'आनंद'
दुबइत तासाला वगैरे साफसफाई करणारे 'प्रोफेशनल' घरकाम करणारे मिळतात, पैसे पण तसेच, म्हणजे १तासात जितकं होईल तीतकच, पण असेही काही आहेत जे महिन्याला पैसे घेऊन काम करतात, नशीब चांगलं असेल तर विश्वासु वगैरे, बरे काम करणारे मिळतात! पण आम्ही 'नशीब' या शब्दापेक्षा पुढचा प्रकार मिळवलेला.
हा मूळचा हैदराबादचा, घरी ३मुलं आणि छोटी शेती, तोड़कंमोडकं हिंदी, कमी बोलणारा, जाम आद्न्याधारी, विश्वासू, आणि बरेच काही, जे काही हल्ली माणुस म्हणून 'मिसिंग'असतं असं सर्व. बऱ्यापैकी ऊँची, साधा टिपिकल शर्ट पैंट, चपला आणि दुबैत अत्यावश्यक असलेले साहित्य, सायकल वरचे हेल्मेट आणि फ्लूरोसेंट कलरचे येलो हाफ ज्याकेट, त्याच्या कडे क्लीनरचा वीजा होता, सकाळी तो एका जिम मध्ये साफसफाई सुरु करायचा ते दीवस संपे पर्यंत! हे सर्व मला हळू हळू कळत गेले, असो...
मी आणि अमृता दोघे जॉब करायचो तेव्हाची गोष्ट, अभिजीत वर्तक कुटुंबियांकडे यायचा एक गडी, तेव्हाच त्याला आमच्या इथे पण काम कर असे सांगितले, तो संगीतलेल्या वेळी येई १तासात सर्व कामे करी!
दुपारी यायचा आणि शुक्रवारी सुट्टी त्यामुळे आमची भेट दर शनीवारीच् व्हायची, भांडी, साफसफाई, ह्या दोन गोष्टी संगीतल्या होत्या, पण हां माणुस इतका साफसफाई कारायचा जणू त्याचच घर!
मिक्रोवेव ओवन, कीचन मधली कपाटं, शोकेस झालच तर छताला असलेले दीवे, ऐसी डॉक वरची धूळ हे सगळ वेळोवेळी साफ़! कधी कधी आम्हाला तर सांगावे लागे, आनंद भाय रहने दो, अगले हफ्ते कर लेना, तर तो नाराजी व्यक्त करून, मान हलावुन 'ठीक है' म्हणत असे.
तो एके ठिकाणी काम करायचा तिथे जीमही होती, तिथे त्यावर एकदा आरोप ही झाला, म्हणे तिथल्या फ्रिज मधले ड्रिंक्स हा चोरतो, मग त्यावर संशय, नंतर सीसीटीव्ही मध्ये कळालं की कोणी भलताच मनुष्य हे धंदे करायचा, त्यानी फार दुखावला गेला तो बिचारा, हे सगळं तो कोणाशी तरी फोन वर बोलत होता त्यामुळे कळले तरी, मग त्याला मी विचारलं, तेव्हा सांगितलं.
२वर्षातून एकदा जायचा तो गावी, जाताना बदली गडी देऊन जाई, तेव्हा आम्हाला त्याची किम्मत अजुन कळायला लागली, तो कधी एकदा परत येईल असं वाटे, एवढच नाही, भरतातून आम्हाला कॉल करत असे! कसे आहात वगैरे साठी!!! धन्य... जित्कं कौतुक करावं तीत्कं कमीच! आला दुबईत परत की खाउ आणे आमच्यासाठी, मला लोणचं आवडतं हे त्याला कळालं असावं बहुतेक, त्यानी माझ्या साठी स्पेशल हैदराबादी आंबा लोणचं आणलेलं, कमी तेल आणि जबरदस्त तिखट, आणि वेगळीच चव! २वर्ष टिकवुन खाल्ल, काही नसलं घरी की दही परोठा आणि हे लोणचं, मी जाम खुश!
त्याला लिवर प्रॉब्लम होता, त्यामुळे तो भारत्तात गेलेला, इथे दूबइत उपचार म्हणजे भयंकर महाग, इन्शुरन्स असेल तर नुसते विजिटचेच पाचशे आणि नसेल तर एक ते दोन हजार रुपये! त्यामुळे त्याला उपचारासाठी भारतात जाणे याशिवाय पर्याय नव्हता. बदली गडी म्हणून त्यानी त्याच्या सक्ख्या बहीणीच्या जावइला आमच्या कडे कामाला पाठवलेले, स्वामी त्याचं नाव, २महीने झाले, आम्ही दर आठवड्याला स्वामीला विचारायचो, तो म्हणायचा उपचार चालू आहेत, मग कळालं की तो आता परत येणे अवघड आहे दुबइत!
आता त्याला शेवटचं भेटून २वर्ष झाली असतील, अजुन ही जवळपास रोज त्याची आठवण काढतो आम्ही... माणूस म्हणून तो ग्रेट होताच... आणि जेव्हा जेव्हा मी ऐसी डॉक वरची धूळ, किचन मधली कपाटं, खिडक्यांच्या काचांवरची धूळ आणि बरच काही गोष्टी बघुन स्वामीला बोलतो, तेव्हा तेव्हा आनंद का नाहीये इथे, असा प्रश्न मला काय त्यानी ज्यांच्या ज्यांच्या कडे काम केले आहे त्याना पडतो!
माझी आई ३महिन्यासाठी येते, ती तर म्हणते आनंद ची सवय कोणाला लागू नये, खुप त्रास होतो मग!
असो, त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना सुख सामृद्धि ऐश्वर्य लाभो आणि आमच्या सारख्या लोकांना त्याच्या सारखा देवमाणूस मिळत राहो हीच देवा चरणी प्रार्थना!
आनंद ह्यातच!
#सशुश्रीके
प्रतिक्रिया
12 Jun 2016 - 4:12 pm | भिंगरी
++११
12 Jun 2016 - 4:24 pm | विवेकपटाईत
लेख आवडला. असे चाकर मिळणे दुर्मिळ आहे.
1 Jul 2016 - 9:39 am | शित्रेउमेश
+११११
1 Jul 2016 - 9:53 am | मोदक
लेख आवडला.
1 Jul 2016 - 10:04 am | वटवट
लेख छान आहे पण ते जरा टायपोकडे लक्ष दिलंत तर वाचायला अजून मजा येईल (ह.घ्या.)