डान्स बार २

वरुण मोहिते's picture
वरुण मोहिते in जनातलं, मनातलं
1 Apr 2017 - 3:10 pm

६०% -४०% असा हिशोब असायचा .म्हणजे ६०% त्या मुलीला जिच्यावर उडवणार आणि उरलेले ४०% बार मालकाचे .त्या ६०% मधून पण मुलींना ५०% मिळायचे कारण बाकी वेटर ,छोटे मोठे काम करणारे लोक ह्यावर १०% निघून जायचे .म्हणजे मी ५० हजार उडवले कि मुलीकडे २५ हजार .तर काही लाख एकाच दिवशी उडवल्याने बाईसाहेब आम्हाला पटलेल्या . बाकी प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकून आम्ही आघाडी घेतलेली .ती जरा डिसेंट वागण्याने .कारण माझ्या हाताने पैसे उडव वैगरे प्रकार मी केला नाही मी वेटर ला सांगायचो . काही मोठी लोकं यायची नुसती उडवून जायची . आणि काही तरुण उगाच खुशीत नाचून वैगरे जायचे ते १-२ दिवसात परत दिसायचे पण नाहीत .इकडे जरा अप्पर क्लास बार असल्याने काहीही करणं,कुठलेही चाळे करणं असं काही नव्हतं .
"मैने ना आज वो कलर कि साडी पेहनी है आप आ जाओना" .हे तर नॉर्मल होतं. बरं माणूस जाऊन करणार काय नुसते नजरेने इशारे आणि उडवणे .८-१० मुली मोजून त्यात फुल्ल स्पर्धा उडवण्याची .जरासं अश्लील वाटेल पण तिथून कोणालाही पैसे देऊन बाहेर घेऊन जाण्याची मुभा नव्हती . फक्त तुम्ही उडवा मग बघू .प्रत्येकजण आशेवर . तर हि मला पटलेली .
म्हणजे एकदम विश्वास .एके दिवशी दुपारी होती माझ्यासोबत .फोन आला एक समोरच्याला बोली "वेट कर रही हू आपका"समोरच्याकडे पैसे नसावेत कदाचित . तो आज नही काम है वैगेरे सांगत होता . पण हि मागेच लागली .फोन ठेवल्यावर मी बोलो "क्या है ये ?"त्यावर मला बोली २ जन तो रोज ऐसे होने चाहिये ना !!! देख तू आ आज : वो भी पक्का आयेंगे .ओके बोलो मी . मी गेलो नेहमीसारखा . मला आता उडवायची काहीच गरज नसायची . मूड आला तर नाहीतर माझी स्वतःची बाटली घेऊन मी आरामात बसायचो. (बाहेरची बाटली चालते भरपूर उडवत असतात त्यांना कारण बारचे रेट जास्त होतात ) . त्यात बार मध्ये माहित होतं कि हि माझ्यासोबत असते. तर मी असाच पेग घेऊन बसलो त्या संध्याकाळी .ज्यांचा दुपारी फोन आलेला ते पण आले बिचारे . तिने नजरेने मला सांगितले .२०-२५ हजार प्रत्येकी उडवले दोघांनी . उम्मीद पे दुनिया कायम है !!!!!!!.बदल्यात एक दर्दभरं गाणं अधिक तिला आप मिलो ना कभी मुझे हे वाक्य . सारखं काहीतरी सांगायला बोलवायचे कि कसं जवळ जात येईल . पण ह्या मुली महा चालू असायच्या केस सावरून ऐकतोय असं दाखवून समोरून हसायच्या च्युत्यात गिनती .माणूस भावनिक बिचारा !! हळूहळू बऱ्याचदा दुपारी हि माझ्यासोबत असायची आणि रोज ठरलेले बकरे बुडायचे . मला स्पीकर वरून ऐकवायची लोकं काय म्हणतात ते . मी पण हसण्यावारी न्यायचो .
अजून दोन आयडिया म्हणजे साडी या ड्रेस नया लेना है या ब्युटी पार्लर जाना है .एके दिवशी ब्युटी पार्लर म्हणून बाईसाहेबांच्या अकाउंट ला ३७ हजार जमा झाले ३ वेगवेगळ्या व्यक्तींकडून . ज्यांना हिने नखा ला पण हात लावून दिला नव्हता .म्हटलं ऐश है तेरा . पवई ला गेलो पार्लर च बिल फक्त ६५०० तेव्हा .
आज नयी साडी लेनी है असं बोलल्यावर समोरचा खुशीत . मै भी आता हू बोलायचा त्यावर नही सहेली के साथ जाना है असं म्हणून वेळ मारायची .समोरच्यांकडून २० हजार तरी यायचे . मग माझ्यासोबत बाईसाहेब साडी घ्यायला गेल्या . काही न पाहता घेतली २००० ची . म्हटलं बना और चुत्या तू.
मला बोली वरुण लोग हि ऐसे मिळते है .क्या करू !!!गुड बोलो .अश्या पद्धतीने नातेवाईक किंवा जवळच्या लोकांसाठी रेल्वे विमान ह्याच आरक्षण पण व्हायचं .समोरच्याला गाठून . आणि हे कोण करायचे ज्यांना ती उभं पण नाही करायची कधी . अश्यातच ३१ आला कधी नव्हे ते मी ह्या वेळी मुंबईत होतो नाहीतर घरच्यांसोबत किंवा बाहेर परदेशात असे बरेच ३१ गेलेले . ३१ डिसेंबर म्हणजे चुरशीची स्पर्धा असायची . कोण किती कमावतंय ह्यावर . कारण त्यावर ऑर्केष्ट्रा बार चं आय कार्ड मिळायचं वर्षभरासाठी . म्हणजे पोलीस आले तरी बार ने ज्यांना परवाना दिलाय त्यांना काही होणार नाही . असे तीन परवाने मिळायचे दरवर्षी . साहजिक आहे सगळे आपापल्या लोकांना बोलवायचे काहीही करून . नाव लिहिलेले डब्बे असायचे त्या दिवशी १० -१० लाख एकेक मुलगी कमवायची कमिशन सोडून . खूप मागे लागलेल्या बाईसाहेब ह्यावर्षी माझ्या मागच्या वर्षी गेलो नव्हतो आणि ह्यावर्षी खरंच वेळ नव्हता मुंबईत असून पण . त्यात हिला माहिती कि मी काही उडवणार नाहीये तरी का मागे लागतेय असा विचार आला .
(क्रमशः )
(कमवण्याचा आकडा सोडून हेच पैसे पोलिसांची भीती दाखवून बारमालकांकडून बांधकाम व्यावसायिकांना कसे हस्तांतरित होतात ते हि पुढील भागात )

