मन अतर्क्य....
मानवी मन खरंच किती चंचल असतं. मनाचे झालेले समज,मनाने तयार केलेल्या अनेक दिवसांच्या ओळखी पूर्णपणे बदलायला काही क्षणच पुरेसे असतात. आपल्याला सर्वात जवळचा वाटणारा व्यक्ती काही क्षणातच इतका परका होतो कि ज्याच्या बरोबर आपण अनेक गोष्टी शेअर केलेल्या असतात त्याला नुसते समोर पाहायला हि आपल्याला नकोसे वाटू लागते. त्याच्याशी बोलणे तर सोडाचत्याचा आवाज ऐकला तरी आपल्या मनातील कोलाहल जागृत होऊ लागतो. अश्यावेळी मनाला शांतकरणे अगदीच अशक्य होते. हे मनाचे बदलच मानवी मनाला अतर्क्य बनवतात. मानसशास्त्राचे कितीही शिक्षण घेतले तरी मानवी मनाला अगदी अचूक ओळखण्याची शक्ती कोणालाही मिळत नाही.