असं का?

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
7 Mar 2017 - 10:17 pm

उद्या आठ मार्च.... त्या निमित्ताने परत एकदा स्त्रीच्या अस्तित्वाचं... तिच्या त्यागाचं... तिच्या संसारासाठी झिजण्याचं आणि झटण्याच.... ती करत असलेल्या सर्वांच्या सेवेचं.... खूप कौतुक होईल! आणि अर्थात ते झालच पाहिजे. Because she deserves it! Rather its her right. पण आपण हे अस स्त्रीच्या स्त्रीत्वाच कौतुक करून तिने कायम सगळ्यांच सगळ केलच पाहिजे ही अपेक्षा करायला मोकळे होतो का?

आज एक व्हिडीओ whatsapp वर मला आला. किशोरी शहाणे आणि सचिन खेडेकर दोघे आहेत यात. १ मिनित ४० सेकंदाचा व्हिडीओ आहे. पण त्यात खूप सुंदर गोष्ट इतक्या कमी वेळात चित्रित केली आहे. किशोरी साधारण पन्नाशीची स्त्री आहे; जी तिच्या मैत्रिणींबरोबर गोव्याला चार दिवसांसाठी जाण्याची तयारी करते आहे. तिचा नवरा म्हणजे सचिन खेडेकर तिच्या जाण्याने अस्वस्थ होऊन काहीना काही कारण देत आहे तिने जाऊ नये म्हणून. पण ती शांतपणे गोड हसत त्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करते आणि जाते. एकूण सुखवस्तू कुटुंब आणि साधारण सर्वसामान्य जवाब्दाऱ्या संपल्यानंतर किशोरीने केलेला प्लान... अशी संकल्पना आहे.

व्हिडीओ मस्तच आहे.... पण सहज माझ्या मनात आल.... का बर स्त्रीने तिच्या सर्व जवाबदाऱ्या संपल्या नंतरच स्वतःसाठी जगावं? आपण अनेकदा वयात आल्येल्या आपल्या मुलग्यांना अनेक परवानग्या सहज देतो... कधी मित्रांबरोबर आपला मुलगा थोडं ड्रिंक करून आला तर थोडसं दुर्लक्ष करतो; रात्री उशिरा येण मान्य करतो किंवा कधी कधी तर रात्री अकरा नंतर घराबाहेर मुलगा सहज पडू शकतो. पण यापैकी काहीही आपण आपल्या मुलीला करू देत नाही. जर अशा प्रकारची परवानगी एखाद्या मुलीला मिळत असेल तर ते घर थोड हाय-फाय आहे बरका... अशी चर्चा करायला आपण मोकळे असतो. अर्थात परवानगी न देण्यामागे एक महत्वाच कारण असत आणि ते म्हणजे त्यांची सुरक्षितता. पण मला एक कळत नाही की मुलग्यांना तरी रात्री उशिरा दारू पिताना किंवा drive ला जाताना सुरक्षितता महत्वाची नसते का? जर आपल्या मुलीने आपल्याला आश्वस्त केलं की ती चांगल्या ग्रुप बरोबर आहे आणि थोडं ड्रिंक्स घेणार आहे.... तर आपल्याला ते पटत नाही. रात्री ती उशिरा येणार त्यावेळी तिची सुरक्षितता जेवढी आपल्या मनात असते तितकीच सोसायटीमध्ये कोणाच्या लक्षात आल तर लोकं काय म्हणतील याची देखील आपल्याला काळजी असते. पिंक सिनेमात देखील अशाच प्रकारचे विचार मांडले आहेत. केवळ ती कधीतरी अल्कोहोल घेते किंवा रात्री उशिरा बाहेर जाते... तिला मुलगे मित्र आहेत म्हणून ती वाईट वळणाची असेल... असा सरसकट विचार करणारे दुसरे तिसरे कोणी नसून आपणच आहोत. मुलगी घरी उशिरा येणारी असली तर तिच्या नोकरीची वेळ उशिराची असावी हे एकच कारण आपण मान्य करतो. अस का?