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

कुंदन's picture

1 Apr 2017 - 3:33 pm | कुंदन

बरीच नव नवीन माहिती मिळतेय.

एकदाच बघितली ब्वा हि दुनिया,
झेपले नाही.

आनन्दा's picture

1 Apr 2017 - 5:33 pm | आनन्दा

वाचतोय..

बऱ्याच दिवसांनी टाकलात दुसरा भाग. पुभाप्र.

मधी इतक्या दिस झोपून राहले का भौ

पैसा's picture

5 Apr 2017 - 1:20 pm | पैसा

वाचताना सगळं भयंकर वाटतंय. आमच्यासारख्या मध्यमवर्गीयांना या जगाची ओळखच नसते अजिबात.

जव्हेरगंज's picture

5 Apr 2017 - 7:50 pm | जव्हेरगंज

जरा हात सैल सोडून लिहा मालक!
अजूनपण काही ठिकाणी अडखळ्यासारखं होतंय.
वेगळ्या दुनियेची ओळख जरा डिट्टेलमध्ये होऊ द्या.
पुभाप्र.

अप्पा जोगळेकर's picture

6 Apr 2017 - 1:51 pm | अप्पा जोगळेकर

अजून येऊ द्या. यावेळी जरा मोठे आहे लिखाण मागच्या वेळेपेक्षा. थोडा विस्कळीत पणा कमी असला तर अजून मजा येईल.