साधारण १ वर्षापूर्वी(१७ मार्च२०१६) कुबेर गुर्जींनी मदर तेरेसांवर लेख लिहून एकाच दिवसात तो मागे घेण्याची किमया केली होती. आज परत त्यांनी एक लेख लिहिला आहे. लिंक बघा
http://www.loksatta.com/…/singer-nahid-afrin-is-not-afrai…/…
म्हणजे तसा लेख बरा आहे पण त्यातले हे वाक्य वाचून उगाच भ्या वाटतंय. बाबाला परत लेख मागे घेणे, दिलगिरी व्यक्त करणे अशी कसरत करावी लागते का काय कुणास ठावूक! पण तसे करावे लागले तरी तो त्यांचा सभ्यपणा बरका! लगेच असहिष्णुता, अभिव्यक्तिस्वतान्त्र्यावर घाला म्हणून बोंब मारायची नाय... तर वाक्य हे असे
“आसाममध्ये सध्या अत्यंत लोकप्रिय असलेली गायिका नाहीद आफरीन हिच्याविरोधात ४६ मुस्लीम मौलवींनी काढलेले पत्रक आणि संजय लीला भन्साळी या सुमार चित्रपटकाराच्या ‘पद्मावती’ या आगामी चित्रपटाविरोधात राजस्थानातील कुठल्याशा फुटकळ संघटनेने सुरू केलेले आंदोलन हा तर्कबुद्धीविरोधात सध्या सुरू असलेल्या जिहाद वा धर्मयुद्धाचाच एक भाग आहे...”
तसा गिरीश कुबेर ह्या माणसाबद्दल आपल्याला लई आदर.(होता) त्याची सगळी पुस्तक अगदी विकत घेऊन वाचली. “एका तेलियाने” , “हा तेल नावाचा इतिहास आहे” , “हे युद्ध जीवांचे” “अधर्म युद्ध” ते अगदी हल्ली आलेले “टाटायन”. एकसो एक भारी पुस्तक. मराठीत तरी तेल आणि त्याच्या संघर्षाच्या इतिहासाबद्दल इतर कुणीही काहीही लिहिलेले मला माहित नाही. भाऊने आचार्य रजनिशांची जी बिन पाण्याने केली ते पाहून आपण खुश, माणूस समाजवादी. म्हणजे तसे आपण समाजवादी नाही पण एकंदरीत समाजवाद्यांचे विचार अगदी सगळे नाहीतरी बऱ्याच प्रमाणात आपल्याला पटतात. पण गुदस्त साली माणूस मदर तेरेसांवरचा लेख मागे घेऊन आणि परत वर किरीस्ताव लोकांच्या पाया पडून पवित्र झाला आणि आपला त्याला विटाळ होईल अशे वाटून आपण जरा लांब राहून मजा बघायला लागलो.
मी शाळेत असताना बऱ्यापैकी हुशार विद्यार्थी होतो.( हे माझे वैयक्तिक मत आहे. आमच्या शाळासोबत्यानी दात विचकू नये... बायकोला हे असे सांगायची हिम्मत नाय आणि ती शाळा सोबती पण नाय...असो) म्हणजे अगदी कायम पहिला नाही तरी पहिल्या १०त यायचो, आपला एक लय जिगरी फ्रेंड होता. तो पण तसा आपल्यावाणी हुशार, घरी येण्या जाण्यातला, आई बापाला चांगला म्हाहीत. एकदा घटक चाचणी होती, बहुधा ५वी असेल.त्याला इंग्रजीचा पेपर थोडा अवघड जात होता, त्याने समोर बसलेल्या अनघा बापट नावाच्या पोरीच्या पेपर मध्ये तोंड घातलं अन मास्तरनं धरलं. पोरग या आधी कधी कॉपी न केलेलं त्यामुळे त्याला कुणाला न कळत बघायची ट्रीक माहित नव्हती. मास्तरनी लय हाणला. परत वर पेपर फाडला. आपण घरी येऊन आईला आणि बाबांना सगळी ष्टोरी तिखट मीठ लाऊन सांगितली. दोघांना जरा आश्चर्य वाटल थोडा राग आला, तसा आपल्याला लय चेव चढला अजून काही बाही बोललो असेल ते लक्षात नाही, पण बाबा जे म्हटले ते मात्र कायमच लक्षात राहीलं.
ते म्हणाले, “तू हुशार आहेस, चांगले मार्क पडतात. पेपर सोपे जातात म्हणून तुला कॉपी करायचा मोह होत नाही हे चांगलच. त्याचा अर्थ तू शुद्ध चारीत्र्याचाच आहेस हे खरं. पण तसाच राहशील कि नाही हे कसे कळणार? कधी तुला पेपर अवघड आला आणि आता कमी मार्क पडतील. कदाचित नापास हि होऊ, मास्तर, मित्र, आई, बाबा रागावतील, छी थू होईल असे वाटून समोरच्याचा पेपर बघायचा मोहही जेव्हा होईल तेव्हा तू कसा वागतोस ह्याच्यावर तुझा खरं चारित्र्य ठरेल.”
