काय वजन असतं क्षणांना!
काय वजन असतं क्षणांना!
आज अन्वयच्या 'केजी-वन' चा पहिला दिवस!
तिला कधीपासूनच्या आवडणाऱ्या 'बिग येलो स्कूल बस' ने आज शेवटी ती शाळेपर्यंत गेली, मी ही गेलेलो मागे मागे, अमृताचा सल्ला ऐकला, जाऊन बघून ये हं ती नित जात्ये की नाही शाळेत, शाळेत उतरल्यावर माझ्यासारखे उत्साही पालक मंडळी ही तिथे हजर होतीच, मी कुतुहलतेनॆ तिचा फोटो कढायला जरा तिच्या जवळ गेलो, त्यांची छान रांगेची 'ट्रेन' करवत शाळेची एक कार्यकर्ती त्यांना शाळेत घेऊन जात होती… मी फोटो काढला तेव्हढ्यात अन्वयाने मला पहिले आणि हसली
smile emoticon
मी ही तिला पाहुन हसलो…