इंटरव्यू
• कुठले आपण? / मी गुजरातचा, अहमदाबाद. मोदींच्या गावा जवळचा :)
• कधी आलात दुबईत? / ४ महिने झाले साहेब.
• कोणी केला वीसा? / माहीत नाही, मी डीपोझिट
भरले आहे फक्त इतकच माहीत्ये.
• बर बर, घरी कोण कोण असतं? / ३ मुली आहेत मला आणि बायको
• बायको काम करते की घरीच असते? / तिला इथून समोरचा रस्ता क्रॉस करायचं म्हणालं तरी ठाकेल ती!
• का बरं, काही प्रोब्लेम आहे का? / अपंग आहे, पाय नाहीत तिला दोन्ही…
• लग्ना नंतर अपंग झाली की लहानपणी? / लहानपणी… काहीतरी औषधांचा डोस जास्त झाला औषधांचा आणि पाय गेले त्यात.