नग्नता आणि मुक्ती

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
14 Dec 2016 - 3:00 pm

इथल्या जैनीजमवर आलेल्या एका तद्दन पोस्टवर बरीच सांगोपांग चर्चा झाली. त्यात अनेक सदस्यांनी नग्नता आणि मुक्तीच्या संबंधाविषयी कुतुहल प्रकट केलं होतं. त्या निमित्तानं ही पोस्ट.

प्रथम महावीराचा अध्यात्मिक विचार समजून घेऊ. महावीराच्या दृष्टीनं आपलं शरीराशी झालेलं तादात्म्य हा स्वरुपोलब्धितला एकमेव अडसर आहे. त्यामुळे त्याची सर्व साधना, शरीराशी झालेलं तादात्म्य संपवण्यावर केंद्रित आहे. तदनुसार, केश विमोचनादी अत्यंत क्लेशदायी साधना दिगंबर पंथात आल्या आहेत. शारीरिक क्लेषातून तादात्म्य मुक्ती आणि तादात्म्य मुक्तीमुळे स्वरुपोलब्धी अशी दिगंबर पंथीयांची प्रक्रिया आहे.

स्वतः महावीरानं अत्यंत खडतर साधना केली. सर्व साधना शरीरविरोधी असल्यामुळे त्या निसर्गविरोधी आहेत कारण शरीर हा संपूर्ण प्राकृतिक फिनॉमिना आहे. उपासतापास, अनवाणी चालणं, शरीराला कमालीचे क्लेश देणं अशा प्रक्रिया करुन महावीरानं खडतर तप केलं. एकदिवस महावीर केवळ एका वस्त्रानिशी पर्वतावर ध्यानासाठी निघाला असतांना, ते वस्त्र एका काटेरी झुडूपात अडकलं. महावीराकडे ते एकच वस्त्र होतं, पण जितका त्यानं ते सोडवायचा प्रयत्न केला तितकं ते जास्त अडकत गेलं. शेवटी झुडूपाला त्रास होईल या विचारनं, महावीरानं ते वस्त्र सोडून दिलं आणि त्याचा देह संपूर्ण नग्न झाला. त्याच्या मनात कमालीची अनुकंपा निर्माण झाली. आता महावीराकडे काहीही उरलं नाही. खडतर तपामुळे तो दैहिक तादाम्यापासून बराचसा मुक्त झाला होता आणि आता संपूर्ण नग्नतेमुळे मनापासूनही मुक्त झाला. अशाप्रकारे महावीर सिद्ध झाला. त्या दिवशी नेमकी अमावस्या होती. साधारणतः सर्व सिद्ध प्रकृतीला अनुसरुन साधना करतात त्यामुळे पौर्णिमेला, जेंव्हा प्रकृती आपल्या भरतीवर असते तेंव्हा सिद्ध होतात. पण महावीराची साधना, अशरण या भूमिकेवर बेतली असल्यानं, तो अमावस्येला सिद्ध झाला. अध्यात्मात, अमावस्येला एखादा सिद्धत्त्वाला पोहोचल्याचं, महावीर हे एकमेव उदाहरण समजलं जातं.

अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरीग्रह आणि ब्रह्मचर्य ही पाच शिलं महावीरानं जरी सांगितली असली तरी अहिंसा हे परम तत्त्व मानलं जाण्याचं कारण सुद्धा महावीराला काटेरी झुडूपाविषयी वाटलेली अनुकंपा हेच मानलं गेलं आहे.

महावीराच्या विचारसरणीत एक मोठा दोष आहे. स्त्री देहाला रजोवृत्ती आणि जनन या प्रक्रियांवर मात करता येणं असंभव आहे. त्यामुळे स्त्रीयांना देहाशी तादात्म्य तोडणं अशक्य आहे अशी त्याची धारणा होती. तदनुसार, महावीराच्या दृष्टीनं स्त्रीला सांप्रत जन्मात मुक्त होणं अशक्य आहे. आणि तिला मुक्त होण्यासाठी पुरुष देहात जन्म घ्यावा लागेल अशी धारणा बनली.

