मिपाकरा तुमची कहाणी

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
9 Aug 2016 - 12:01 pm

आमच्या लहानपणी आमची आजी दर रविवारी कहाणी वाचायची. साडेतीन तांदळाचे दाणे हातात घेऊन आम्ही ती एकायचो. हळू हळू तर ती पाठ पण झाली होती कहाणी. श्रावण सुरु झाला की कायम त्याची आठवण होते. हळूहळू मिपाशी एक जिव्हाळ्याचे नाते जोडले जाते आहे... त्या भावनेतूनच ही कहाणी सहज सुचली आणि इथे देत आहे.. गोड मानून घ्यावीत.

**************************************************************************************
एका मिपा करा देवा तुमची कहाणी. आटपाट संकेत स्थळ होत. त्याच नाव मिसळपाव होत. त्यातील सदस्यांची नावं अगम्य होती. हॉटेलात येणाऱ्या-जाणाऱ्यांची आवड विविध.... तरी एक होती. कंपूबाजीची आवड काहीजणांना होती. त्यामुळे काही धाग्यांची चंगळ तर काहींची धावपळ होत होती. मात्र मराठी साहित्याची रेलचेल इथे भरपूर होती.

एकदा काय झालं..... तर काहीच नाही झाल. मागच्या पानावरून पुढचं पान सुरु झाल. साहित्य, काव्य, चर्चेपासून पाक.. तंत्र... भटकंतीपर्यंत नवं लेखन येत राहिलं. संपादक मंडळ चाळणी लावत राहिलं आणि मराठी अभिव्यक्ति स्वातंत्र्य प्रत्येक सदस्याला मिळत राहिलं.

आपली ओळख लपवून किंवा उघड करूनही प्रत्येकजण प्रामाणिकपणे काही ना काही लिहित राहिलं. काहींनी वेळ नसल्यामुळे तर काहींनी नाराजीने संकेत स्थळ सोडलं. पण मिपा करांच्या कमेंट्स विसरण त्यांनाही कधी शक्य नाही झालं.

अशा ह्या मिपा वर कायम त्यांच्या भूत... वर्तमान सदस्यांच खूपच प्रेम राहिलं.

ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

मांडणीविचार

प्रतिक्रिया

बाकी चालू द्या...

संत घोडेकर's picture

9 Aug 2016 - 1:47 pm | संत घोडेकर

केला आहे की,मिपावर 'भूत' सदस्यांचे खूप प्रेम आहे.

मुक्त विहारि's picture

9 Aug 2016 - 6:13 pm | मुक्त विहारि

ते तर आहेच.

स्पा's picture

9 Aug 2016 - 12:25 pm | स्पा

के

अत्रुप्त आत्मा's picture

9 Aug 2016 - 5:23 pm | अत्रुप्त आत्मा

=))

बोके.

बघूया पुढे काय होतं ते !

पैसा's picture

9 Aug 2016 - 1:33 pm | पैसा

गोग्गोड कहाणी. साठ उत्तरांची पांचा उत्तरी केली आहे हे बरोबर. पण संपूर्ण कशी होईल? चालू तर आहे!

विप्लव's picture

9 Aug 2016 - 4:28 pm | विप्लव

कसलं भारी

प्रचेतस's picture

9 Aug 2016 - 4:30 pm | प्रचेतस

हो ना.

खटपट्या's picture

9 Aug 2016 - 8:49 pm | खटपट्या

चांगलंय

जव्हेरगंज's picture

9 Aug 2016 - 9:01 pm | जव्हेरगंज

सरसावून कहाणी ऐकायला बसलो, तर लगेच संपली!

पण भारी आहे!!