पुण्यातील माहिती अधिकारी कार्यकर्त्याच्या हत्येचे गूढ

योगेश कोकरे's picture
योगेश कोकरे in काथ्याकूट
10 Aug 2016 - 12:54 pm
गाभा: 

सध्या एक जुनी बातमी वाचली ,,,पुण्याच्या एक RTI कार्यकर्ते ची हत्येच्या तपासाची.......
तो कार्यकर्ता एका रोड बनवणाऱ्या कंपनीने अवैधरित्या संपादित केलेल्या जमिनीची माहिती बाहेर काढत होता. जेव्हा त्या कंपनी चे गैरव्यवहार बाहेर पडायला सुरवात झाली ,,,त्या नंतर लगेचच या कार्यकर्त्याला पुण्यात अतिशय क्रूर पद्धतीने मारून टाकण्यात आले . त्या नंतर पोलिसानी ज्या पद्धतीने तपास केला त्याचे परिणामी CBI कडे case सोपवण्यात आली. त्या कार्यकर्त्याच्या सख्या भावाने त्याचा लढा पुढे चालू ठेवलाय. तो highcourt मध्ये स्वतः म्हणणे मांडतोय.आणि सगळ्यात वाईट म्हणजे cbi ने पण त्याला आता ठेंगा दाखवलाय . CBI केस बंद करायच्या विचारत आहे म्हणजे बंदच केली होती ,पण त्या सख्या भावाने पुन्हा कोर्टात पिटीशन दाखल करून CBI ला CASE तपास करायला भाग पाडले.

कार्यकर्त्याच्या हत्येला 5 वर्ष उलटून गेल्यावर पण काहीच तपास नव्हता . त्या सख्या भावाचा संशय त्या रोड बनवणाऱ्या कंपनी च्या मालकावर होता ,ती कंपनी महाराष्टाली खूप मोठी रोड बनवणारी कंपनी आहे.ज्यात खूप मोठया लोकांचे आर्थिक हितसंबंध गुंतले आहेत.
एखाद्या चित्रपटाला शोभेल अश्या काही गोष्टी या case मध्ये घडल्या आहेत.
आता सगळ्या पात्रांची नावं सांगतो.
ज्याचा खुन झाला ते सतीश शेट्टी
त्यांचा सख्खा भाऊ संदीप शेट्टी
रोड बनवणारी कंपनी IRB इन्फ्रा.
कंपनी चे मालक वीरेंद्र म्हैसकर.
या हत्येची पार्श्वभूमी बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती असेल .
सतीश शेट्टी RIT कार्यकर्ते होते.irb इन्फ्रा ने मुंबई पुणे द्रुतगती मार्ग या शेजारील गावात अवैधरित्या जमीन संपादित केली होती असा सतीश शेट्टी ना संशय होता . माहितीच्या अधिकाराखाली त्यांनी सगळी माहिती मागवली आणि त्यांच्या लक्षात आले कि इथे काही काळेबेरे कारभार चाललाय.ज्यामध्ये सरकारी अधिकारी ,irb इन्फ्रा चे अधिकारी ,राजकीय लोक यांचे हितसंबंध गुंतले होते. त्यांनी irb विरोधात complaint दाखल केली. त्यानंतर त्यांना IRB कडून साम, दाम,दंड ,भेद हि नीती अवलंबली गेली. आधी धमकीवजा समाजवण्यात आले.तरी ते ऐकले नाहीत. मग 2 कोटी ची लाच देण्याची गोष्ठ झाली ती हि त्यांनी नाकारली. मग त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यांनी मग पोलीस संरक्षण मागितले कारण त्यांना काही लोकांकडून धोका होता .त्या लोकांची नावे पण त्यांनी पोलिसांना लिहून दिली . तरीपण त्यांची हत्या करण्यात आली.
या नंतर या हत्येचा तपास सुरु झाला.

तपास करणारे अधिकारी यांनी जणू आधीपासूनच ठरवले होते कि काही लोकांना जाणूनबुजून वाचवायचे आहेत.त्या साठी त्यांनी बनावट साक्षीदार तयार केले.त्यात त्यांना यश आले नाही. त्यात एक चमत्कार घडला .राज्य सरकार ने हा तपास CBI म्हणजे देशाची सर्वोच्च तपास यंत्रणे कडे कोणीही मागणी न करता सोपवली. त्या वेळी गृहमंत्री होते आपले आबा .जे आता आपल्यात नाहीयत. CBI कडे CASE गेली कि लोकांना वाटते कि आता दुध का दुध और पाणी का पाणी होते.तसंच सतीश शेट्टी यांचे भाऊ ना पण वाटले ,आणि तपासाची सूत्रे cbi ने मुंबईच्या STF कडे दिली . STF ने चालढकल केली त्यात एक वर्ष गेलं ,त्यानंतर HIGH कोर्ट मध्ये STF म्हटले कि आम्हाला लोंकांची चौकशी करायची आहे,तेव्हा HIGH कोर्ट ने ताशेरे ओढत म्हटले कि या लोकांची नावे संदीप शेट्टी ने एक वर्षांपूर्वी तुम्हाला
सांगितली आहेत .आणि तुम्ही एकवर्ष नंतर तीच नावे आम्हाला सांगताय .मग तुम्ही एक वर्ष काय केलं? अशी ऑर्डर पण त्यांनी दिली ,याची दखल CBI चे एक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेऊन STF कडून तपास काढून घेतला आणि पुण्याचा ACB कडे दिला.नंतर तपासाणे जोर धरला. IRB च्या कार्यालयांवर छापे टाकले .खुप गोष्टी पुढे आल्या. परंतु त्यानंतर CBI च्या वकिलांनी कोर्टात ARGUMENT करणंच
बंद केलं.का कोणास ठाऊक,

थोड्याच दिवसांनी हि case बंद करायचा निर्णय cbi ने घेतला.
परंतु संदीप शेट्टी यांनी हार न मानता पुन्हा कोर्टाचे दरवाजे ठोठावले .पुन्हा नव्याने पिटीशन दाखल केली . आणि त्यात रिस्पॉन्डन्ट म्हणून cbi चे डायरेक्टर ,आणि तपास करनारे अधिकारी यांना केले.त्यावेळी कोर्टाने पण संदीप शेट्टी ना विचारले कि
आपण इतक्या वरिष्ठ पातळीच्या लोकांना कसे काय रिस्पॉन्डन्ट करू शकता...त्यावेळी संदीप यांनी स्वतः कोर्टाला आपले म्हणणे पटवून दिले व कोर्टाने हे मान्य केले.
आणि आता height म्हणजे CBI हि CASE पुन्हा रेइन्वेस्टीगेट करणार आहे.म्हणजे इतके वर्षे cbi काय भाकऱ्या थापत होते कि काय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

यात हितसंबंध कसे काय आहेत आणि कोनाकोनाचे आहेत याचा थोडा अभ्यास केला तर असे दिसून येते कि आपल्या देशातील खुप मोठ्या मोठ्या लोकांचा हात आहे.
देवेंद्र म्हैसकर जे फोर्ब्स मासिकानुसार देशातील पहिल्या 50 श्रीमंत लोकांमध्ये आहेत. आणि श्रीमंतीचे रहस्य काय तर रोड तयार करायची मोठी मोठी कंत्राट याना मिळत गेली. Virendra हे नवीमुंबई येथील एका कॉलेज मध्ये डिप्लोमा झालेले आहेत.

त्यानंतर ते त्यांच्या कौटुंबिक व्यवसायात दाखल झाले. वीरेंद्र म्हासीस्कर चे वडील कंत्राटदार असताना ते मुंबई मध्ये स्थायिक होते.शिवसेना भाजपा च्या जवळचे होते .ह्या हितासंबंधाच्या जोरावर त्यांनी युतीच्या सरकार वेळी खूप मोठी कंत्राटे मिळवली .आणि त्यावेळी महाराष्ट्र सरकार मध्ये बांधकाम व परिवहन मंत्री होते नितीन गडकरी . साहजिक गडकरी यांच्या संमती शिवाय इतकी मोठी कंत्राट मिळणं शक्य नव्हतं. आणि नितीन गडकरी यांचे सुपुत्र देखील या कंपनी च्या भगिनी कंपन्या मध्ये डायरेक्टर बॉडी वर होते असा एक आरोप आहे . या कंपनी मध्ये शरद पवार यांचे पण हजारो शेर आहेत आणि हे त्यांनी जाहीर केले आहे.
त्यात आता पुन्हा युतीचे सरकार आहे . आणि राज्यातली व्यक्ती नितीन गडकरी आता केंद्रात आहेत . साहजिक त्यांचे वजन केंद्रात खुप आहे.

योगायोग बघा , जसं केंद्रात bjp सरकार आले तसं सतीश शेट्टी case मध्ये cbi काम करणं बंद झालंय, म्हणजे ते मनापासून काम करत नाहीय. त्यांना हि case काहीही करून बंद करावी असे आदेश आहेत असाही आरोप संदीप शेट्टी यांनी केला आहे.

इतकं सगळं लिहायचं कारण कि आपल्या देशात विश्वास ठेवायचा तर कोणावर . राज्यसरकार,राज्यपोलिस, तपास यंत्रणा,राज्यकर्ते,CBI, CID, मंत्री कि आणखी कोण?
आपण अराजकतेकडे वाटचाल करत आहोत का?
असे आणखी 14 rti कार्यकर्ते यांचे बळी गेलेत,,,,त्यांचा तपास शुन्य
दाभोलकर गेले, कलबुर्गी गेले,पानसरे गेले,
यांना जेम्स बॉन्ड ने मारले काय?
कि कोणीही या गोष्टींचा छडा लाऊ शकत नाही
का यांनी सर्वांनी स्वतः स्वतः च्या हत्या केल्या,,,सलमान खान case मध्ये चिंकारा काळविटाने पिस्टल ने आत्महत्या केली का?कि फुटपाथ वर झोपलेले लोक स्वतः सलमानच्या गाडीखाली गेले. न्याय लवकर मिळत नसेल तर लोकांनी किती दिवस कोर्टाच्या पायऱ्या झिजवायच्या,,,,स्वतः च्या नोकऱ्या सोडून नुसतं कोर्ट कचेरी करायची,,,,आणि यासाठी जो पैसा लागतो तो आणायचा कोठून?
एकंदरीत माझा स्वतःचा विश्वास या देशावरूनच उडालाय ...इथे पैसा फेको तमाशा देखो असाच प्रकार चाललेय. ज्याच्याकडे पैसा ,सत्ता त्याच्याकडे न्याय . आता तीन महिन्यापूर्वी सतीश शेट्टी प्रकरणामध्ये पहिली अटक झाली आहे आणि ज्यांना अटक झालीय ते आहेत याच case चे तपास करणार पुणे ग्रामीण पोलिसांचे अधिकारी. यांनी जाणीवपूर्वक बोगस पुरावे तयार करून खोटी case तयार केली.मूळ पुरावे नष्ट केले.चुकीचा तपास केला. ANi या हत्येत indirect सहभाग असल्याचा या वर आरोप आहेत. संदीप शेट्टी यांच्या मते हे दोन अधिकारी irb चे पुण्यातले हस्तक असून या case मधले खुप छोटे मासे आहेत. हत्या होऊन 5 वर्ष उलटलेली आहेत.पुढे काय होईल माहित नाही.

