ठाकरे सर ः एक ‘नारळी’ व्यक्तिमत्त्व
धिप्पाड शरीरयष्टी, भेदक नजर... असं हे धडकी भरवणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे ठाकरे सर. ते कोणता विषय शिकवतात हे अद्याप मला कळलेलं नाही; पण पिंपळगाव बसवंतच्या के. के. वाघ कॉलेजमध्ये ते आम्हाला एनसीसीला होते एवढं मात्र ठामपणे सांगू शकतो. त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर जाणवलं, की ते भयंकर वगैरे काही नव्हते. ते तर ‘नारळी व्यक्तिमत्त्व’ होतं! होय, नारळीच!! नारळ बाहेरून टणक असलं तरी आतून मात्र गोड असतं. तसंच काहीसं.
