आठवणींचा पाऊस

पुजा क's picture
पुजा क in जनातलं, मनातलं
15 Jun 2015 - 3:14 pm

आजकाल पाऊस म्हणलं की प्रत्येकाच्या मनात, डोक्यात पहिली येणारी गोष्ट म्हणजे आवकाळी …. :) मग तो फायद्या साठी आलेला असू की तोट्यासाठी .प्रत्येकजण आपल्याला जमेल तसा आनंद घेतो, तर काहीजण दुःखाच्या जगात सामाऊन जातात. तर काहीजणांना काहीच फरक पडत नाही ,जणू त्यांचे आयुष्य त्यावर आवलंबूनच नाही असे .
तसचं आठवणीचं असत. यांना ना वेळ न काळ… आवकाळी कधीही मनात घर करून जातात. मग त्या काहीजणांनसाठी सुखाच्या असतात तर काहीजणांना साठी दुःखाच्या.प्रत्येकजण आपापल्या आठवणीच्या घरात सामाऊन जातो .
प्रत्येकाच्या जगण्याला अर्थ देणारी आठवण असतेच.. तर काहीजणांना जगणा नकोशी करणारी आठवण असते.पण असू कोणतीही ती जगणं अधुरू करून जाते !
माणूस एखादा सुखाचा जगलेला क्षण परत परत जगण्यासाठी या देवरूपी :) आठवणींचा सहारा घेतो आणी आपलं जीवन सारखं सारखं Rewind करून जगत असतात आणि मनातल्या मनात सुखावत असतात . अशी ही सुखाची आठवण माणसाला जगण्याची नवीन उम्मीद देत असते .तो वास्तवात नव्हे तर भूतकाळात जाऊन ही त्याचे जीवन जगत असतो. आणी अश्याच आठवणींचा बरसाव पुढे पण होईल या भ्रमात का होईना नव्या आनदाने जगत असतो.
त्याच उलट एखादा दुखाचा क्षण मनात आला कि जीवान कसं नकोसं होऊन जातं. मग खुप साऱ्या विचारांची गडबड चालू होते........कित्येक....
अश्या या दुखाच्या आठवणीत माणूस अश्रू यालाच एकमेव देवरूपी सहारा समजून flashback मध्ये जाऊन जाऊन परत येत राहतात . अश्या वेळी अश्रू म्हणजे जणू त्यांना वाटते मोकाट कुठेतरी सोसाड वार सुटून यांच्या एकट्यावर पाऊस पडत आहे असं. आणी त्यात ते भिजत याचा आनंद घेऊ कि दुखं करू याच विचारात वर आभाळा कडे तोंड करून अश्रूंच्या या पावसात भिजत राहतात,तासनतास…मधेच यांचा अश्रूंचा पाऊस कमी होतो तर कधी वाऱ्याच्या दिशेने जसा पाऊस फिरतो तसा त्या त्या आठवणीच्या दिशेने अश्रू फिरत राहतात . मधेच अश्रुची वीज चकाकते आणि त्याची चकाकी,आवाज सगळ्यांना दिसावी,कळावी असे करून जते.
जेव्हा या अश्रूच्या पाऊसात चिम्ब भिजून जातो , आठवणी दिसेनाश्या होतात… या अश्रूच्या ढगा मागे मग मात्र स्वतःला सावरत त्या पाऊसातून आपण बाहेर येतो .
ज्यांना पाऊस येऊ व्हा न येऊ काहीच फरक पडत नाही… ते मात्र या आठवणीच्या मागचे महान पात्र . जे प्रत्येकाच्या जीवनात खूप मोठी भूमिका करत असतात. या पात्रान मुळेच काहीजणांना जगण्याचा अर्थ सापडतो तर काहीजणं तो या पात्राच्या प्रसिद्धी मागे हरवून जातात .
जेव्हा पाऊस परत पूर्वी सारखा त्याच्या वेळेला उपस्थित होईल, मग प्रत्येक जन त्या पाउसाचा फक्त आणि फक्त फायदा ,भिजून आनंद घेतील. कदाचित तेव्हाच या आठवणीच्या मागचे पात्र लोकांना हवेहवेशे वाटतील आणि मग प्रत्येकजण या आठवणीच्या पाऊसात भिजेल पण नेहमी आनंदानेच … :) :) मग तो होईल आठवणींचा आनंदी पाऊस.

मांडणीविचार