्यांना शांती-पुजा करूनही काही परिणाम दिसून येत नाही, त्यांचे कर्म बलवत्तर असल्यामुळेच दिसून येत नाही; व ते सुसह्य होण्यासाठीच ती शांती-पुजा सांगितलेली असते. प्रत्येकाला आपल्या कर्मानुसारच शांती-पुजेचा अनुभव येतो हे यावरून समजून घ्यावयाचे आहे.
20 Jun 2015 - 5:43 pm | सिरुसेरि
नाडी भविष्य जर चुकीचे ठरले तर भरलेल्या फीचा रीफंड मिळतो का ? -- एक वाट चुकलेला वाटसरु .
20 Jun 2015 - 11:07 pm | बबिता बा
.
21 Jun 2015 - 12:20 am | इनोबा म्हणे
यांना मारा, झोडा, किंवा अन्य कुठलाही मार्ग वापरा...गिरे तो भी ** उपर या न्यायाने चालणारी व्यवस्था आहे हि.
21 Jun 2015 - 5:49 pm | योगविवेक
याची प्रचिती जेंव्हा येते ते तेंव्हा वाद मिटतो...
मित्रांनो...
21 Jun 2015 - 11:12 pm | मराठीप्रेमी
नाडीभविष्यवाले दुसर्यांचे तर्कदोष वगैरे काढायला लागले म्हणजे मज्जाच आहे!
22 Jun 2015 - 10:19 pm | योगविवेक
पण प्रत्यक्ष पुरावा मिळाला तर त्या समोर तर्क 'दोषी'च राहणार, पण जे प्रत्यक्ष पुराव्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करतात. ते अशा टिमक्या वाजवण्यात समाधान बाळगतात.
22 Jun 2015 - 10:37 pm | सूड
ठीक आहे ओक काका!!
24 Jun 2015 - 12:14 pm | सुबोध खरे
अरे भई कहना क्या चाहते हो ?
24 Jun 2015 - 1:26 pm | कंजूस
""ज्यांची परीक्षा करता येईल अशा न्यात पुराव्यांच्या तपासणी नाडी ग्रंथांच्र्या पुराव्यांचे विष्लेषण करायला काय प्रश्न आहे. पण.... कोणी पुढे येईल काय असा विचार आहे. कंजुस सर... आपण पास देऊन धाग्यातील विचारांना मान्यता दिली असे मानायचे की काय?""
माझा पास रिन्यु करतो आहे.
योगविवेक आणि शशिकांतकाका आपण जो विषय घेतला आहे ते कर्म धर्म ज्योतिष उपचार उपाय इत्यादीवर युगेयुगे चर्चा झाली आहे. मी आणखी काही भर घालू शकणार नाही.फारतर असे म्हणेन की "बुद्ध आणि त्याचा धर्म "-डॅा आंबेडकर, किंवा अशासारखे ग्रंथ वाचून आपापली मते बनवावीत.
पुर्वीच्या काळी राजास काहीतरी ( काव्य ,शास्त्र, विनोद ,शस्त्र, शौर्य,मदिरा,मदिराक्षी,कलाकृती,देवाचा कोप होणयाचा धाक वगैरे ) धन मिळवले जायचे त्यातीलही हा प्रकार असू शकेल.