मिपा करानो आपल्याला काय वाटते , या प्रकरणात तसेच या सारख्या दुसऱ्या प्रकरणात न्याय मिळायची शक्यता किती आहे? कि जिथे इतके मोठे लोकांचे लागेबांधे असतात .

प्रतिक्रिया

तुम्ही पण आमच्याच पंगतीतले दिसता.

ताजा कलम....

पुढच्या महिन्यात आमचा एक नातेवाईक पण देश सोडून चालला आहे.तो बहूदा परत येणार नाही.

असो,

तुमच्याकडे, सत्ता आणि पैसा असेल, तर आणि तरच, ह्या देशांत तुम्ही समाधानाने राहू शकता.

स्पा's picture

10 Aug 2016 - 2:12 pm | स्पा

भारतमाता कि जय

मुक्त विहारि's picture

10 Aug 2016 - 7:19 pm | मुक्त विहारि

एका ट्रकच्या मागे एक वाक्य लिहिले होते.

१०० में से ९९ बेईमान,

मेरा भारत महान.

योगेश कोकरे's picture

10 Aug 2016 - 2:46 pm | योगेश कोकरे

विश्वास जरी उडाला असला तरी देश माझा आहे.घरात घुशी लागल्या म्हणून कोणी शेजारी राहायला जात नाही . आणि जे जातात ते त्या घराचे कधीच नसतात . पुरुषार्थ पळून जाण्यात नाही तर परिस्थितीचा सामना करण्यात आहे . असो बाहेर जाऊन आपल्या देशाला विसरू नका आणि त्याचे नाव कसे मोठे होईल या साठी प्रयत्न कराल अशी अपेक्षा.

साहेब..'s picture

10 Aug 2016 - 2:54 pm | साहेब..

घरात घुशी लागल्या म्हणून कोणी शेजारी राहायला जात नाही . आणि जे जातात ते त्या घराचे कधीच नसतात . पुरुषार्थ पळून जाण्यात नाही तर परिस्थितीचा सामना करण्यात आहे

अशी पुस्तके वाक्य अजूनही फेकून मारू शकतो, आजूबाजूची परीष्टीती वेगळी आहे साहेब

गणामास्तर's picture

10 Aug 2016 - 3:23 pm | गणामास्तर

त्यांना पण थोडी मजा करू दे कि. चांगले करमणूकप्रधान प्रतिसाद लिहीत आहेत, तेवढाचं आमचा पण विरंगुळा.

जयंत कुलकर्णी's picture

10 Aug 2016 - 5:39 pm | जयंत कुलकर्णी

कोकरे साहेब... प्लेगमधे घरदार सोडून जावेच लागते की नाही ?.. :=) या विषयावर एक स्वतंत्र लेख लिहिने तेव्हा या बाबतीतील माझी मते स्पस्ट करेन.. हे आपले करेक्शन करावी म्हणून लिहिले आहे... :-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Aug 2016 - 8:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>> पुढच्या महिन्यात आमचा एक नातेवाईक पण देश सोडून चालला आहे.तो बहूदा परत येणार नाही.

आपणासही जावं असे वाटत असेल तर मन:पूर्वक शुभेच्छा. देशाबद्दल वाईट बोलणारे आम्हाला नकोच आहेत.

आम्ही आमच्या देशात सुखी आहोत. धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

कटू सत्य पचवायची ताकद प्रत्येकात असतेच असे नाही.

================

१. "स्वदेशी"चा मंत्र जपत गांधींनी स्वराज्य मिळवले आणि आज भारतात प्रत्येक व्यक्तीकडे एक तरी परदेशी वस्तू असतेच.

२. इथे एखादा राजकीय पुढारी "रस्ता-रोको" कधीही घडवू शकतो.

३. इथे एखादा वरिष्ठ पोलीस अधिकारी एखादे कुटुंब पार उद्वस्थ पण करू शकतो.

४. समान नागरी कायदा स्थापन करायची अजूनही ह्या देशाला हिंमत नाही.

५. खनिज तेल आयात करावे लागते, म्हणून आपण खनिज तेलाचा वापर कमीत-कमी केला पाहिजे, इतकी पण देशहिताची जाणीव इथल्या बर्‍याच लोकांकडे नाही.

६. काश्मीरच्या बाबतीत तर सगळाच सावळा-गोंधळ गेली ६०-६५ वर्षे सुरु आहे.

७. एकही शेजारी देश मित्र नसलेला हा एक देश आहे.(नेपाळ आधी होता पण आजकाल नेपाळचे आणि चीनचे संबंध, भारत-नेपाळ मैत्रीपेक्षा फार वेगळ्या पातळीवर आहेत.सध्या नेपाळवर चीनचे गारूड आहे.चीन ते काठमांडू एखादा राष्ट्र मार्ग जरी तयार झाला तरी त्यात नवल वाटायला नको आणि त्या मार्गावरून चीनचा माल नेपाळ मध्ये खपायला लागला तरी त्यात नवल नाही.)

८. आयातीच्या प्रमाणात निर्यात नाही.

९. "निकालाला लागलेला विलंब, हा पण एकप्रकारचा अन्यायच," हे पण ह्या देशातील एक ठळक उदाहरण.

१०. एखादा नेता नवा पक्ष स्थापन करतो आणि मग बेरजेचे राजकारण करायला तो पक्ष दुसर्‍या पक्षांत विलिन करतो.

==================

जे नंदाच्या काळात घडले तेच सध्या घडत आहे, तरी पण तुम्हाला असे वाटत असेल की हा देश उत्तम आहे, तर तुमचे मत तुमच्यापाशी.

"आपणासही जावं असे वाटत असेल तर मन:पूर्वक शुभेच्छा."

तुमच्या सारख्या मंडळींचे आशीर्वाद पाठीशी असल्यावर अजून काय हवे?

तुम्ही जसा मला उपयुक्त सल्ला दिलात, तसा माझा पण एक सल्ला.

कृपया खालील पुस्तके जरूर वाचा.देशा बाबत चाणक्याने फार अभ्यास केला आहे.किंबहूना माझा देश योग्य मार्गाने जात आहे का? आणि इथली पुढची पिढी अधिकाधिक सार्वजनिक हिताच्या गोष्टी करणार आहे का? ह्याचा आढावा वेळोवेळी घ्यायला ही ३ही पुस्तके मला तरी उपयोगी पडली.

१. कौटिलीय अर्थशास्त्र. (प्रस्तावना दूर्गा भागवत, सरिता प्रकाशन)

२. संपूर्ण चाणक्य नीति (डॉ. इंदूभुषण बडे, मनोरमा प्रकाशन)

३. सुत्रे चाणक्याची सुत्रे गव्हर्नन्सची. (डॉ. वसंत गोडसे, परम मित्र पब्लीकेशन)

========

वरील प्रतिसाद हा बिरुटे सरांनाच आहे,

कारण, "वादे वादे जायती संवादः" हा अनुभव मी सरांबरोबर बर्‍याच वेळा घेतला आहे.

भलेही आमचे मुद्दे एकमेकांना पटोत न पटोत, पण आम्ही दोघेही त्यात वैयक्तिक काहीच आणत नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Aug 2016 - 10:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> माझा देश योग्य मार्गाने जात आहे का ?
हो जात आहे.

>>>>इथली पुढची पिढी अधिकाधिक सार्वजनिक हिताच्या गोष्टी करणार आहे का?

करणार आहे.

जसा आहे, तसा. आणि आहे तो माझा देश भविष्याच्या दृष्टीने योग्य आणि उत्तम मार्गाने चालला आहे, जात राहणार आहे. असतील काही उणिवा तर त्याही दूर होणारच आहेत. मी माझ्या देशाचा फक्त गेल्या शंभर वर्षाचा इतिहास चाळला आहे, बदलतोय माझा देश. आणि माझा देश मोठी दमदार पावलं भविष्याच्या दृष्टीनेही टाकत चालला आहे, ज्यांना वाटतं या देशात राहावं त्यांनी राहावं, ज्यांना वाटत नाही, हा देश आपल्या योग्येतेचा नाही, त्यांनी स्वतःहून चालतं व्हावं. हमे अपने हाल पर छोड़ दो. आम्ही आमचं पाहुन घेऊ. आम्ही आमच्या देशात कसं राह्यचं ते.....!

-दिलीप बिरुटे

तुम्ही तितपतच मागे गेला असाल ह्याची कल्पना होती...

म्हणूनच तर वरील १० मुद्दे गेल्या १०० वर्षाच्या आसपासचेच दिले आहेत.

आणि त्या मूद्द्यांचे तुम्ही खंडण पण केलेले नाही.

"बदलतोय माझा देश."

ते तर आम्ही रोजच बघतो, मग ती दिव्यातली दंगल असो किंवा मुझफ्फर नगर मधील किंवा काश्मीर मधला वाढता हिंसाचार किंवा मग ह्या देशात असलेले आणि वाढत चाललेले बांगला देशीय.

खेदाने म्हणावे लागते की, आमच्या वेळेचा भारत असा न्हवता.

नावातकायआहे's picture

11 Aug 2016 - 5:57 am | नावातकायआहे

ज्यांना वाटत नाही, हा देश आपल्या योग्येतेचा नाही, त्यांनी स्वतःहून चालतं व्हावं. हमे अपने हाल पर छोड़ दो. आम्ही आमचं पाहुन घेऊ. आम्ही आमच्या देशात कसं राह्यचं ते.....!

प्रा.डॉ शी बाडिस...

उडन खटोला's picture

10 Aug 2016 - 10:43 pm | उडन खटोला

>>>आपणासही जावं असे वाटत असेल तर मन:पूर्वक शुभेच्छा. देशाबद्दल वाईट बोलणारे आम्हाला नकोच आहेत.

हे असंच लिहिलो तर प्रतिसाद संपादित झाला, 'व्यक्तिगत टिप्पणी टाळा' म्हणून...

अनिरुद्ध.वैद्य's picture

10 Aug 2016 - 8:59 pm | अनिरुद्ध.वैद्य

.

आपला निराशावादी!

जयंत कुलकर्णी's picture

10 Aug 2016 - 9:30 pm | जयंत कुलकर्णी

मुवि,
मी तुमच्या पंगतीतला नाही पण विश्र्वात अब्जावधी लोकांनी स्वतःची रहाती ठिकाणे सोडली आहेत, देश सोडले आहेत ते चांगले आयुष्य जगता यावे म्हणून. देश सोडणे ही काही महान महत्वाची गोष्ट नाही. आपल्याला शक्य असेल तर, मानाने जगता येत असेल, उत्तम जीवन जगता येते असेल तर जरुर स्थलांतर करावे या मताचा मी आहे. पण सवीस्तर मत परत केव्हा तरी. आणि उरला प्रश्र्न नावे ठेवण्याचा.... आपण आणि आपल्या वाडवडिलांनी वाईट गोष्टींना नावे ठेवली नाहीत, म्हणूनच ही परिस्थिती ओढवली आहे.... :-) ठेविले तैसे रहावे ही वृत्ती तुम्ही ठेवायलाच हवी असे मुळीच नाही.

