मांडणी

टपली अन टिचकी

आदित्य कोरडे's picture
आदित्य कोरडे in जनातलं, मनातलं
19 Mar 2017 - 9:57 am

साधारण १ वर्षापूर्वी(१७ मार्च२०१६) कुबेर गुर्जींनी मदर तेरेसांवर लेख लिहून एकाच दिवसात तो मागे घेण्याची किमया केली होती. आज परत त्यांनी एक लेख लिहिला आहे. लिंक बघा
http://www.loksatta.com/…/singer-nahid-afrin-is-not-afrai…/…
म्हणजे तसा लेख बरा आहे पण त्यातले हे वाक्य वाचून उगाच भ्या वाटतंय. बाबाला परत लेख मागे घेणे, दिलगिरी व्यक्त करणे अशी कसरत करावी लागते का काय कुणास ठावूक! पण तसे करावे लागले तरी तो त्यांचा सभ्यपणा बरका! लगेच असहिष्णुता, अभिव्यक्तिस्वतान्त्र्यावर घाला म्हणून बोंब मारायची नाय... तर वाक्य हे असे

मांडणीप्रकटन

होळीच्या निमित्ताने

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
12 Mar 2017 - 7:47 pm

आपण आजवर अनेक कथा एकल्या आणि वाचल्या आहेत होळी सणासंदर्भात! त्यातली सर्वसाधारणपणे सर्वांनाच माहित असणारी कथा म्हणजे  दुष्ट हिरण्यकष्यपू राजाची! हिरण्यकश्यपू राजाने आपला मुलगा प्रल्लाद श्रीविष्णूचा भक्त आहे हे समजल्यानंतर त्याला मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यातलाच एक प्रयत्न म्हणजे अग्नीमध्ये न जळण्याचा वर मिळालेल्या होलिकेला त्याने प्रल्लादकडे पाठवले. होलीकेने प्रल्लादाला आपल्या मांडीत बसवले आणि चारही बाजुने अग्नी प्रज्वलित करून घेतला. प्रल्लादाने डोळे मिटून श्रीविष्णूची प्रार्थना करायला सुरात केली आणि आपल्या भक्ताची हाक एकून श्रीविष्णूने होलिकेचे दहन केले.

मांडणीविचार

असं का?

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
7 Mar 2017 - 10:17 pm

उद्या आठ मार्च.... त्या निमित्ताने परत एकदा स्त्रीच्या अस्तित्वाचं... तिच्या त्यागाचं... तिच्या संसारासाठी झिजण्याचं आणि झटण्याच.... ती करत असलेल्या सर्वांच्या सेवेचं.... खूप कौतुक होईल! आणि अर्थात ते झालच पाहिजे. Because she deserves it! Rather its her right. पण आपण हे अस स्त्रीच्या स्त्रीत्वाच कौतुक करून तिने कायम सगळ्यांच सगळ केलच पाहिजे ही अपेक्षा करायला मोकळे होतो का?

मांडणीविचार

अल्पसंख्यांकांचा प्रश्न! भाग २

आदित्य कोरडे's picture
आदित्य कोरडे in जनातलं, मनातलं
2 Mar 2017 - 11:27 pm

मागील महिन्यामध्ये ह्या लेखाचा पहिला भाग मिसळपाव वर प्रसिद्ध झाला. त्याचीच लिंक मी WhatsApp आणि फेस बुक वर प्रसिद्ध केली. अपेक्षे पेक्षा जास्त प्रमाणात लोकांच्या प्रतिक्रिया आल्या. हा लेख वाचणारे कामावरचे अनेक सहकारी (ज्यात मुस्लीम सुद्धा आहेत) मला प्रत्यक्ष येऊन भेटून, चर्चा करून आणि प्रतिक्रिया देऊन गेले.काही लोकांचे फोन आले. साहजिक त्यात हा लेख आवडलेले लोक जसे होते तसेच तो न आवडलेले लोकही होते.लेख न आवडलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया किंवा त्यांना लेख न आवडण्यामागचे कारण मी समजू शकत होतो. ते अपेक्षितही होते.

मांडणीविचारलेख

दिल दोस्ती डिकन्स्ट्रक्शन

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
2 Mar 2017 - 4:56 pm

दिल दोस्ती Deconstruction
सध्या भारतात D-construction किंवा बुद्धिभ्रम करणार्‍यांची चलती आहे. जे जे प्रचलित आहे त्याच्या नेमके उलट काहीतरी बोलायचे. समाजात जे शिष्ट संमत आहे त्यावर प्रश्न उपस्थित करायचे आणि फक्त प्रश्नच उपस्थित करायचे. उत्तरे शोधण्याची जबाबदारी मात्र नाही घ्यायची असे सुरु आहे.

मांडणीविचार

डान्सबार !!!!

