काजवे दिसले...

Anonymous's picture
Anonymous in जनातलं, मनातलं
11 Jun 2016 - 3:57 pm

आज सकाळी सकाळी डोळे खाजवले,
आणि काजवे दिसले!

काजवे शेवटी कधी बघितलेले आठवतय का!?
एका मागोमाग एक,
डाटा फोल्डरच्या बाहेर...
ओव्हरफ्लो...

अंगावर पडलेला सुरवंट!
रस्त्यावरचं सुखलेलं शेण,
धो धो पावसानंतर च्या लक्ख सूर्य प्रकाशात...
सूरुच्या बनातला कुज्लेला पानांचा सुगंध...
वाडीतल्या चिखलात पडलेले जाम,
फुटलेल्या कौलातुन आलेले सूर्यकिरण,
चालता चालता डोळ्याच्या कोपर्यातुन दिसणारा...
कवळ्यानी अर्धवट टोचून खाल्लेला आंबा...
गंजलेल्या खिडकीतल्या बार मधली जळमटं,
सारवलेलं अंगण त्यात दीवाळीतल्या नागिणिचा काळा ठिपका...
जणू नजर ना लगे!

शेवग्याच्या शेंगाच्या झाडाची फुलं, छोटी छोटी...
तुटलेल्या फराश्यांचा तो रचलेला ढीग... लिंगोर्चा,
'हात हातरे' करणारा टांगा वाला,
मधेच शीटी...मधेच चाबुक,
वाडीत त्या कड़क सुपीक गादीसारख्या जमीनीवर...
कैरी पडल्यावर धप्प असा आवाज!

पाववालं, दुधवालं, कल्हइवालं, कापुसवालं...
गोला सरबत, कुल्फिवालं, मासुलिवालंचा झोपाळ्या वरून 'स्नीक पीक'
झोपाळ्याच्या बांबूवरचा भुंगा...
शेवाळं आलेला हौद,
रस्त्यावरच्या जांभळांचा खून,
बैलगाडीच्या चाकाखाली रगडणार्या छोट्या दगाडांची मोठी चीडचीड.
केळीच्या पानावारचं घावन,
'कोयाडं' - मस्त आंबट, गावठी आंब्याची आमटी.

झोपणार थेट आंगणावर... सारावलेल्या,
बाजुला कासव छाप... दे ताणुन
न कानात आजोबांचे गाणे...
परत नवीन दिवस,
तोच खुळा नाद,
अन हातात काठी,
काठीला टायर,
झींग झींग रस्त्यावर,
आहेत अजुन खुप रीळं...
ह्या डोक्याच्या हार्डडिस्क मध्ये...
कधी ना फॉर्मेट होवो रे,
अमुल्य डाटा नो बैकअप!
अमुल्य डाटा नो बैकअप!

#सशुश्रीके

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

सामान्य वाचक's picture

11 Jun 2016 - 7:33 pm | सामान्य वाचक

पुढचा भाग लवकर येऊ दे
तुमच्या लेखां मध्ये फार च अंतर असते
जरा पटापट टाकत चला

काजवा पकडलास रे काजवा पकडलास.
काय करशील रे काजव्या त्या वांझोट्या टावरवर?
गेला फणस गेला पपनस
गेला तो परस आणि बाहेर कुलुपं नातवंडाची वाट पाहत.
घेईल का कोणी ठकी त्याला इवल्याशा ओंजळीत
नाचेल का आंगण्यात खुळ्यासारखी?