आता यावर तुम्ही काय करता हा प्रश्न कृपया विचारु नये. कारण त्याचे उत्तर फार मोठे आहे...

मुक्त विहारि's picture

10 Aug 2016 - 10:15 pm | मुक्त विहारि

हा प्रश्र्न मी कुणालाच विचारत नाही.

कारण,

जो तो त्याला/तिला योग्य वाटेल असाच निर्णय घेत असतो.

जयंत कुलकर्णी's picture

10 Aug 2016 - 10:19 pm | जयंत कुलकर्णी

मुवि, अहो, हे वाक्य तुम्हाला नाही. जे असा प्रश्न विचारतात त्यांना उद्देशून लिहिले आहे.... :-)

मराठमोळा's picture

11 Aug 2016 - 9:20 am | मराठमोळा

जयंत कुलकर्णींशी सहमत. बाहेरच्या (स्पेशली विकसित) देशात कायमचे स्थलांतर करणेही मोठी नसली काही सोपी बाब नाही (वर्क विजा वर जाणे वेगळे). तसेच ते कुणालाही जमेल असे अजिबात नाही. नोकरी (हवी तशी लांबची गोष्ट), घर मिळवणे भारतापेक्षा जास्त कठीण आहे असा वैयक्तीक अनुभव. कल्चरल डिफरंसेस संभाळणे, मुले वाढवणे अशा अनेक अवघड गोष्टी आड येऊ शकतात. पण रस्ते व फुटपाथ, वीज, ईंटरनेट, पाणी, खाजगी आणी सार्वजनिक वाहतूक (जॅम असली तरी सुसह्य), पोलीस, हेल्थकेअर, अँब्युलंस, सुरक्षितता, कचरा नियोजन व स्वच्छता, खाद्यपदार्थ आणी औषधांवर कडक नियम, शहरांचे नियोजन, प्रदूषणावर मात आणी आणखी बरंच काही भारताच्या तुलनेत (वादग्रस्त ठरू शकते पण खात्री बाळगा) उच्च दर्जाची/चे आहेत हे नक्की.

अवांतर :
मिपावरील काथ्याकुट आणी न्युज चॅनेलवरच्या बातम्या पाहिल्या की चीडचीड, फ्र्स्ट्रेशन,ब्लड प्रेशर वाढू शकते.
मला वाटतं सध्यातरी काथ्याकुट विभाग सोडून ईतर विभांगामधे तात्पुरतं स्थलांतर करावं. =))

जनहित मे जारी. =))

संदीप डांगे's picture

10 Aug 2016 - 9:35 pm | संदीप डांगे

हे हे, मुवि साहेब, खरंच तुम्ही शिफ्ट व्हायचा विचार सुरु करा. ह्या देशावरुन विश्वास उडालेली माणसं 'अधिक घाण' करायला नकोतच इथे. परिस्थिती आहे ती आहेच, पण विश्वास उडालेल्या माणसांकडून काही विधायक होण्याची शक्यता अजिबात नसते. मी जेव्हा जेव्हा समाजासमोर हरल्याचा विचार करतो, काहीच बदलू शकत नाही असे वाटायला लागते तेव्हा तेव्हा मला तीन माणसे नेहमीच लख्खकन आठवतात. पहिले शिवाजी महाराज, दुसरे बाबासाहेब आंबेडकर आणि तिसरे महात्मा फुले. ह्या तिघांनी ज्या परिस्थितीत व्यवस्था एकशे ऐंशी अंशात फिरवली ते बघता समाजासमोर, देशाच्या विदारक समस्यांसमोर हतबल होऊन विश्वास उडणे ह्या सारख्या भावना मनाला दुरुन देखील हुंगत नाहीत. त्या तिघांनी 'ह्या देशाचे काही होऊ शकत नाही' असा विचार केला असता तर...? (असे आणखी हजारो आहेत. मला नेहमी हे तिघे आठवतात इतकेच.)

अधिक घाण बद्दल: अधिक घाण म्हणजे अशी विश्वास उडालेली माणसे जिथे तिथे करवादत अधिकाधिक अविश्वासाचं वातावरण निर्माण करुन तसा दॄष्टीकोन बनवण्यास, तशी जीवनशैली बनवण्यास हातभार लावत असतात. मानसिक खच्चिकरण झाले तर कितीही ताकद असो काहीच विधायक घडणे शक्य नसते. विश्वास नसेल तर फक्त ४८० सैनिक ९१ हजारांना शरणागती घेण्यास भाग पाडू शकत नाही, कोणी मांझी भलाथोरला पर्वत कापून रस्ता करु शकत नाही.

चांगले काही घडतंच नाही, निव्वळ वाईटच घडते अशी मानसिकता पसरत जाणे देशाच्या समस्यांमधे अधिकची वाढ करणे हेही आहे. ज्याप्रमाणे असामाजिक घटक समस्या वाढवतात तर त्या समस्या वाढवायला लागणारे उचित वातावरण अशी हतबल झालेली, करवादणारी माणसे तयार करत असतात हे विसरु नये.

त्यामुळे लवकर निघा, सुखरुप पोचा, आणि काळजी घ्या. तिकडे काही बरेवाईट झाले तर भारतात सुखरुप परत येण्यास मदत केली नाही म्हणून भारतसरकारच्या नावाने शिमगा करु नका म्हणजे मिळवली...

जोरदार टाळ्या

सुंदर भाषण

संदीप डांगे's picture

10 Aug 2016 - 10:07 pm | संदीप डांगे

सुंदर भाषण?? बरं बरं...

स्पाराव, एक यादी बनवा बरं. आजपर्यंत देशात भ्रष्टाचारामुळे मारल्या गेलेल्या आणि खूप प्रसिद्धी मिळालेल्या व्यक्ती व दुसरी भ्रष्टाचाराविरुद्ध खमकी लढत दिलेली आणि अजूनही जीवंत असलेल्या व्यक्ती.

सुबोध खरे's picture

11 Aug 2016 - 9:33 am | सुबोध खरे

ह्या तिघांनी ज्या परिस्थितीत व्यवस्था एकशे ऐंशी अंशात फिरवली
अहो आपला समाज चुंबक सूची सारखा आहे. कितीही फिरवा तरीही परत मूळ पदी परत येतो. आपल्याला चार शिवाजी महाराज आणि दहा महात्मा फुले आणि वीस डॉ आंबेडकर लागतील मूलभूत विचारसरणीत फरक करायला.

मुक्त विहारि's picture

11 Aug 2016 - 9:54 am | मुक्त विहारि

कितीही फिरवा तरीही परत मूळ पदी परत येतो."

+ १

संदीप डांगे's picture

11 Aug 2016 - 10:04 am | संदीप डांगे

अच्छा, म्हणजे आपल्यावर परत मुसलमानांचे राज्य आले आहे, दलितांना परत पूर्वीसारखं वागवलं जात आहे आणि मुली परत घरात कोंडल्या गेल्या आहेत असं वाटतं काय आपणास?

संजय पाटिल's picture

12 Aug 2016 - 4:31 pm | संजय पाटिल

प्रतिवाद..

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Aug 2016 - 1:36 am | डॉ सुहास म्हात्रे

अच्छा, म्हणजे आपल्यावर परत मुसलमानांचे राज्य आले आहे, दलितांना परत पूर्वीसारखं वागवलं जात आहे आणि मुली परत घरात कोंडल्या गेल्या आहेत असं वाटतं काय आपणास?

खरे साहेबांना काय म्हणायचे आहे याबाबत तुमचा थोडासा गैरसमज झाला आहे असे वाटते ! मला ते म्हणणे वेगळे आहे असे वाटते.

जरा असा विचार करून पहा...

भारतात कालमानाप्रमाणे जुलूम करणारे बदलत गेले आहेत आणि बर्‍याचदा त्यांची जुलूम करण्याची पद्धत बदलत गेली आहे... पण जुलूम सहन करण्याची आणि/किंवा त्यासंबंद्धी आपल्यात बदल घडवून आणण्याची जनतेची मनःस्थिती तशीच राहिली आहे.

शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ आंबेडकर आणि इतर अनेकांनी समाजाला जागे करून त्याच्या ताकदीची आणि जबाबदार्‍यांची जाणीव करून नवचैतन्य निर्माण केले. जनतेनेही त्यांच्या कार्यकालात प्रगती केली. मात्र या महामानवांचा कार्यकाल समाप्त झाला आणि समाजाच्या प्रगतीला खीळ बसत गेली आहे... बर्‍याच मुद्द्यांवर समाज तेथेच थांबला आहे किंवा त्याच्या प्रगतीचा वेग नगण्य होत गेला आहे. त्यापेक्षा वाईट म्हणजे, नंतर आलेल्या काही नेत्यांनी त्या महामानवांच्या चळवळीचे अपहरण करून, मुळ मुद्द्याचे भ्रामक स्वरूप दाखवून, जनतेला भरकवटून आपल्या व्यक्तीगत हितसंबंधांच्या दिशेने वळवले आहे. मुख्य म्हणजे जनता विकासाचा मूळ मार्ग सोडून; जाणून-न जाणून-दबून राहून-आंधळेपणे आपल्या नवीन नेत्यांची तळी उचलत राहिली आहे आणि म्हणून मार्गभ्रष्ट होत गेली आहे. याचा परिणाम जनतेच्या विकासाचा दर खुंटण्यात झाला आहे*.

सद्या तर, "पाचेक वर्षांतून एकदा मतदान करून (किंवा न करूनही) निवडून दिले म्हणजे आपले नेते आपोआप संत-सज्जन बनतील आणि जनतेच्या भल्याचीच कामे करतील; जनतेला काही करायची गरजच नाही; जनतेने शिस्त, प्रामाणिकपणा आणि कायदा पाळणे यासारखे किमान मूलभूत गुणधर्म स्वतःत बाणून घेण्यासारख्या गोष्टींची गरज नाही"; हाच विचार आपल्या जनमानसात रुजलेला आहे. थोडक्यात, "असेल माझा हरी, तर देईल मला खाटल्यावरी." हे कळत-नकळत आपल्या मनावर बिंबले आहे. रोजच्या व्यवहारातले अगदी साधे उधाहरण द्यायचे झाले तर : रस्त्यावरच्या कचर्‍याबद्दल 'सकारण' तक्रार करणार्‍या आणि त्याबाबत सरकार/सिस्टिमला जबाबदार मानणार्‍या लोकांपैकी बर्‍याच जणाना मूळातच आपण रस्त्यावर कचरा टाकू नये हे पटवून द्यावे लागते, आणि दरवेळेस ते त्यांना मान्य होईलच असे नाही ! मग, यापेक्षा मोठ्या मुद्द्यांचा व्यक्तीगत स्वार्थापुढे जाऊन विचार करणे कठीण होत असले तर आश्चर्य कसले ?! :(

महामानव आपल्या कालखंडात जनतेला योग्य दिशा दाखवून त्यावर कसे जायचे हे दाखवून देऊ शकतात. पण, वस्तूस्थिती हीच आहे की महामानवही शेवटी मर्त्य मानवच असतात, त्यांनाही त्यांचा काल संपल्यावर या पृथ्वीचा निरोप घेणे भाग असते. देश, समाज सतत पुढे जायचा असेल तर समाजातल्या सर्वच लोकांनी दाखवलेल्या मार्गावरून पुढे जाणे जरूर असते... किंबहुना त्या मार्गात जरूर ते बदल करून प्रगतीला अधिक विकसित करणे जरूर असते.