गिरीश कुबेरचे हि तसेच झाले असावे. नरेंद्र मोदी, भाजप, हिंदुत्ववादी हे तसे SOFT TARGETS, त्यांना लाथा घातल्या तरी तुम्हाला लोक पुरोगामी म्हणणार, पण किरीस्ताव, मुस्लीम तसे नाहीत. त्यांच्या निरीला हात घातला आणि वाट लागली कि राव. लय दबाव आला असल. आपण समजू शकतो पण आमच्या बाबांनी म्हटल्या प्रमाणे कठीण परिस्थितीत तू कसा वागतोस ह्याच्यावरच तर तुझे खरे चारित्र्य ठरते भाऊ.(आता ते लोकमत वाल्यांनी इसीस बद्दल लिहिताना पेपरात लावलेल्या पिगी बँक च्या फोटू वरून माशा उठल्या होत्या तेव्हा त्यांनी पण असच शेपूट घातलं होतं ते उगाच आठवलं...ते कशाला लोकसत्ताच्याच ६ जुलै २०१४ च्या रविवार पुरवणीत संजय पवार ह्यांनी “गरज राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्राची “ म्हणून लेख लिहिला होता. तो आता संकेत स्थळावरून गायब झालाय. – व्हायरस असेल नाहीतर आम्हाला नीट शोधता येत नसेल, माफी मागून मागे घेतला नसता का नाहीतर.... )
---आदित्य
प्रतिक्रिया
21 Mar 2017 - 11:35 pm | सुखी
लिंक?
22 Mar 2017 - 12:01 am | संदीप डांगे
बाकी, लेख काही कळला नाही. पण दोन-तीन ठिकाणी तपशील जरा वेगळा आहे
१. नाहीद आफरीन हिच्याविरोधात ४६ मुस्लीम मौलवींनी काढलेले पत्रक आणि संजय लीला भन्साळी या सुमार चित्रपटकाराच्या ‘पद्मावती’ या आगामी चित्रपटाविरोधात राजस्थानातील कुठल्याशा फुटकळ संघटनेने सुरू केलेले आंदोलन
>> फतवा (प्रत्यक्षात फतवा म्हणजे सजेशन, रोजच्या आयुष्यातल्या प्रश्नांवर कुराणाशी सुसंगत वागणूक कशी असावी ह्याबद्दल मौलवी सुचवणी करतात, ते मानायची कोनतीही सक्ती नसते. पण माध्यमांनी फतव्याबद्दल फारच बोंबाबोंब करुन ठेवली आहे. फतवा हा शब्दही अगदी तल्वार उगारुन यल्गार ओरडत शत्रूची कापाकापी करा असा काहीसा साउंड होतो.) ४६ मुस्लिम मौअलवींनी पत्रक काढले ते गायिकेविरुद्ध नव्हते तर प्रार्थनामंदिरांच्या प्रांगणात, आसपास गाण्याबजावण्याचे कार्यक्रम होऊ नये, ते अल्लास मान्य होणार नाही अशी ती सुचवणी होती. माध्यमांनी त्याच्या राईचा पर्वत केला, तसेच माझ्या अंदाजानुसार इंडियन आयडॉल च्या आयोजकांनी प्रसिद्धीसाठी हा प्रकार केला असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
भंसालीचे सेट जाळणे-तोडफोड प्रकरण प्रसिद्धी मिळवण्यासाठीची निर्ढावलेपणाची अच्युत्तम पातळी असावी. सदर चित्रपट सतत चर्चेत ठेवणे ही गरज आहे. अन्यथा चित्रपट प्रत्यक्ष प्रिमीयर होईपर्यंत कसा असणार आहे हे फक्त दिग्दर्शक व संकलकाला माहित असते. अनेक चित्रपट तर प्रसिद्धी सुरू होण्याआधी पूर्ण चित्रित झालेले असतात. तेव्हा हे नुसते पद्मावतीच्या काल्पनिक कथेवरुन (जी केवळ राजस्थानातल्या फुटकळ गाईडलोकांच्या पोटापाण्याशी संबंधित असावी) एवढा गदारोळ होईल अशी परिस्थिती नाही.
२. लोकमत वाल्यांनी इसीस बद्दल लिहिताना पेपरात लावलेल्या पिगी बँक च्या फोटू वरून माशा उठल्या होत्या तेव्हा त्यांनी पण असच शेपूट घातलं होतं ते उगाच आठवलं
>> शेपूट वगैरे काही घातलं नव्हतं. शेपूट घातलं हा शब्दप्रयोग अतिशय चुकीचा आणि लेखकाला सदर घटना नीट माहिती नसतांना केवळ पूर्वग्रहातून केला गेलेला वाटत आहे. लोकमत पिग्गी बॅन्क प्रकरणात शंभर टक्के लोकमतचीच चूक होती. त्यामुळे त्यांना नमतं घेणे आवश्यक होते, केवळ मुस्लिम होते म्हणून शेपुट घातलं असे म्हणणे जरा जास्तच ताणण्यासारखे आहे.
--------------------
22 Mar 2017 - 3:40 am | अनन्त अवधुत
त्यांनी त्यांचा जुनाच लेख थोडा बदल करून टाकला आहे. त्यांच्या जुन्या लेखात पण हे पिगी प्रकरण होते आणि ते दुरुस्त करतो म्हणाले होते. विषय (कुबेर यांचे लिखाण) आणि लेखाचे शीर्षक पण तेच आहे. जुना लेख
22 Mar 2017 - 2:19 pm | संदीप डांगे
अरेच्या! हो की!
22 Mar 2017 - 12:09 am | आनंदयात्री
हा हा हा! चपखल उदाहरण देऊन मस्त रूट कॉज शोधून काढलेत तुम्ही. हसवलेत.
-
(पहिल्या साठातला शाळकरी)
आंद्या
22 Mar 2017 - 9:35 am | सुखी
Link chalat nahiye, kadachit delete marlay
3 Apr 2017 - 4:47 pm | अमरप्रेम
http://www.loksatta.com/agralekh-news/singer-nahid-afrin-is-not-afraid-of-fatwa-1434941/