शिक्षण संपल्या नंतर चांगली नोकरी मुलाने मिळवली की आपल्यला खूप आनंद होतो. आपण त्याच कौतुक करतो. नोकरीमुळे मुलगा खूप बिझी होतो. त्याला त्याच्या मित्र-मैत्रीणीना भेटायला वेळ मिळत नाही. मग तो शनिवार-रविवार संध्याकाळ-रात्र बाहेर जातो. अशावेळी जर आपल्या घरी पाहूणे आले तर आपण त्यांना सांगतो की तो आठवडाभर बिझी असतो फक्त शनिवार-रविवारच मिळतो न त्याला मित्रांना भेटायला; म्हणून तो गेला आहे. मात्र अशीच छानशी नोकरी मिळालेली आपली मुलगी जर पाहूणे येणार असले तरी बाहेर जायला निघाली तर आपण तिला जाऊ देतो का?

मुलाने चांगल शिक्षण घ्यावं आणि योग्य करियर करावं... बाकी त्याला फार प्रश्न विचारले जात नाहीत... अशीच मानसिकता आपण आपल्या मुलीसाठी खरच ठेवतो का?

खूप केलस इतरांसाठी ... आता स्वतःसाठी जग!!! हे म्हणताना अगोदर तिने दुसऱ्यांसाठी जगण अपेक्षित आहे का कुठेतरी? याचा आपण आपल्या मनात विचार करायला हवा का?

मांडणीविचार

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

7 Mar 2017 - 10:30 pm | कविता१९७८

जोपर्यन्त स्त्री स्वत:हुन या मुद्यान्चा विचार करत नाही तो पर्यन्त बदल घडुन येणार नाही

रेणुका शहाणे आणि सचिन खेडेकर यांचा अभिनय छान आहे .

मराठी कथालेखक's picture

8 Mar 2017 - 4:13 pm | मराठी कथालेखक

स्त्री आणि पुरुष दोघांसाठी काही एक चौकट आहे. मी त्याचं समर्थन करतो आहे असं नाही. पण 'चौकट आहे' आहे आणि ती मोडून जगणं दोघांसाठीही अवघडच आहे.
उदा: शिक्षण - किती मुलांना आपल्या आवडीचे शिक्षण घेण्यास मुभा / प्रोत्साहन मिळते. एखादा हुशार मुलगा जर कला शाखेला जात असेल तर सर्वसाधारणपणे मध्यम वा उच्च मध्यम वर्गातील घरातून त्याला विरोध होतो कारण मुलाने जास्त कमवता येईल असेच क्षेत्र निवडणे अपेक्षित असते.
करिअर न करण्याचे स्वातंत्र्य : एखादी मुलगी स्वेच्छेने नोकरी करत नसेल वा अगदी कमी पगाराची नोकरी करत असेल तरी तिला तसे करण्याचे स्वातंत्र्य आहे. आज स्त्री अनेक क्षेत्रांत आहे आणि तिचं त्याबद्दल कौतुकही होतं आहे, पण त्याच वेळी अनेक घरांत मुलगी काहीच करिअर करत नाही आणि तसं करण्याचं स्वातंत्र्य तिला आहे. असं स्वातंत्र्य पुरुषाला आहे का ? किंवा त्याने तसं केलं तर त्याची निंदाच होते ना ?
अजुनही काही मुद्दे येवू शकतील.. तुर्तास इतकंच म्हणायचं आहे की लिंगावर आधारित मांडणी / चौकट दोघांसाठी केलेली आहे !!
बाकी पिंक मध्ये जे दाखवलं आहे त्याचं समर्थन करणं कठीण आहे... त्या मुली त्या मुलांना प्रथमच भेटत असतात आणि या पहिल्या भेटीत त्या मुलांच्या रुम्सवर जातात..