हे नाते काहीसे खेळातल्या प्रशिक्षक/कर्णधार व खेळाडू यांच्या सारखे असते. प्रशिक्षक/कर्णधार मार्गदर्शन करतो, कर्णधार तुमच्या बरोबर खेळही करेल, पण त्यांच्यापैकी कोणीही प्रत्येक खेळाडूचा व्यक्तीगत खेळ करू शकत नाही. प्रत्येक खेळाडूला आपला खेळ स्वतःच उत्तम करायचा असतो. किंबहुना, मिळालेल्या मार्गदर्शनाचा फायदा घेऊन जनतेतील प्रत्येकाने आपापली जबाबदारी स्वतः उचलली तरच टीम, समाज, देश पुढे जात राहतो. या बाबतीत आपण भारतीय खूप मागे आहोत, हे सत्य नाकारण्यात काहीच अर्थ नाही. कारण, सत्य स्विकारणे ही सुधारण्याची पहिली पायरी असते.

+++++++++++++++

* : देशाच्या सुधारणेला लागणार्‍या वेळेच्या लांबीसंबंधी आणि नागरिकांच्या सामाजिक-राजकिय जाणिवेसंबंधी थोडीशी तुलना :

नॉर्वे हा देश ८ मे १९४५ पर्यंत डेन्मार्क, स्वीडन व जर्मनी या देशांच्या प्रत्यक्ष जोखडाखाली होता किंवा ब्रिटनसारख्या देशाच्या अवैध राजकिय दबावाखाली होता. भारताप्रमाणेच झगडा करून तो १९४५ मध्ये स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र झाला. या वेळेपर्यंत नॉर्वे हा देश अविकसित (त्यावेळेपर्यंत 'विकसनशिल' हा फसवा शब्द वापरात आलेला नव्हता) देश होता.

या पार्श्वभूमीवर खालील सत्ये पाहणे रोचक ठरेल :

१. साधारणपणे भारताच्या स्वातंत्र्याच्या आसपासच्या काळात नॉर्वेला स्वातंत्र्य मिळाले आहे.
२. नॉर्वेतली लोकशाही, राजकीय व्यवस्था (गव्हर्नन्स) आणि भ्र्ष्टाचारमुक्तता जगातल्या पहिल्या तीनात गणली जाते.
३. आजमितीला नॉर्वे जगातल्या सर्वात जास्त विकसित देशांमध्ये गणला जातो.
४. आजमितीला नॉर्वे जगातच नव्हे तर युरोपातही सधन राष्ट्र समजले जाते... ते केवळ देशाच्या जीडीपी किंवा गंगाजळीमुळेच मुळेच नाही तर सर्वसामान्य नॉर्वेजियन नागरिकाचे वार्षिक उत्पन्न सुमारे $७०,००० असल्याने आहे... (सधनतेची समान वाटणी).

हे असे का ? याचा थोडा अभ्यास केला तर त्यामागे खालील महत्वाची कारणे दिसतात...

१. नॉर्वेला स्वातंत्र्य मिळवून देण्यार्‍या आणि त्याचे सुरुवातीचे सरकार चालवण्यार्‍या नेत्यांनी जनतेला केवळ स्वातंत्र्यासाठी उत्तेजित केले असेच नाही तर :
(अ) देशाच्या लोकशाहीची घडी नीट बसविण्यासाठी आवश्यक ती "निस्वार्थ काळजी" घेतली, आणि
(आ) जनतेला "आपल्या" देशाच्यासंबंधीचे हक्क, जबाबदार्‍या आणि कर्तव्ये योग्य रितीने आणि प्रामाणिकपणे समजावून दिली.

२. जनतेने आपल्या जबाबदार्‍या आणि कर्तव्ये योग्य रितीने आणि प्रामाणिकपणे पार पाडली आणि जरूर तेथे आपल्या वैध हक्कांसाठी आग्रह धरला... आणि हे आजतागायत सतत चालू आहे.

यासंबंधीचा माझा व्यक्तीगत अनुभव :

ओस्लोच्या भेटीत तेथे गेली २५ वर्षे रेस्तराँ चालवणार्‍या एका पाकिस्तानी वंशाच्या नॉर्वेजियन नागरिकाशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली होती. त्याच्या शब्दात सांगायचे झाले तर, "साब इधर बहुत हाय टॅक्स है (नॉर्वेमधिल कराचे प्रमाण जिडीपीच्या ४२.२% आहे. व्यक्तिगत कर सरसकट {फ्लॅट} २८% आहे.)। लेकीन बदलेमे सरकार इतनी सुविधा देती है की उसके बारेमे कोई शिकायत नही। फिरभी हमारे देशोंमे और इधरमे एक बहुत बडा फरक है। इधर हमारे एरियाके एमपीने अगर काम नही किया तो हम उसकी कॉलर पकडके सवाल कर सकते है।" विकसित आणि सधन देशांच्या सूचीतील नॉर्वेच्या उच्च स्थानाचे रहस्य या चार साध्या सोप्या वाक्यांत दडले आहे.

...त्या नॉर्वेजियन नागरिकाच्या शेवटच्या वाक्यातील कृती (हे भारतिय एमपीच्या बाबतीत करणे केवळ दिवास्वप्नच असू शकते. पण,) आपण आपल्या शहरातल्या कॉर्पोरेटरच्या संदर्भात करतो आहोत अशी कल्पना (तीही केवळ कल्पनाच करू शकतो म्हणा) करून पाहिले तर... या प्रतिसादातले सुरुवातीपासूनचे सगळे मुद्दे समजून घ्यायला सोपे जाईल ! :(

झेन's picture

13 Aug 2016 - 7:04 am | झेन

सुंदर आणि नेमके

त्यापेक्षा वाईट म्हणजे, नंतर आलेल्या काही नेत्यांनी त्या महामानवांच्या चळवळीचे अपहरण करून, मुळ मुद्द्याचे भ्रामक स्वरूप दाखवून, जनतेला भरकवटून आपल्या व्यक्तीगत हितसंबंधांच्या दिशेने वळवले आहे. मुख्य म्हणजे जनता विकासाचा मूळ मार्ग सोडून; जाणून-न जाणून-दबून राहून-आंधळेपणे आपल्या नवीन नेत्यांची तळी उचलत राहिली आहे आणि म्हणून मार्गभ्रष्ट होत गेली आहे. याचा परिणाम जनतेच्या विकासाचा दर खुंटण्यात झाला आहे
हि तर दुखरी नस आहे डॉक्टर साहेब. राज्य असो व देश कुठली हि गोष्ट लोकसहभागाशिवाय सुधारणार नाही. पारतंत्र्यात निदान स्वातंत्र्याचे स्वप्न तरी होते. आज असे मोटिव्हेशन नाही. प्रचंड क्षमता असूनही गुणात्मक सुधारणा नाही.

सुबोध खरे's picture

13 Aug 2016 - 12:06 pm | सुबोध खरे

एक्कासाहेब +१०००००००००
एक्का साहेबांचे लेखन सुस्पष्ट,मुद्देसूद आणि आशयघन असल्याने त्यात काही अधिक उणे करणे शक्यच नसते. अजिबात वितंडवाद न घालता संयत आणि सुसंस्कृत भाषेत कसे लिहावे याचा हा एक उत्तम वस्तुपाठ लोकांनी गिरवावा असाच आहे. आम्ही त्यांच्या लेखनाचे सुरुवातीपासून "फॅन" आहोत.

नेहमीप्रमाणे "बूल्स आय."

"भारतात कालमानाप्रमाणे जुलूम करणारे बदलत गेले आहेत आणि बर्‍याचदा त्यांची जुलूम करण्याची पद्धत बदलत गेली आहे... पण जुलूम सहन करण्याची आणि/किंवा त्यासंबंद्धी आपल्यात बदल घडवून न आणण्याची जनतेची मनःस्थिती तशीच राहिली आहे."

+ १

दुसरी भ्रष्टाचाराविरुद्ध खमकी लढत दिलेली आणि अजूनही जीवंत असलेल्या व्यक्ती.

- सुब्रमण्यम स्वामी
- अण्णा हजारे
- सुचेता दलाल

संदीप डांगे's picture

12 Aug 2016 - 5:16 pm | संदीप डांगे

धन्यवाद ढेरेसाहेब!

लढून जिवंतही राहता येतं ह्याची हि यादी पुरावा आहे,

पब्लिक सपोर्ट हा मोठ्ठा मुद्दा असतो, एकांडे शिलेदार सतीश शेट्टी होतात हे लक्षात घेतले पाहिजे! हे कोणत्याही देशात होऊ शकते!

अनुप ढेरे's picture

12 Aug 2016 - 5:54 pm | अनुप ढेरे

माझ्या मते नुस्तं चांगल्या मनाचं/इंटेंशनच असून भागत नाही. गां*त दम तर लागतोच पण भरपूर बुद्धीपण लागते.

हायला लईच डायरेक्ट बोला तुमि, पण बरोबर बोलत। प्रामाणिक लोक खामकी हवी तसेच त्यांच्या माग जनता पण उभी हवी। कारण सतीश शेट्टी सुद्धा धाडसी होते। काही वर्षांपूर्वी अण्णा हजारे यांना केंद्र सरकार ने अटक केलेली आणि जेंव्हा जनक्षोभ उसळला, तेंव्हा सरकार चा नाकींनव आले। तेंव्हा इंडिअन एक्सप्रेस मध्ये आलेल्या बातमीचा heading होत ""Anna arrests Government" , त्यावेळी खूप आनंद झालेला जो पूढे फार काळ टिकला नाही। पण लोकांचा पाठिंबा आलेले खामकी लोक सरकार ला घाबरवू शकतात हे पटल। कोल्हापूर चा टोल विरोधी लढा याची साक्ष देतो.

उडन खटोला's picture

12 Aug 2016 - 6:14 pm | उडन खटोला

राजकारण असंच खेळलं जातं राजे. नुसतं धाडस असून उपयोग नाही. भांडून डोकी फोडून काही होत नाही. योग्य व्यक्ती पर्यंत माहिती पोचवणे नि आपण बाजूला होणे सुद्धा कधी तरी आवश्यक असते.

अवांतर - नाना पाटेकर एका पक्षाच्या व्यासपीठावर जाऊन फटके देऊन येतो. मजा वाटते.

