ही कथा काल्पनिक आहे याची नोंद घ्यावी
अरे!!! थांब का ईतका घाईत चालु राहिलाय . पाठीमागुन दिनुला कुणीतरी आवाज दिला .आवाज ऐकुन दिनु मागे वळला बघतो तर कुणीतरी काठी टेकत टेकत त्याच्या दिशेन येत होतं.
आजुबाजुला काळोख असल्यामुळे दिनुला नक्की कोण आहे हे स्पष्ट दिसत नव्हते.
जेव्हा तो म्हातारा जवळ आला तेव्हा दिनुने त्या म्हाताऱ्याला ओळखले.
तो म्हातारा जान्या आजा(जनार्दन) होता.
गावातील सर्वात जुना म्हातारा हाच होता. दिनुने जान्या आजाला
कुठ गेला होता . म्हनुन विचारले
तेव्हा जान्या आजा म्हणाला आरं पोरा मी शेताकडं गेलो होतो .रे!! येतांना ऊशीर झाला . बरं तु कुठ गेलता.
मी पन शेतातच गेलतो. खेकडं पकडायला .
पन एक पन नाही घावल.
बरं चल मग आता घरी येळ झालाय.
तुला तर माहीतच आहे वाटेत .
तांबड्याच रान लागत तिठ हडळ निघते ते.
दिनुने हे ऐकताच त्याच्या अंगावर काटा आला ..
अरे जान्या आजा काही पन गोष्टी नको काढु लय भिती वाटते.
बरं बाळा चल लवकर नाही काही बोलत . दोघेही अंधारातुन न बोलता बांधावरुन चालत होते. हळुहळु तांबड्याच रान आल सगळीकडे गर्द झाडी होती.
पानांची सळसळ , रातकिड्यांची किरकिऱ कानावर येत होती.
तेवढ्यात समोरुन एक बाई पळतच समोरच्या झुडुपाआड गेली.
दिनु व. जान्या आजाने ते बघितले हे बघुन दिनु ओरडनारच होता पन जान्या आजाने त्याला गप रहा सांगितले.
दिनु ने जान्या आजाचा हात घट्ट पकडला होता.
आता वातावरण खुपच बदलले होते.
सोसाट्याचा वारा, कोल्हेकुई , मध्येच मांजरांचा आवाज...
हे काय होतंय आजा दिनुने न रहावुन विचारले.
तेव्हा जान्या आजा म्हणाला.
पोरा हा वातावरणातील बदल नक्कीच काहीतरी सांगतोय
काहीतरी भयानक होणार हे मात्र नक्की.
तु अजिबात घाबरु नको.. दिनु बाळ
मी आहे ना!!
पण जान्या आजा पुढे काही बोलणार तोच .. पाठीमागुन कुणीतरी जान्या आजाच्या डोक्यात
दगडाने घाव घातला.
पुढचे शब्द बोलायला त्यांना जमलेच नाही. ते जीव सोडुन जमिनी वर पडले..
दिनुनं मागे वळुन बघितलं .
...
व एक स्मित हास्य त्याच्या चेहऱ्यावर उमटले..
आणि डोळ्यात एक विलक्षण चमक आली...
समाप्त.
प्रतिक्रिया
27 Aug 2016 - 10:07 am | नाखु
आजी सोनीयाचा "दिनु" उगवला.
कुठल्याही रानात न जाणारा नाखु
27 Aug 2016 - 1:02 pm | प्रभास
सहमत नाखुकाका...
खूप दिवसांनी फक्कड दिनुकथा वाचायला मिळाली..
27 Aug 2016 - 10:51 am | सिरुसेरि
कडक
27 Aug 2016 - 1:07 pm | भालचंद्र_पराडकर
तेवढ्यात समोरुन एक बाई पळतच समोरच्या झुडुपाआड गेली.
तांब्या तर नव्हता ना हाथात?
27 Aug 2016 - 1:52 pm | जव्हेरगंज
27 Aug 2016 - 5:13 pm | किंबहुना
न्हायतर मागच्या वेळची दिनूचे कपडे पळवलेली बाई असेल.. दिनू ला बघून घाबरून पळून गेली असेल.
27 Aug 2016 - 1:11 pm | क्षमस्व
काहींच्या काही कथा असा लेखनप्रकार आहे ना मिपावर?
27 Aug 2016 - 6:00 pm | बोका-ए-आझम
रोफलकथा असंपण म्हणतात.
27 Aug 2016 - 1:36 pm | अभ्या..
अरे काय हे. काल्पनिक म्हणाय्चे अन कैपन काय?
27 Aug 2016 - 1:43 pm | कविता१९७८
हडळीच नाव दिनु??
27 Aug 2016 - 2:54 pm | सुखी
काय सूदर्ला नाही
27 Aug 2016 - 6:01 pm | अत्रुप्त आत्मा
पांडू मोड अॉन -›
असा सगऴा प्रकार झाला तर तो. ! ;)
पांडू मोड अॉफ -›
27 Aug 2016 - 8:52 pm | चंपाबाई
जानी आज्जीने जान्या आज्याची सुपारी हडळीला दिलि होती
27 Aug 2016 - 11:03 pm | मुक्त
शेतात खेकडे पकडायला ?
कशाचं शेत?
भाताचे का.