अपराध मीच केला... शिक्षा तूझ्या कपाळी
रुस्तुम
संरक्षण क्षेत्र त्यामधला भ्रष्टाचार. कुणी तरी एक त्याविरुद्ध लढतो. त्यामधे खूप काही सोसतोही. रंग दे बसंतीमधे याची उत्तम हाताळणी झालेली आहे.
तसंच काही असेल अशी आशा होती कारण तशी प्रसिद्धी झाली होती. पण सुरुवातीला प्रेमकथा, नंतर अपेक्षाभंग, त्यानंतर विश्वासाला तडा. देशासाठी लढणार्याने देशाकडे लक्ष द्यावे की घराकडे... वगैरे वगैरे.
ही कहाणी सुरुवातीला अर्धा भाग चांगली पकड घेते. चेहरेही बघणेबल आहेत.