चौकटराजा's picture

10 Aug 2016 - 9:54 pm | चौकटराजा

निर्लज्जपणा !

कल्पक's picture

15 Aug 2016 - 8:04 am | कल्पक

सगळ्यांना प्रथम स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा! या लेखातली कथा चीड आणणारी आणि व्यथित करणारी आहे. राजकीय आणि आर्थिक दांडग्या लोकांसमोर सामान्य माणूस आणि न्यायव्यवस्था दबली जातेय ही दुर्दैवी पण वस्तुस्थिती आहे. अन्याय करणारे राजकीय/औद्योगिक धन दांडगे असतील तर सामान्य माणसाला न्याय मिळणं खरंच खूप कठीण झालंय हे वास्तव नाकारता येत नाही. पण अशा परिस्थितीत सुद्धा दुर्दम्य आशावाद बाळगणारी चांगली माणसं, संस्था, उपक्रम, संघटना, सुधारक आहेत म्हणून सकारात्मक, संरचनात्मक गोष्टी सुद्धा घडत आहेत हे ही खरं. द बेटर इंडिया या फेसबुक पानावर अनेक सकारात्मक उपक्रम प्रसारित होत असतात. असो. प्रगतिशील आणि निखळ बुद्धिमत्तेवर आधारित शिक्षण/नोकरीच्या संधी, भ्रष्टाचार मुक्त व्यवस्थेत जीवन जगण्याचा अनुभव अशा कारणांसाठी (भारताविषयी नकारात्मक भाव न बाळगता) जर कोणी परदेशगमन करत असेल तर त्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. पण परदेशात जाऊन भारताला नावं ठेवणारी लोकं आणि भारतात राहून परदेशी जाणाऱ्यांना किंवा परदेशी लोकांना नावं ठेवणारी लोकं, दोन्हीही चूक. जसं अमेरिकेत सगळंच छान हा गैरसमज तसंच भारत हा एकमेव वैभवशाली आणि महासत्ता हा सुद्धा अवास्तव समज. आंधळं आणि अभिनिवेशपूर्ण परदेशप्रेम किंवा स्वदेशप्रेम दोन्हीही अवास्तव आणि दांभिक. परदेशात गेलेले सगळे देशद्रोही आणि शरीराने स्वदेशात राहणारे सगळे देशभक्त हा सुद्धा एक मोठा गैरसमज. गेली पाच वर्ष अमेरिकेत राहताना आणि त्याआधी भारतातील विविध भागात राहताना, फिरताना अनेक निरीक्षणं नोंदवली, त्यावर एकदा सविस्तर लेख लिहीन. पण शरीराने अमेरिकेत राहणाऱ्या अनेक मूळ भारतीयांनी मनात विविध मूल्यांच्या रूपांनी भारत जपलेला दिसला आणि शरीराने भारतात राहून सुद्धा काही लोकांनी अमेरिकेच्या भ्रष्ट मूल्यांच्या आंधळ्या आकर्षणापोटी मनात एक भ्रष्ट अमेरिका पोसलेला दिसला. मग कोण नक्की कोण आहे? भारतीय आई वडिलांच्या पोटी जन्मलेल्या पण अमेरिकन नागरिक असलेल्या सुनीता विल्यम्स हिने अंतराळात जाताना प्रेरणास्थान म्हणून गणपतीची मूर्ती सोबत नेली. तिला आपण काय म्हणणार? आणि पुण्यात रेव्ह पार्टीमध्ये ड्रग्स घेऊन नागड्या अवस्थेत सापडलेल्या तथाकथित प्रतिष्ठित लोकांच्या मुलांना आपण काय म्हणणार? माझ्या ओळखीचे एक मूळचे भारतीय गृहस्थ आहेत, ते आता अमेरिकेचे नागरिक आहेत. त्यांच्या मुलाला जेव्हा १८ व्या वर्षी अमेरिकन नागरिकत्व मिळालं तेव्हा त्यांनी त्याला भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांना अभिमान वाटेल असा नागरिक हो आणि मुख्य म्हणजे आपल्या ५ हजार वर्षांच्या वैदिक-संत महात्म्यांच्या उज्वल परंपरेला विसरू नकोस असा आशीर्वाद दिला. भारत/अमेरिकेतल्या अनेक सेवाभावी उपक्रमात हे गृहस्थ सहभागी असतात. अमेरिकेतल्या एका दुकानात तिरंगा झेंडा चुकीचा लावलेला पाहून त्यांनी दुकान मालकाच्या निदर्शनाला ते आणून दिलं. आपल्या जन्मभूमी विषयी आणि आपल्या कर्मभूमी विषयी कृतज्ञ असं त्यांचं आचरण आहे. त्यांना आपण काय म्हणणार? शेवटी कोणी कोणत्या देशात राहायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे पण आपण आपल्या कुटुंबाकडून आणि देशाकडून मिळालेल्या सांस्कृतिक मूल्यांना जपलं आणि सकारात्मक विचार करून आपल्या जन्मभूमी आणि कर्मभूमी विषयी कृतज्ञ राहिलो तर हे विश्वची माझे घरं किंवा वसुधैव कुटुंबकं हे तत्व खऱ्या अर्थानी सार्थ होईल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Aug 2016 - 3:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर प्रतिसाद !

खालील वाक्ये विशेष आवडली...

परदेशात जाऊन भारताला नावं ठेवणारी लोकं आणि भारतात राहून परदेशी जाणाऱ्यांना किंवा परदेशी लोकांना नावं ठेवणारी लोकं, दोन्हीही चूक.

शरीराने अमेरिकेत राहणाऱ्या अनेक मूळ भारतीयांनी मनात विविध मूल्यांच्या रूपांनी भारत जपलेला दिसला आणि शरीराने भारतात राहून सुद्धा काही लोकांनी अमेरिकेच्या भ्रष्ट मूल्यांच्या आंधळ्या आकर्षणापोटी मनात एक भ्रष्ट अमेरिका पोसलेला दिसला.

नीलमोहर's picture

10 Aug 2016 - 1:15 pm | नीलमोहर

न्याय म्हणजे काय? कधी, कुठे आणि कसा मिळत असतो म्ह्णे तो?

वाचून अतिशय वाईट वाटले, चीडही आली. :(

स्वामी संकेतानंद's picture

10 Aug 2016 - 1:40 pm | स्वामी संकेतानंद

मोठ्यांच्या वाटेला जाऊ नये, सिम्पल. आपण आपली नोकरी मान खाली घालुन करावी, निवृत्त व्हावे,म्हातारे व्हावे, मरावे. बदल घडवायचे आहेत तर मोठ्यांच्या वाटांना वळसा घालून बदल घडवावेत. भारतात काम करण्यासारखी, बदल घडवण्याजोगी क्षेत्रे भरपूर आहेत.

स्वामी संकेतानंद,,, ज्याचं जळतं त्यालाच कळतं .बाकीच्यांना काही फरक पडत नाही .आपले म्हणणे स्वामी या नावाला शोभते ,,,,,,पण काही लोकांचा बाणा हा वेगळा असतो,,, लढेंगे तो मरते दम तक लढेंगे ... बचेंगे तो और लढेंगे....बाकीचे काय किड्यामुंगी सारखं जगणं काय कामाचं

कैलासवासी सोन्याबापु's picture

10 Aug 2016 - 3:30 pm | कैलासवासी सोन्याबापु

दादा दोनच प्रश्न

1 स्वाम्याला तुम्ही नीट ओळखता काय?

2 बाकी आम्ही किडमुंगी वगैरे सोडा, तुम्ही काय काय केलंय त्याची एखादी जंत्री द्याल जमले तर, कसे?

इथे माणसे पाहून नाही तर ID बघून प्रतिसाद दिले जातात त्यामुळे, ह्याला ओळखता का ? त्याला ओळखता का? असले प्रश्न अनाठाई आहेत

कैलासवासी सोन्याबापु's picture

10 Aug 2016 - 3:55 pm | कैलासवासी सोन्याबापु

असं म्हणता! =))

नीलमोहर's picture

10 Aug 2016 - 5:50 pm | नीलमोहर

अँड व्हेरी वेल सेड..

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Aug 2016 - 6:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

"ID बघून" च्या ऐवजी "लिहिलेला मजकूर बघून" प्रतिसाद दिले तर अजूनच चांगले... अगदी सोन्याहून पिवळे :)

कैलासवासी सोन्याबापु's picture

10 Aug 2016 - 6:39 pm | कैलासवासी सोन्याबापु

ता.क. - मी पितवर्णीय नाही.धन्यवाद

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Aug 2016 - 8:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

पीतवर्णीय नाही पण कोट्याधिश नक्कीच ! =))

स्वामी संकेतानंद's picture

10 Aug 2016 - 8:53 pm | स्वामी संकेतानंद

स्पाशी सहमत. इसलिए मी माइन्ड नाही केलं..

योगेश कोकरे's picture

10 Aug 2016 - 9:00 pm | योगेश कोकरे

दादा दोन्ही प्रश्नांची उत्तरे
1) स्वामीला मी ओळखत नाही
2) आम्ही काय केले हे इथे सांगायची गरज नाही .

अनुप ढेरे's picture

10 Aug 2016 - 9:09 pm | अनुप ढेरे

वाह! एकदम बाणेदार प्रतिसाद!

तुमच्याकडे चारचाकी असल्यास आणि त्याच्या मागच्या काचेवर काही लिहिलं असल्यास त्याचा फटू पाठवाल काय?

योगेश कोकरे's picture

10 Aug 2016 - 9:20 pm | योगेश कोकरे

अनुपजी ...खूप लहान माणूस आहे मी . अजून चार चाकी नाही घेत्तली .पण गाडीच्या मागे काय लिहिले आहे ,या वरून काय निष्कर्ष काढायच्या आहे तुम्हाला?

कैलासवासी सोन्याबापु's picture

10 Aug 2016 - 10:28 pm | कैलासवासी सोन्याबापु

खिक =))

कैलासवासी सोन्याबापु's picture

10 Aug 2016 - 10:30 pm | कैलासवासी सोन्याबापु

स्वामी बद्दल स्पा म्हणाला ते मान्य आहे म्हणून असो,

पण, जर आपण काय काय केले आहे ते इथे सांगायची गरज नाही असे आपल्याला वाटत असेल तर आपणही इतरांना किडेमुंगी वगैरे शेलकी विशेषणे वापरायचे कारण नाही, कारण स्पष्ट असेल नाही का?

कपिलमुनी's picture

10 Aug 2016 - 2:26 pm | कपिलमुनी

या प्रकरणामधल्या मूळ तपास अधिकार्‍यांनाच अटक झाली आहे ( न्यायकृपेने ते जामिनावर बाहेर सुद्धा आले ).
द्रुतगती महामर्गाशेजारील संपादीत जमीनीचे प्रकरणच या मागे आहे हे गावामधला उघड सत्य आहे . तरीसुद्धा स्थानिक पोलीसांनी कित्येक वर्ष तो तपास भलत्याच दिशेला नेला .

काही दिवसांपूर्वी या प्रकरणातील एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचा ( बस ड्रायव्हर ) मृत्य्पू झाला .