अर्थात, ती धारणा चूक आहे हे बुद्धानं सिद्ध करुन दाखवलं. कारण देह स्त्री आहे की पुरुष यानं काही फरक पडत नाही. देहाशी तादात्म्य श्वासामुळे आहे ही उघड गोष्ट त्यानं दाखवून दिली. त्यामुळे विपश्यना ही बुद्धाची अध्यात्मिक साधना प्रचलित झाली.

आपल्याकडे दिगंबर जैनांचे मुनी म्हणजे सर्व साधना टो-टो फॉलो करण्याचा विनोदी प्रकार करतात. त्यांना वाटतं की शारीरिक क्लेष करत करत, सरते शेवटी नग्न होण्यातच सर्व इतीश्री आहे. तशात, जैन समाजात अशा मुनीवरांचा प्रचंड आदर केला जातो, त्यामुळे त्यांना मागे हटणं पण शक्य होत नाही.

थोडक्यात, नग्न होण्यात नाही, तर देह आणि मन यापासून विलग होण्यात सिद्धी आहे ही गोष्ट त्यांना समजणं मुश्कील आहे.

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

त्याकाळी जोरदार विरोध करणारा कुणी पुढे आला नव्हता.

त्याच्या उदात्तीकरणाला विरोध व्ह्यायला हवा.

ज्योति अळवणी's picture

14 Dec 2016 - 3:27 pm | ज्योति अळवणी

बरीच माहिती कळली. वाचलं पाहिजे

पैसा's picture

14 Dec 2016 - 4:41 pm | पैसा

पौर्णिमा, अमावस्या वगैरे काही गोष्टी पटल्या नाहीत. पण माहिती इंटरेस्टिंग नक्कीच आहे. तुम्ही तुकड्या तुकड्यात चांगलं लिहिता. यावेळी प्रतिक्रियांमधे वाद होणार नाहीत एवढी काळजी घ्या. उत्तम चर्चा होऊ शकते.

प्रसाद गोडबोले's picture

14 Dec 2016 - 4:48 pm | प्रसाद गोडबोले

महावीराच्या दृष्टीनं स्त्रीला सांप्रत जन्मात मुक्त होणं अशक्य आहे. आणि तिला मुक्त होण्यासाठी पुरुष देहात जन्म घ्यावा लागेल अशी धारणा बनली.अर्थात, ती धारणा चूक आहे हे बुद्धानं सिद्ध करुन दाखवलं.

ह्याचे रेफरंसेस पहावे लागतील. बुध्द धर्मात स्त्रीयांची नक्की काय स्थिती होती हे पहावे लागेल . कारण

हे मिपावरच वाचल्याचे आठवते : http://www.misalpav.com/node/14266

(३) बुद्ध आणि त्याचे स्त्रीयांविषयी विचार
बुद्धाला स्त्रीयांनी संघात यावे असे मुळीच वाटत नव्हते. त्याचा विरोधच होता. त्याला जीने वाढविले त्या त्याच्या वृद्ध मावशीलाही तो संघांत घ्यावयाला तयार नव्हता. केवळ पट्टशिष्य आनंद याच्या आग्रहाने तो तयार झाला. पण त्याने स्त्रीयांकरिता जाचक नियम घातले. खरे त्यांना दुय्यम म्हणावी अशीच वागणुक दिली जावयाची. स्त्रीया "अर्हत" होवू शकत नाहीत. याची अंतीम पायरी म्हणजे पुढील जन्मात बुद्ध पशु-योनीतही जन्मला पण कधीही स्त्री योनीत जन्मला नाही ! त्याने असेही म्हतले की " मी स्त्रीयांना प्रवेश देतो आहे, पण यामुळे ५०० वर्षातच संघ मोडेल, नाही तर तो १००० वर्षे टिकेल." त्याची वाणी खरी ठरली. बुद्धाच्या निर्वाणानंतर ५०० वर्षात महायान पंथाची स्थापना झाली व बौद्ध धर्माची फाटाफुट झाली. भारतात बौद्ध धर्म तेंव्हापासूनच फोफावला पण मुसलमानांनी गंधार प्रांतात बौद्धांचा नायनाट केला व नंतर बौद्ध धर्म भारताबाहेर मोठ्या प्रमाणात गेला ; भारतात नामशेष झाला.

