तू बोले तो बन जाऊं मैं, बुल्लेशा सौदाई
सूफ़ीज़म एक अनोखा धर्म आहे. अस्तित्त्वाकडे काव्यात्मकतेनं पाहाण्याचा असा दृष्टीकोन दुर्लभ. आपण पुरुष आहोत आणि सर्व प्रकटजग स्त्री आहे. तस्मात, प्रसंग कोणताही असो, जगणं म्हणजे आपण आणि अस्तित्त्वात चाललेली, इष्काची जुगलबंदी आहे. मग प्रत्यक्षात ती, पत्नीशी झालेली ताटातूट असो, आर्थिक आपत्ती असो, शारीरिक दुर्घटना असो की कडेलोटाला नेणारी मानसिक दुरावस्था असो.... अस्तित्त्वानं, किंवा स्त्रीनं, ती आपल्याशी केलेली इष्कबाजी आहे. हा सूफ़ी जगण्याचा अंदाज़ आहे.