सरकार भाजपा किंवा काँग्रसचा नसता तर धनदांडग्यांचाच असता .

योगेश कोकरे's picture

10 Aug 2016 - 2:40 pm | योगेश कोकरे

अगदी बरोबर बोललात कपिलमुनी....

मध्य प्रदेशात " व्यापम " घोट्याळ्यात तर ३० ते ३५ साक्षीदार " मरण ( ? ) " पावले म्हणतात ! कुणाचा तरी जबरदस्त वरदहस्त असल्याशिवाय , असे काहीही घडत नसते असे मानण्यास जागा आहे. मुळात 'कायदा गाढव असतो ' हे पुन्हा पुन्हा सिद्ध होतेच आहे. कायद्यातील पळवाटा जोपर्यंत नष्ट केल्या जात नाही , तोपर्यंत काहीही करणे म्हणजे दगडावर डोके आपटून घेण्यासारखे आहे असेच वाटते. कायद्याचा धाक कुणालाच नाही, शेवटी एकच म्हणावेसे वाटते की " पराधीन आहे जगती, पुत्र भारताचा , दोष ना कुणाचा "
.

श्रीगुरुजी's picture

10 Aug 2016 - 3:20 pm | श्रीगुरुजी

कोल्हापूरमधील रस्त्यांचे काम म्हैसकरांच्या आयआरबी याच कंपनीला दिले होते. त्या कंपनीने कोल्हापूरमध्ये प्रवेश करणार्‍या सर्व रस्त्यांवर टोल आकारायला सुरूवात केल्यावर स्थानिकांनी गोविंद पानसरे व एन डी पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक महिने आंदोलन केले. टोल पूर्ण रद्द करावा अशी त्यांची मागणी होती. आंदोलकांनी अनेकवेळा टोलबूथ उद्ध्वस्त केले तरी टोल सुरूच राहिला. उच्च न्यायालयाने देखील टोल रद्द करण्याचा आदेश देण्यास नकार दिला.

पानसरे टोलबंदीच्या आंदोलनाबरोबरच हिंदुत्ववादी संघटनांविरूद्ध सुद्धा जाहीर भाषणे देत होते. २६/११ च्या मुंबईतील हल्ल्यामागे रा. स्व. संघाचा हात होता असा तद्दन मूर्खपणाचा आरोप असणारे पुस्तक कोल्हापूरातील माजी पोलिस निरीक्षक मुश्रीफ यांनी लिहिले होते (हा हल्ला पाकिस्तान पुरस्कृत आहे हे भारतातील सर्व न्यायालयात सिद्ध होऊन कसाबला फाशी दिल्यानंतर सुद्धा असले पुस्तक लिहिणे हा नालायकपणाचा कळस होता). त्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला पानसरे व आचरटशिरोमणी कोळसे पाटील उपस्थित होते. त्या सर्वांनी प्रकाशन समारंभात संघावर भरपूर टीका केली. तद्दन मूर्खपणाचे आरोप असलेल्या पुस्तक प्रकाशन समारंभाला उपस्थित राहून व त्या समारंभात भाषणे करून पानसरे व कोळसे पाटील यांनी पुस्तकातील आरोपांना एकप्रकारे संमतीच दर्शविली होती.

या समारभानंतर काही दिवसातच पानसरेंचा खून झाला व खुनाचे बालंट सनातन प्रभातवर लादण्यात आले. खुनानंतर ७ महिन्यांनी समीर गायकवाड नावाच्या सनातनच्या एका साधकाला अटक केली. त्याला अटक करून जवळ्पास ११ महिने होऊन गेले तरीसुद्धा त्याच्याविरूद्ध पुरेसे पुरावे मिळालेले नाहीत व त्यामुळे त्याच्याविरूद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करून खटला सुरू करणे लांबणीवर टाकले जात आहे.

पानसरे जसे हिंदुत्ववादी संघटनांवर टीका करीत होते तसेच ते कोल्हापूरमधील आयआरबी ने लावलेल्या टोलविरूद्ध सुद्धा जोरदार आंदोलन करीत होते हा मुद्दा पोलिसांनी जाणूनबुजून नजरेआड केलेला दिसतो. विशेषतः सतीश शेट्टीच्या खुनाशी आयआरबीचा संबंध जोडलेला जात असताना हाच संबंध इथे का जोडला नसावा हे गूढ उलगडणे अवघड नाही.

मन१'s picture

10 Aug 2016 - 3:51 pm | मन१

किंचित भर / दुरुस्ती

२६/११ च्या मुंबईतील हल्ल्यामागे रा. स्व. संघाचा हात होता असा तद्दन मूर्खपणाचा आरोप असणारे पुस्तक कोल्हापूरातील माजी पोलिस निरीक्षक मुश्रीफ यांनी लिहिले होते (हा हल्ला पाकिस्तान पुरस्कृत आहे हे भारतातील सर्व न्यायालयात सिद्ध होऊन कसाबला फाशी दिल्यानंतर सुद्धा असले पुस्तक लिहिणे हा नालायकपणाचा कळस होता).

नेमकं पुस्तक मी वाचलेलं नाही. त्यातले काही उतार्‍यांबद्दल कल्पना आहे. अगदिच ढोबळ व्हर्जन सांगायची मुश्रीफ ह्यांच्या स्टोरीची तर ती अशी --
भारतावर समुद्रमार्गे हल्ला होणार असल्याची खबर गुप्तचर संस्थांना लागली. गुप्तचर संस्थातल्या खबर लागलेल्या काही हिंदू राष्ट्रवादी अतिरेकींचे हस्तक लोकंही होते. त्यांना एवीतेवी कामटे -करकरे -साळसकर ह्या ए टी एस अधिकार्‍यांचा काटा काढायचा होता. कारण त्यांनी हिंदू राष्ट्रवादी अतिरेकी करत असलेल्या कारवायांच्या तपासात बरीच प्रगती केलेली होती.(मालेगाव स्फोट की समझौता एक्स्प्रेस मधला स्फोट असा काहिसा मामला होता.)
प्रत्यक्ष पाकी अतिरेक्यांचा जेव्हा हल्ला झाला; त्यावेळी गोम्धळाचे वातावरण माजलेले होते आख्ख्या मुंबैत.
तर हल्ला होणारच आहे;र्ह्याची खबर असल्याने आधीच तयार असलेल्या हिंदू राष्ट्रवादी अतिरेक्यांनी ह्याचा फायदा घेत काही कोव्हर्ट ऑपरेशन्स का पेरलल ऑपरेशन्स म्हणतात ती केली. ए टी एस च्या टीमला मारलं; आणि इतर काही महत्वाचे ठरु शकणारे अडथळे दूर केले. नाव खराब पाकी अतिरेक्यांचे झाले. हिंदू अतिरेकी परस्पर सुटले.
.
.
खरे खोटे माहित नाही. यू ट्यूबवर पोलिस निरिक्षक मुश्रीफ ह्यांचा तासाभराचा विडियो आहे; त्यात अधिक नेमके मुद्दे सापडतील. मी मला आठवताहेत ते आणि समजले होते ते मुद्दे लिहिलेत.
.
.
प्रश्न इतकाच की हे सगळे खरे असेल तर तथाकथित हिंदू अतिरेक्यांना शिक्षा किम्वा त्यांचा शोध कसा काय घेतला जाउ शकत नाही ?
आणि हे सगळे खोटे असेल तर मुश्रीफ अजूनही बाहेर कसे ? त्यांच्यावर प्रॉप्पर अब्रूनुकसान वगैरेचा दावा कोणी केल्याचे माझ्यातरी ऐकण्यात नाही.
आय मीन, मुद्दा इतका गंभीर आहे की आरोप करुन थांबणे पुरेसे नाही. पुढची कार्यवाही नको का व्हायला ? निदान माजी पोलिस निरिक्षकाच्या माणसाला तरी हे सगळे करण्यात अडचण यायला नको.

श्रीगुरुजी's picture

11 Aug 2016 - 2:27 pm | श्रीगुरुजी

भारतावर समुद्रमार्गे हल्ला होणार असल्याची खबर गुप्तचर संस्थांना लागली. गुप्तचर संस्थातल्या खबर लागलेल्या काही हिंदू राष्ट्रवादी अतिरेकींचे हस्तक लोकंही होते.

हिंदू राष्ट्रवादी अतिरेकी!!!!!!!!!!!!!!!!!

त्यांना एवीतेवी कामटे -करकरे -साळसकर ह्या ए टी एस अधिकार्‍यांचा काटा काढायचा होता. कारण त्यांनी हिंदू राष्ट्रवादी अतिरेकी करत असलेल्या कारवायांच्या तपासात बरीच प्रगती केलेली होती.(मालेगाव स्फोट की समझौता एक्स्प्रेस मधला स्फोट असा काहिसा मामला होता.)

समझोता एक्स्प्रेसमधील स्फोट २००६ मध्ये झाला. जर २६/११/२००८ या दिवसापर्यंत या स्फोटाच्या तपासात बरीच प्रगती झाली होती, तर त्यानंतर जवळपास ८ वर्षानंतरसुद्धा खटल्याची प्राथमिक सुनावणी सुद्धा का पूर्ण झाली नसावी?

मालेगावमधील स्फोट २६/११/२००८ पूर्वी जेमतेम दीड महिने आधी झाला होता. जर २६/११/२००८ या दिवसापर्यंत (म्हणजे स्फोट झाल्यापासून जेमतेम दीड महिन्यात) या स्फोटाच्या तपासात बरीच प्रगती झाली होती, तर त्यानंतर जवळपास ८ वर्षानंतरसुद्धा खटल्याचे साधे आरोपपत्र सुद्धा का दाखल झाले नसावे?

प्रत्यक्ष पाकी अतिरेक्यांचा जेव्हा हल्ला झाला; त्यावेळी गोम्धळाचे वातावरण माजलेले होते आख्ख्या मुंबैत.
तर हल्ला होणारच आहे;र्ह्याची खबर असल्याने आधीच तयार असलेल्या हिंदू राष्ट्रवादी अतिरेक्यांनी ह्याचा फायदा घेत काही कोव्हर्ट ऑपरेशन्स का पेरलल ऑपरेशन्स म्हणतात ती केली. ए टी एस च्या टीमला मारलं; आणि इतर काही महत्वाचे ठरु शकणारे अडथळे दूर केले. नाव खराब पाकी अतिरेक्यांचे झाले. हिंदू अतिरेकी परस्पर सुटले.

.