माहितगार's picture

14 Dec 2016 - 5:09 pm | माहितगार

लेखाचे शीर्षक सार्वत्रिक स्वरुपाचे आहे पण धागा लेख मात्र केवळ विशीष्ट धर्मीयांना लक्ष्य करुन लिहिला गेल्याचे दिसते. अगदी एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धा पर्यंत दिगंबरावस्थेची उदाहरणे हिंदू संत मुनींमध्येही दिसतात. त्यातील काही आजही पुजनीय समजल्या जातात.

दुसरे मुक्ती या शब्दास अधिक अर्थछटा आहेत. असो.

भौतिक गोष्टींचे आकर्षण सोडताना वस्त्रांनाही भौतिक आकर्षण समजणे आणि त्याचा त्याग करणे आणि अशा संतमुनींना फालो करणे अथवा मुक्तीच्या युरोपीयन अर्थछटेसाठी मुक्त होणे ज्याच्या त्याच्या विश्वास आणि श्रद्धेचा भाग आहे. अर्थात अशा कृतीला कर्मकांड म्हणून स्विकारल्याने अध्यात्मिक मुक्ती मिळेलच असे नाही या धागा लेखकाच्या म्हणण्याशी सहमत आहे.

त्यामुळे फोकस जैन दिगंबरपंथी साधनेवर आहे. कुणाला टार्गेट करणं किंवा पूजनीयतेचा प्रश्न नाही. एखाद्या साधनेच्या अंधानुकरणाच्या विफलतेचा आहे.

अर्थात, ते तुम्हालाही मंजूर आहे :
अर्थात अशा कृतीला कर्मकांड म्हणून स्विकारल्याने अध्यात्मिक मुक्ती मिळेलच असे नाही या धागा लेखकाच्या म्हणण्याशी सहमत आहे.

संदीप डांगे's picture

14 Dec 2016 - 5:16 pm | संदीप डांगे

आडंबरसे परे, अध्यात्म बहुत अलग है| बहुतोंके लिए लेकिन, आडंबरही आध्यात्म है|

लेख सुंदर संजयजी!

अत्रुप्त आत्मा's picture

14 Dec 2016 - 6:40 pm | अत्रुप्त आत्मा

पांडूऊऊऊऊऊऊ... .

प्रत्येक सजिवाचा मृत्यु, आत्मा,शरीर,पुनर्जन्म आणि कर्म,असमानता याची उकल कोणालाच करता आली नाही. मला समजले सांगणारे ,दावा करणारे म्हटलं तर योग्य ठरेल असे पुढे आले. त्यांनी जी काही रचना समजावली अथवा समजावण्याचा प्रयत्न करत होते तरी आतून त्यांची स्वत:चीच खात्री पटली होती की मला खरेतर काहीच समजले नाहीये. ते गप्प बसले.इतरांनी मात्र खटाटोप चाली ठेवण्यासाठी निरनिराळ्या क्लुप्त्या लोकांच्या माथी मारल्या.बाकी शून्य.

संजय क्षीरसागर's picture

14 Dec 2016 - 7:11 pm | संजय क्षीरसागर

शरीरे आणि मने अनेक आहेत. अध्यात्म हे कर्म, असमानता, पुनर्जन्म वगैरे गोष्टींची उकल करत नाही . तो आत्म्याचा शोध आहे.

पण ते जाउं दे . नग्नता आत्म्याच्या शोधात उपयोगी होते किंवा कसे हा सदर लेखाचा विषय आहे.

माहितगार's picture

14 Dec 2016 - 8:06 pm | माहितगार

आपल्या शोधाचे उत्तर मिपावर कितपत मिळेल याची शंका वाटल्यामुळे इंग्रजी विकिपीडियावर घेतला गेलेला संदर्भ स्रोत शोधला. चंपत राय जैन यांच्या १९२६च्या संन्यास धर्म या पुस्तकाच्या पृष्ठ ४० वर जैन धर्मातील या संबंधीच्या भूमिकेची मांडणी दिसली.