वरुण मोहिते's picture
वरुण मोहिते in जनातलं, मनातलं
26 Feb 2017 - 6:13 pm

बीप बीप ..पाटील आज फुल्ल करते
बीप बीप ..आज आनेवाले हो ना ?
"आकाश अपडेट देना में निकाल राहा हू "
गाडी नंतर काढू च्यायला तो पर्यंत नेहमीच्या ठिकाणी बसू.
रोजचं झालंय ह्या ऑफिस च्या ड्रायवर ला काही कळत नाही ."ठीक है चलो. पार्क करो और निकलो. "दोस्त आ राहा मै उसकी गाडी से जाऊंगा पता है ना आपको ."
आप" ऋषी के गाडी से आओगे मै थोडी रुक पाऊंगा. "
"हाहाहा "
नेहमीसारखी लेट कारणं मंत्रालयाची ..आम्ही काय पागल बसलोय का ऋषी .
१ व्हॅट ६९ और ४ माईल्ड बोलना.

मांडणीप्रकटन

विजयासाठी - रातीस खेळ चाले ....

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
25 Feb 2017 - 9:19 pm

रातीस खेळ चाले ...
निवडणुकीचा रणधुमाळीत जिल्हा सांगली, शिराळा तालुक्यातील नाटोली परिसरात विरोधकांच्या पाडावासाठी भानामती!
हे शीर्षक असलेले बातमीपत्र दिगंबर शिंदे यांनी सांगलीहून पाठवले होते. (लोकसत्ता शनिवार. दि 25 फेब्रूवारी 2017, पुणे आवृत्ती, पान 8 - राज्यकारण) या बातमीत जणू काही किराणाभुसारी मालाच्या यादीची आठवण व्हावी अशी लांबलचक मागणी वाचून रंजन झाले...

मांडणीबातमी

क्रिकेट रेकॉर्ड - माझी ही एक जिलबी - भाग १ ...

चौकटराजा's picture
चौकटराजा in जनातलं, मनातलं
12 Feb 2017 - 7:44 pm

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत जे जे दारूण पराभव झाले त्यात एक निकष असा धरला की १ डाव व दोनशे धावा अशा किंवा यापेक्षा जास्त दारूण पराभव स्वीकारण्याचे पातक कोणी किती केले आहे ? तर खालील प्रमाणे माहिती मिळते...

ऑस्ट्रेलिया - ५ वेळा
भारत - ७ वेळा
विण्डीज ५ वेळा
इंग्लन्ड ४ वेळा
बांगला देश ७ वेळा
द आफिका २ वेळा
पाकिस्तान १ वेळा
न्युझीलण्ड ३ वेळा
झिम्बाब्वे ६ वेळा
श्रीलंका ३ वेळा

मांडणीप्रकटन

राजीव मल्होत्रा - हिंदूफोबिया

वडापाव's picture
वडापाव in जनातलं, मनातलं
6 Feb 2017 - 1:31 am

मी निरीश्वरवादी माणूस आहे. माझा देवावर विश्वास नाही. देवावर विश्वास नसण्याचं कारण काही सिनेमांत दाखवलं जातं तसं (अष्टविनायक, देऊळ बंद) देवावरच्या रागापोटी नाही, तर देव असल्याचा, मला स्वत:ला पटेल असा शास्त्रसिद्ध पुरावा उपलब्ध नाही म्हणून. देवाचं अस्तित्व असू शकतं, या थिअरीला (सिंद्धांताला) मान द्यायला माझी ना नाही. उद्या मानवजातीला काही पुरावा गवसलाच, तर मी आनंदाने (म्हणजे नाईलाजानेच, पण पद्धत आहे बोलण्याची) माझी मतं बदलेन. पण निरीश्वरवाद्यांमध्ये सुद्धा एकवाच्यता नसते, हे मला जाणवायला काही काळ गेला. आज परिस्थिती अशी उद्भवली आहे, की बहुतेक निरीश्वरवादी माझ्या डोक्यात जाऊ लागले आहेत.

धोरणमांडणीसंस्कृतीधर्मइतिहाससमाजजीवनमानशिक्षणविचारप्रतिक्रियासमीक्षामाध्यमवेधलेखमतशिफारस

मॉन्ट्रीयाल स्क्रू जॉब- फ्री स्टाईल रेसलिंगच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना -2

दाह's picture
दाह in जनातलं, मनातलं
28 Jan 2017 - 7:18 pm

Survival Series चा दिवस उजाडला. मॉन्ट्रीयालमधल्या फॅन्समध्ये प्रचंड उत्साह होता. सर्वजण "त्या" सामन्याची वाट पाहत होते. ब्रेटच्या नावाने जयघोष करत होते. शॉनच्या नावाने "बू" करत होते. त्यातल्या काहींना ब्रेट कंपनी सोडून जात असल्याची कुणकुण लागलेली होती. असेच काही कट्टर WWF समर्थक ब्रेटला " you sold out" म्हणून खिजवत होते. सामन्याच्या सुरुवातीला शॉन मायकल्सची एंट्री झाली. नेहमीप्रमाणे त्याने कॅनडाच्या ध्वजाचा अपमान केला आणि खिल्ली उडवली. प्रेक्षक भडकले. "बूज" वाढले. आणि तितक्यात एंट्री झाली ब्रेटची.

मांडणीमाहिती