कमाल आहे! म्हणजे संघ व तथाकथित हिंदू अतिरेक्यांना पाकिस्तानी अतिरेकी नक्की कोणत्या मार्गाने हल्ला करणार, नक्की कोणत्या शहरात हल्ला करणार, त्या शहरातील नक्की कोणकोणत्या ठिकाणांवर हल्ला करणार, नक्की कोणत्या दिवशी व दिवसाच्या कोणत्या वेळी हल्ला करणार, हल्ला झाल्यावर हल्ल्याच्या प्रतिकारासाठी कोणते अधिकारी पाठविले जाणार, ते किती वाजता निघणार व कोणत्या मार्गाने जाणार याची इत्यंभूत माहिती मिळाली होती तर. म्हणून तर या तथाकथित हिंदू अतिरेक्यांनी आपले अतिरेकी स्क्वॉड करकरे, साळसकर व कामटे जिथे एकत्रित पोहोचतील त्या जागी अचूक वेळी तयार ठेवले होते. या तथाकथित हिंदू अतिरेक्यांकडे प्रत्येक सेकंदाची अचूक माहिती असल्याने एटीएसचे अधिकारी जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा लगेच तिथे बंदुका सज्ज करून तयार असलेल्या तथाकथित हिंदू अतिरेक्यांनी त्यांना लगेच मारून टाकले आणि बिचार्‍या निष्पाप कसाबला त्यात गोवले.

मोस्साद, आयएसआय, एफबीआय व केजीबी या जगातील चार गुप्तहेर संघटना एकत्र आल्या तरी त्यांना इतका अचूक प्लॅन तयार करता येणार नाही.

धन्य आहे ही पोरकट थिअरी मांडणार्‍यांची आणि त्यांच्या पुस्तक समारंभाला उपस्थित राहून अशा मूर्खपणा व नालायकपणाला पाठिंबा देणार्‍यांची!

आणि हे सगळे खोटे असेल तर मुश्रीफ अजूनही बाहेर कसे ? त्यांच्यावर प्रॉप्पर अब्रूनुकसान वगैरेचा दावा कोणी केल्याचे माझ्यातरी ऐकण्यात नाही.
आय मीन, मुद्दा इतका गंभीर आहे की आरोप करुन थांबणे पुरेसे नाही. पुढची कार्यवाही नको का व्हायला ? निदान माजी पोलिस निरिक्षकाच्या माणसाला तरी हे सगळे करण्यात अडचण यायला नको.

ही थिअरी आणि हे आरोप इतक्या महामूर्खपणाचे आहेत की ते आरोप खोटे आहेत हे सिद्ध करणे हे मूर्खपणाचे ठरेल. मुश्रीफसारखी माणसे आरोप करताना आपण कायद्याच्या कचाट्यात येऊ नये यासाठी अत्यंत धूर्तपणे आरोप करतात. थेट आरोप करण्याऐवजी "असे लोकांमध्ये बोलले जाते", "आंतरजालावर अशा पोस्ट फिरत असतात" अशा तर्‍हेची नरो वा कुंजरो वा स्वरूपाची संदिग्ध वाक्ये पेरतात जेणेकरून आपण खोट्या आरोपांचे धनी होऊ नये परंतु योग्य तो संदेश सर्वत्र पोहोचविला जाईल असे धोरण असते.

अशा महामूर्खांच्या आरोपांना प्रत्त्युत्तर देणे म्हणजे त्यांच्या पुस्तकाची फुकट प्रसिद्धी करून, पुस्तकाचा खप वाढवून त्यातले असत्य जनतेत पसरवायला मदत केल्यासारखे असते.

त्यामुळे संघ परिवाराने मुश्रीफ व त्याच्या या रद्दी पुस्तकातील आरोपांना प्रत्त्युत्तर न देता दुर्लक्ष केले असावे.

बादवे, असाच आरोप अंतुले व वाचाळवीर दिग्विजय यांनी केले होते. आपण अडगळीत फेकलो गेल्याने परत प्रकाशात येण्यासाठी अंतुल्यांनी हा सनसनाटी आरोप केला होता, तर "बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो हुआ" या मानसिकतेतून कायम बाष्कळ बरळणारे दिग्विजय सिंग यांनी देखील सनसनाटी निर्माण करण्यासाठी हा आरोप केला होता. अंतुले बिचारे आरोप करूनसुद्धा शेवटपर्यत अडगळीतच राहिले तर दिग्विजय सिंग हे केवळ विदूषक म्हणूनच आजतगायत प्रसिद्ध आहेत.

अंतरा आनंद's picture

11 Aug 2016 - 3:40 pm | अंतरा आनंद

तोंडी आरोप करणे आणि पुरावे देत पुस्तक प्रसिद्ध करणे यात फरक आहे. संघ परिवार या पुस्तकावर बंदी आणण्यासाठी न्यायालयात जाऊन पुस्तकावर बंदी आणू शकला असता.
कारण हे पुस्तक म्हणजे घटनाक्रम, त्यातील फटी, कागदपत्रे, विनिता कामटेंनी केलेले आरोप त्याला न मिळालेली उत्तरे याची निरस जंत्री आहे. शिर्षकाएवढा पुस्तकातील मजकूर सनसनाटी नाही. वकिली बाडं, सरकारी कामकाज इत्यादी वाचण्याची सवय असणाराच या पुस्तकातून काही निष्कर्ष काढू शकेल. पण जे पुरावे दिलेत त्याचा उगमही दिलेला आहे तेव्हा मिश्रीफांनी मांडलेली थिअरी चुकीची किंवा पूर्वग्रहदूषित असेल पण पोरकट निश्चित नाही म्हणून कदाचित बंदीची मागणी करण्यापेक्षा दुर्लक्ष करणे म्हणजे गवगवा न होउ देणे जास्त योग्य वाटले असावे.

श्रीगुरुजी's picture

11 Aug 2016 - 9:00 pm | श्रीगुरुजी

तोंडी आरोप करणे आणि पुरावे देत पुस्तक प्रसिद्ध करणे यात फरक आहे.

काय फरक आहे? पुस्तक लिहिण्याएवढे पुरावे होते तर २६/११/२००८ नंतर ते जाहीर करायला आणि संघाला (आय मीन हिंदू अतिरेक्यांना!) न्यायालयात खेचून बिचार्‍या कसाबचा बचाव करायला हवा होता? तोंडी आरोप केले म्हणजे कमी विश्वासार्ह आणि पुस्तकातून केले म्हणजे संपूर्ण विश्वासार्ह असं काही असतं का? तसं असतं संभाजी ब्रिगेडने जातीय विष ओकलेली सर्व पुस्तके विश्वासार्ह ठरली असती.

संघ परिवार या पुस्तकावर बंदी आणण्यासाठी न्यायालयात जाऊन पुस्तकावर बंदी आणू शकला असता.

संघावर स्थापनेपासून आजतगायत असंख्य आरोप झालेले आहेत. संघाने आजतगायत क्वचितच आपल्यावरील आरोपांना उत्तर दिले असेल. आपल्यावर केलेल्या आरोपांविरूद्ध न्यायालयात जाऊन दाद मागणे तर दूरच राहिले. संघावर केले जाणारे आरोप हे तद्दन फालतू असून जाणूनबुजून खोटे आरोप केले जातात हे येथील जनतेला माहिती आहे. आरोप करणारा कितीही मान्यवर असला तरी आरोपातील खरेखोटे जनता जाणून असते. त्यामुळेच खोट्या आरोपांना थारा न मिळता आरोप करणार्‍यांचेच हसे झाले आहे.

डॉ. मनमोहन सिंग हे भारतातील अत्यंत मान्यवर व्यक्तिमत्व होते. १९९१-९६ या काळात अर्थमंत्री म्हणून काम केल्यावर त्यांची प्रतिमा विद्वान, अर्थतज्ज्ञ, सुसंस्कृत, मितभाषी इ. गुणांनी नटलेली झाली होती. १९९९ च्या निवडणुकीत दिल्लीत प्रचारसभेत बोलताना, "१९८४ ला जे शिखांचे जे हत्याकांड झाले त्यात संघाचा सुद्धा हात होता" अशा अर्थाचा आरोप केला होता. संघाने या आरोपावर फारशी प्रतिक्रियाच दिली नाही. संघाच्या अंदाजाप्रमाणे हा आरोप मनमोहन सिंगांवरच बूमरँग झाला. दिल्लीत त्यांच्याविरूद्ध शिखांनीच मोठी निदर्शने केली. शेवटी मनमोहन सिंगांना आपण केलेल्या खोट्या आरोपाबद्दल जाहीर दिलगिरी व्यक्त करावी लागली.

२-३ दिवसांपूर्वीच आचरटशिरोमणी कोळसेपाटील यांनी आरोप केले की १९८४ च्या दंगलीत ज्यांनी हत्याकांड घडवून आणले त्यापैकी ५०% संघाचे कार्यकर्ते होते. याचे भक्कम पुरावे त्यांच्याकडे आहेत. या आचरटाला एवढेही समजत नाही की यांच्याकडे संघाविरूद्ध इतके भक्कम पुरावे होते तर गेली ३२ वर्षे हे काय करी होते? त्यांनी अजून एक आरोप केला की भारतातील ९०% दंगली संघ सुरू करतो. या बाष्कळ आरोपांवर न्यायालयात जाणे सोडाच, संघाने प्रतिक्रिया सुद्धा दिलेली नाही. कोळसेपाटील यांचा आचरटपणा सुप्रसिद्ध असल्याने असले आरोप करून त्यांचेच हसे होते हे संघाला माहित आहे.

कारण हे पुस्तक म्हणजे घटनाक्रम, त्यातील फटी, कागदपत्रे, विनिता कामटेंनी केलेले आरोप त्याला न मिळालेली उत्तरे याची निरस जंत्री आहे. शिर्षकाएवढा पुस्तकातील मजकूर सनसनाटी नाही. वकिली बाडं, सरकारी कामकाज इत्यादी वाचण्याची सवय असणाराच या पुस्तकातून काही निष्कर्ष काढू शकेल. पण जे पुरावे दिलेत त्याचा उगमही दिलेला आहे तेव्हा मिश्रीफांनी मांडलेली थिअरी चुकीची किंवा पूर्वग्रहदूषित असेल पण पोरकट निश्चित नाही म्हणून कदाचित बंदीची मागणी करण्यापेक्षा दुर्लक्ष करणे म्हणजे गवगवा न होउ देणे जास्त योग्य वाटले असावे.

२६/११ चा हल्ला नक्की कोणी केला याचे संपूर्ण पुरावे सापडले आहेत. त्यातील एक मारेकरी कसाब याच्यावर तीन वेगवेगळ्या न्यायालयात पूर्ण कायदेशीर सुनावणी होऊन त्याच्यावरील आरोप सिद्ध होऊन त्याला फाशी झालेली आहे. असे असताना घटना घडून अनेक वर्षे उलटल्यावर व घटनेला नक्की कोण जबाबदार होते ते १००% सिद्ध झाल्यावर असली टुकार पुस्तके लिहून बेछूट आरोप करणे हे पोरकटपणाचेच लक्षण आहे. आधी सांगितल्याप्रमाणे संघ असल्या मूर्खांकडे कायमच दुर्लक्ष करीत आला आहे. त्यामुळे संघाने पुस्तकावर बंदीची मागणी केली नाही यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही.

