शतशब्द कथा - दोन किनारे

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
13 Jun 2015 - 4:26 pm

एका दुसर्याच्या हातात-हात गुंफून हसत-खेळत, पाण्यात भिजत, दोन किनारे पाण्यासहित समुद्राला जाऊन सहज भेटले असते. पण दोन्ही किनारे श्रेष्ठत्वाच्या वाळवीने ग्रसित होते. डाव्या किनाऱ्याला वाटायचे, त्यालाच समुद्राकडे जाणारा रस्ता माहित आहे. उजव्या किनाऱ्याने त्याचे अनुसरण केले पाहिजे. उजव्याला वाटायचे, सोपा सरळ मार्ग त्यालाच माहित आहे. त्यांच्या आपसातला विवाद आणि कलह शिगेला पोहचला. एक किनारा पूर्वीकडे वळला तर दुसरा किनारा पश्चिमेकडे. पाणी मृगमरीचीकेत हरवले.

एखाद्या प्रेताप्रमाणे ते वेगवेगळ्या दिशेला अंतहीन वाळवंटात पाण्याच्या शोधात भटकू लागले. पाण्याअभावी ते तडफडू लागले. देवा! सुटका कर या मरण यातनेतून. पाणी....पाSणी... मिळेल का कुठे एक थेंब पाSSणी. त्यांचे करुण क्रंदन वाळवंटातच विरून गेले. दोन्ही किनारे अखेर अस्तित्वहीन झाले.

वाङ्मयविचार

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

13 Jun 2015 - 5:03 pm | स्पंदना

मृगमरीचिकेत!!
काय अर्थ हो या शब्दाचा?
पाणी वाहणारे किनारेच पाण्याविना तडफडावेत?
आजवर दोन किनार्‍यांची कधी भेट होत नाही हे रुपक ऐकौन होते, आज काही नविनच वाचल, त्या मधली स्पर्धा!!
सुरेख रुपक!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Jun 2015 - 5:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

दिल्लीच्या सद्य परिस्थितीवरचे रूपक आवडले !

मात्र इथे जनता पाण्याविना (वाच्यार्थाने) तळमळतेय. किनारे आपले कार्य चालू ठेऊन आहेत.

मृगमरीचिका हा शब्द मला नविन होता. मृगमरीचिका = मृगजल / मृगजळ असा अंदाज बांधून वाचले. तसे नसल्यास खुलासा करावा.

विवेकपटाईत's picture

13 Jun 2015 - 6:05 pm | विवेकपटाईत

राजनीतीवर रूपक नाही आहे. पहिल्या ओळीतच स्पष्ट केले आहे एका दुसर्याच्या हातात-हात गुंफून हसत-खेळत, पाण्यात भिजत, दोन किनारे पाण्यासहित समुद्राला जाऊन सहज भेटले असते

दोन किनारे = एकत्र चालणारे दोन प्रवासी (नवरा - बायको)
पाणी = प्रेम
सुखी संसारासाठी एकत्र चालणे गरजेचे. एकत्र चालणार्यांना प्रेमाचा अनुभव घेता येतो. विरुद्ध दिशेला जाणार्यांचे आयुष्य व्यर्थ.