मला वाटते पिडीएफचे पृष्ठ क्र. ४० आहे आणि पुस्तकातील पृष्ठ क्र. ३२ आहे.

होय. आत्मा आहे हे प्रथम धरले आहे जैन धर्मात. कर्मही धरले आहे.पुनर्जन्म अर्थात आहेच.आहे म्हटल्यावर शोध आलाच.

Ram ram's picture

14 Dec 2016 - 9:14 pm | Ram ram

Yach level chya pratikriya apekshit ahe. Khup sundar mudda ahe. He nehmich khatkat ale ahe. Tarun Sagar mhantat Anek panthamule manse dur geli tar tyanni kapade ghalun kranti karavi.mala alpsankhyank lokanchi kiv yete

साहना's picture

15 Dec 2016 - 12:39 am | साहना

नग्नते ला विरोध हि एक व्हिक्टोरिअयन नैतिकता आहे, शेकडो वर्षांच्या गुलामगिरी मध्ये राहणाऱ्या भारतीय आणि त्यातल्या त्यात स्वतःला संस्कृती रक्षक म्हणवणाऱ्या लोकांनीच हि नैतिकता internalize केली आहे. पुराणकाळांत विमाने आणि टेस्टटूब बेबी होती ह्यावर ह्यांचा विश्वास बसतो पण गे लोक किंवा लैगिक स्वातंत्र्य होते ह्यावर विश्वास बसत नाही. विरक्ती, वैराग्य ह्या विषयी तर ना बोललेलंच बरे.

एक नग्न जैन मुनी मागे गोव्यांत आले होते तेंव्हा चर्चने आणि काही हिंदू संघटनांनी त्याचा घोर विरोध केला होता. पण त्या विरोधास ना जुमानता काँग्रेस चे श्री दिगंबर कामत (ह्यांचे नाव दिगंबर आहे) ह्यांनी त्या मुनींची भेट घेतली.

जैन धर्मा बद्दल मला विशेष काही ठाऊक नसले तरी त्यांच्या संतांची नग्न राहण्याची परंपरा भारताच्या संस्कृतीस धरूनच आहे आणि त्यांना तो अधिकार १००% राहावा असे मला वाटते.

तांत्रिक साधनेत वस्त्रत्याग हे एक प्रतीक आहे. समाजाचे असे काही अलिखित नियम असतात हे नियम पाळून आपण समाजाचे एक भागीदार/सदस्य बनतो. ह्या बहुतेक नियमांत व्यक्तीचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जाते. पण त्या बदल्यांत समाजापासून एक सुरक्षा आम्हाला मिळते. उदाहरणार्थ चोरी अनैतिक आहे असे आम्हाला मान्य करावे लागते बदल्यांत आमच्या घरातून कोणी काही चोरून नेट असल्यास लोक चोराला पकडण्यास पुढे सरसावतात. लग्न फक्त एकाच व्यक्तीशी करता येते पण एकदा लग्न केल्यानंतर शारीरिक संबंधांना इतर लोक पूर्ण मान्यता देतात, लहान मुलांना वाढविण्यास मदत करतात इत्यादी. लज्जा रक्षणासाठी वस्त्र सुद्धा समाजाचाच असा एक नियम आहे. वस्त्र त्याग, स्मशानात राहणे इत्यादी प्रतीकातून तांत्रिक लोक आपण समाजाच्या नियमन मनात नाहीत आणि समाजापासून होणाऱ्या इतर फायद्यांचा लाभ हि घेणं नाहीत असे दाखवून देतात.

जो पर्यंत जैन मुनी आपल्याला पाहिजे असेल तेंव्हा कपडे आणि सार्वजनिक ठिकाणी नग्नता अश्या प्रकारची दुट्टप्पी भूमिका घेत नसतील. द्रव्य संचय इत्यादी गोष्टी करत नसतील तर माझ्या मते त्यांच्या नग्नतेकडे आपण दुर्लक्ष केलेलेच बरे.