विचार
तत्त्वभान ४. तत्त्वाचा 'ते'पणा
तत्त्वाचा 'ते'पणा
- श्रीनिवास हेमाडे
*/
/*-->*/
/*-->*/
तत्त्व म्हणजे पदार्थ हे समीकरण माणसाला लागू केले की माणूस जात-वर्ण यांचा वाहक असणारा 'पदार्थ' बनतो. साहजिकच त्याला समाजाचे नियम लागू होण्याऐवजी निसर्गाचे भौतिक नियम लागू होतात. भौतिक वस्तूचा नियम जिवंत, चैतन्यशील माणसाला लावला की माणसाची शुद्ध वस्तू होते. वर्ण-जात-लिंगभेद या सामाजिक नियामक तत्त्वांना एक तर सारतत्त्वे (essences) समजले गेले किंवा द्रव्य (substance) मानली गेली.
तंत्रशिक्षण निर्णायक वळणावर …१
आपल्या परिचयाचे कित्येक जण इंजिनियर असतात. शहरांत तर घरटी एक इंजिनियर असणे आता फार दूर राहिले नाही. तंत्रशिक्षणाची अधोगती झाली असं आपण ऐकतो त्याच वेळी दोन्ही टोकाची उदाहरणं दिसतात! कुणी भारतीय इंजिनियर देशात अथवा परदेशांत काहीतरी मोठी कामगिरी करताना दिसतो तर त्याच वेळी कुणी इंजिनियर कॉल सेंटरमध्ये जाताना, विमा एजंट किंवा एखाद्या सहकारी ब्यांकेत वीजबिलं स्वीकारताना दिसतो. तुमचा किराणा दुकानदारसुद्धा इंजिनियर असू शकतो , अतिशयोक्ती नाही. पूर्वी बेकारीत रहाणारे इंजिनियर आता मिळेल ते काम करताना दिसतात हे एका अर्थी बरंच झालं. पण प्रश्न असा पडतो की असे का व्हावे?
श्री निरंजन रघुनाथ चरित्र भाग 1
श्री निरंजन रघुनाथ चरित्र भाग 1
फिल्म इन्स्टिट्यूटचा पेच
फिल्म अँण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही पुण्यातली संस्था सध्या गाजते आहे ती तिथल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे. नवे अध्यक्ष आल्यानंतर त्यांच्या विरोधात हे आंदोलन सुरु आहे. या अध्यक्षांनी अजून कामाला सुरुवातही केलेली नाही. तोवर या आंदोलनाला सुरुवात झाली. का तर अमुक तमुक प्रकारचा अध्यक्ष आम्हाला नको. प्रश्न हा आहे की विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा की आपला वर्ग(शिक्षणाचे ठिकाण) सोडून वर्गाबाहेर आंदोलने करायची ?
तत्त्वभान ३. स्वजाणिवेचे पक्व रूप
स्वजाणिवेचे पक्व रूप
- श्रीनिवास हेमाडे
*/
/*-->*/
प्लेटो
'किल्ला' आणि प्रेक्षक!
(चित्रपट पाहिला नसल्यास सूचना: काही किरकोळ स्पॉइलर आहेत, त्यामुळे नंतर तक्रार चालणार नाही :) )
काल रात्री किल्ला पाहण्याचा योग आला. चित्रपट निश्चित आवडला पण प्रेक्षकांचा प्रतिसाद बघून काही (अस्वस्थ करणारे) प्रश्न पडले.
लंपन मालिका वाचून संपली!
गेले कित्येक दिवस/महिने बाजूला ठेवत आलेलं 'झुंबर' आज वाचून संपलं. हुरहूर लागणार माहित होती आणि मलपृष्ठ वाचून शेवटच्या कथेत काय असणार याचा अंदाज आला होता पण वाचत असताना वेगळंच काही तरी होत होतं.
'स्पर्श' वाचत असताना सुरुवातीला 'संकेश्वर', 'गडहिंग्लज', 'आजरा' ही ओळखीची आणि जवळची गावे बघून छान वाटत होत, त्यात लंपन च्या आई-बाबांचं गाव बहुधा 'पुणे' असावं असंही सुचित झालं जे आज पर्यंत माझ्यासाठी कोड होत किंवा लक्षात नव्हत आलं . एकंदरीत या कथेचा बाज थोडा वेगळा वाटत होता, आतापर्यंतच्या इतर कथांपेक्षा. (त्याच कारण मलपृष्ठावरच्या निवेदनात आहे.)
२. भानावर येण्यापूर्वी
चीनी कम
आजवर भारतीय उपखंडामधे(सार्क) केवळ भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या रस्सीखेचीलाच फार महत्त्व मिळे पण भारताने आपल्या पश्चिमेकडून आता थोडे पूर्वेकडे पाहणेही आवश्यक आहे असे प्रतिपादन केले जाऊ लागले. पूर्वीच्या सरकारने त्याचे वर्णन लूक-ईस्ट पॉलिसी असे केले होते. सध्या त्यापुढे एक पाऊल जावून अॅक्ट-ईस्ट पोलिसीचा बोलबाला आहे. पंतप्रधानांच्या मंगोलिया, बांगलादेश भेटीनंतर याला पुन्हा दुजोरा मिळाला आहे. पूर्वेकडे सर्वात महत्त्वाचा देश म्हणजे चीन..