मॉन्ट्रीयाल स्क्रू जॉब- फ्री स्टाईल रेसलिंगच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना -2
Survival Series चा दिवस उजाडला. मॉन्ट्रीयालमधल्या फॅन्समध्ये प्रचंड उत्साह होता. सर्वजण "त्या" सामन्याची वाट पाहत होते. ब्रेटच्या नावाने जयघोष करत होते. शॉनच्या नावाने "बू" करत होते. त्यातल्या काहींना ब्रेट कंपनी सोडून जात असल्याची कुणकुण लागलेली होती. असेच काही कट्टर WWF समर्थक ब्रेटला " you sold out" म्हणून खिजवत होते. सामन्याच्या सुरुवातीला शॉन मायकल्सची एंट्री झाली. नेहमीप्रमाणे त्याने कॅनडाच्या ध्वजाचा अपमान केला आणि खिल्ली उडवली. प्रेक्षक भडकले. "बूज" वाढले. आणि तितक्यात एंट्री झाली ब्रेटची.