अनुप ढेरे's picture

11 Aug 2016 - 9:18 pm | अनुप ढेरे

इथे विचारवंतांचा दुटप्पीपणा दिसतो बर्‍याचदा, अगदी अलिकडे राणा अयुब नावाच्या 'पत्रकार' बाईने ( इशरत प्रकरण जिने बाहेर काढलं ती) २००२च्या दंगलीबद्दल एक स्फोटक पुस्तक प्रसिद्ध केलं. ज्यासाठी तिने गुजरातेत जाऊन गुप्तपणे इन्वेस्टिगेशन केलं. वरिष्ठ पोलिसांशी वगैरे बोलली ज्यांनी मोदी-शहा जोडीबद्द्ल स्फोटक माहिती तिला देली. हे पुस्तक प्रकाशित झाल्यावर कोणीही त्याची फार दखल घेतली नाही. त्यावर तिने असं म्हणणं सुरू केलं की ज्या लोकांवर मी आरोप केले त्यांनी माझ्या बद्दल एकाही तक्रार केली नाही ना माझ्यावर खटला भरला. म्हणजेच मी लिहिलेलं खरं आहे.

याउलट, गेल्या आठवड्यात आउटलुक मासिकात एका पत्रकाराने संघ/समिती ईशान्य भारतातून तरूण मुलींची वाहतूक करत आहे आणि त्यांच्यावर जाणून बुजून हिंदू संस्कार करत आहे अशी स्टोरी लिहिली. यावर संघाने रितसर खटला दाखल केला आहे. हे झाल्यावर लगेच पत्रकार भावंडांनी आरडाओरडा सुरू केला की तुम्ही पत्रकारांवर असं दडपण कसं आणू शकता, ही दंडेलशाही आहे वगैरे वगैरे.

ही डबल ढोलकी आहे.

हल्ला होणारच आहे;र्ह्याची खबर असल्याने आधीच तयार असलेल्या
क्या बात है
हे हिंदू अतिरेकी तर मोसादच्या तोडीचे असावेत. जे लष्कराला किंवा गुप्तहेरखात्याला माहित नव्हते तेही याना माहित होते.
मग दाऊदचा काटा काढायला त्यांना सुपारी का देत नाही? उगाच त्यांच्या विरुद्ध खटला भरून त्यांचे खच्चीकारण वर सरकारचा पैसे आणि न्यायालयाचा वेळ फुकट घालवत आहेत.
इतका "आचरटपणा"चा आरोप असल्याने त्यांच्या अब्रुनुकसानीच दावा तरी कसा लावावा. मुश्रिफना "आचरट शिरोमणी" हा किताब द्यावा
हसावे कि रडावे हेच कळेनासे झाले आहे.

अनिरुद्ध.वैद्य's picture

10 Aug 2016 - 9:07 pm | अनिरुद्ध.वैद्य

ते हिंदु दहशतवादी आयेसायच्या इशार्‍याहुन काम करत होते ते? आयेसाय वाट चुकलेले मुस्लिम तरुण अन माथेफिरु हिंदु लोक्स ह्या दोघांना हत्यारे पुरवत असते अन हे त्यांच्या इशार्‍यावर नाचत असतात!!

नागरिकांनी जागरुक राहुन आयेसायचे ईरादे हाणुन पाडायला हवे.

बबन ताम्बे's picture

10 Aug 2016 - 7:24 pm | बबन ताम्बे

पुस्तकाचे नाव हु कील्ल्ड करकरे असे आहे. काहीही लिहीले आहे. म्हणे पोलिसांनी बनाव करून अतिरेकी म्ह्णून कसाबला सादर केले. तो अतिरेकी नव्ह्ताच. सीएस्टी वरचे फूटेज दाबुन ठेवले वगैरे . अजून बरच काही लिहिलेय. बरं ते काही संशोधन करून लिहीलेय असेही नाही. प्रारंभीच उल्लेख केलाय की वर्तमानपत्रांतील बातम्या, न्युज च्यानेलच्या वार्ता यावरून निष्कर्ष काढलेत.
त्या पुस्तकातील एक चांगली गोष्ट म्हणजे भारतातील मुसलमानांना काही उपदेश केलाय. बाकी सगळा भाग हिंदू षडयंत्र वगैरे वरच आहे.

खटपट्या's picture

10 Aug 2016 - 9:46 pm | खटपट्या

म्हणे पोलिसांनी बनाव करून अतिरेकी म्ह्णून कसाबला सादर केले. तो अतिरेकी नव्ह्ताच.

लोल, कोण लेखक कोण आहे. त्याच्या घरी जाउन त्याच्या पायाचे तीर्थ घ्यावे लागेल.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

10 Aug 2016 - 8:20 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

सुनील शेट्टीच्या पिक्चरमधला एक डायलॉग आहे,त्याला उद्देशून,"साले तुझे ईमानदारी का कीडा काटा है!
तस्मात या देशात ईमानदारीचा कीडा काट्वून घेणे चुकीचे आहे.मी तर म्हणतो सर्वांनीच भ्रष्ट व्हावे,मग या देशात नाडले गेलेल्यांच्या नक्षल सारख्या संघटना अनेक संघटना स्थापण होतील,त्या राजकारणी ,उद्योजल यांच्याकडून करोडोच्या खंडण्या गोळा करतील,लोकं मारतील .अराजक माजेल .मग या देशातल्या कंपन्या बाहेर जातील् ,पैसा आटेल.मग या देशात भ्रष्टाचारासाठी काहीच पैसा शिल्लक राहणार नाही.हाच भ्रष्टाचारावर रामबण उपाय आहे,भ्रष्टाचारच भ्रष्टचाराल मारेल.

संदीप डांगे's picture

10 Aug 2016 - 10:00 pm | संदीप डांगे

तुमच्याकडे, सत्ता आणि पैसा असेल, तर आणि तरच, ह्या देशांत तुम्ही समाधानाने राहू शकता.

>> हे मात्र शंभर टक्के खरं आहे मुविकाका, अमेरिका, जापान, इत्यादी सगळे विकसित देशांकडे भरपुर या त्या मार्गाने मिळवलेला पैसा आहे आणि जगावर सत्तादेखील आहे, त्यांचे लांगुलचालन करणारे इतर देशही बर्‍यापैकी समाधानाने जगत आहेत.

कैलासवासी सोन्याबापु's picture

10 Aug 2016 - 10:27 pm | कैलासवासी सोन्याबापु

मुविकाका ह्या विषयात आपले एकमत होणे नाही! असो!

मुक्त विहारि's picture

11 Aug 2016 - 12:26 am | मुक्त विहारि

ते मलाही माहित आहे.

"संदीप उन्नीकृष्णनच्या" बापाची आणि आमची व्यथा थोडी-फार सारखीच आहे.

काही निर्णय जर योग्य वेळी घेतल्या गेले असते आणि अजूनही घेतले गेले तर, "संदीप उन्नीकृष्णन"च्या बापाने जे भोगलंय ते भोगायची वेळ इतर बापांवर येणार नाही.

भारतात तरी "रक्षकांच्या जीवावर भक्षक"च जास्त, असे माझे मत.

माम्लेदारचा पन्खा's picture

10 Aug 2016 - 10:40 pm | माम्लेदारचा पन्खा

संपूर्ण व्यवस्था बदलू शकत नसाल तर स्वतःला बदला....

ज्याला जायचेय त्याने जा. मी थांबणारेय इथेच.

'भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे...'

सुबोध खरे's picture

11 Aug 2016 - 9:50 am | सुबोध खरे

दोन्ही बाजूंची मते एका मर्यादेत पटतात.
मला "बाहेर" जाणे सहज शक्य आहे.( हि दर्पोक्ती नसून वस्तुस्थिती आहे).
परंतु बाहेरील देश तुम्हाला "त्यांच्या" नागरिकांना वागवतील तसेच वागवतील असे नाही.अर्धे आयुष्य गेल्यावर नवीन ठिकाणी स्वतःला रुजवणे कठीण हि आहे. शिवाय इथेच राहून जसे जमेल तसे( स्वतःच्या जीवाला फारशी तोशीस न लावता) देशकार्याला हातभार लावत सुसह्य जगणे हेच मला पटते. यात "स्वान्त सुखाय" का काय ते समजा. उगाच "जाज्वल्य देशाभिमान" सारखे मोठे शब्द माझ्या मर्यादित मेंदूला झेपत नाहीत. सोसेल तेवढीच "सोसल सर्व्हिस" करतो आणि उरला वेळ स्वतःच्या सुखासाठी वापरतो.

परंतु बाहेरील देश तुम्हाला "त्यांच्या" नागरिकांना वागवतील तसेच वागवतील असे नाही.

डॉक्टर साहेब, नक्की वागवतील. आणि अगदी समजा "त्यांच्या" नागरीकांसारखे नाही वागवले तरी सध्या भारतात तुम्हाला जी वागणुक मिळते आहे त्यापेक्षा शतपटीने चांगले वागवतील.

आयुष्य गेल्यावर नवीन ठिकाणी स्वतःला रुजवणे कठीण हि आहे.

हे कारण ठीक आहे, पण बाकी कसली काळजी करायची गरज नाही.

सामान्य वाचक's picture

11 Aug 2016 - 10:47 am | सामान्य वाचक

बाहेरील देश 'त्यांच्या' नागरिकांच्या प्रमाणे वागवत नाहीत, म्हणजे काय?
एक सामान्य माणूस म्हणून तुमच्या ज्या गरजा आणि इच्छा असतात , त्या पूर्ण होण्यात तुम्हाला दुय्यम वागणूक मिळत नाही
आपले रोजचे जीवन खूप सुखी आणि असंघर्षमय असते

आणि याउलट भारतात तुम्ही प्रथम दर्जाचे नागरिक आहात, म्हणून तुम्हाला काय premium मिळतो?
भारतात रोजचे आयुष्य आणि quality of life याबद्दल जास्त बोलायची गरज नाही, या मुद्यावर सगळ्यांचेच एकमत होईल

भारत राहणे किंवा न राहणे हा या पलीकडचा विचार आहे
उदाहरणार्थ मित्राची आई आपल्या आई पेक्षा जास्त प्रेमळ असली तरी आपल्याला आपल्या आईची कुशी आणि डोक्यावर तिचाच हात लागतो, त्या मित्राकडे राहायला गेलो तरी आपल्याला उपरे वाटते, घराची आठवण येते

आणि आपल्या घरात राहताना मित्राच्या घराचे आणि तिथल्या वातावरणाचे आकर्षण वाटत राहते

त्यामुळे शेवटी तुम्हाला दोन्हीपैकी काय परवडते याचा विचार करून निर्णय घेणे
पण जिथे राहतो त्या घराबद्दल negative बोलत राहून आपले आणि लोकांचे frustration वाढवणे, हे करू नये
म्हणजे आपल्या घरात राहून मित्राच्या घराचा उमाळा आणि तिथे राहून आपल्या घराचा गहिवर

डांगे साहेबानी वरती म्हटल्याप्रमाणे नकारात्मक बोलून ती भावना exponentially वाढत जाते मग लोक आणखी बोलतात and so on हे एक vicious circle आहे

पण जिथे राहतो त्या घराबद्दल negative बोलत राहून आपले आणि लोकांचे frustration वाढवणे, हे करू नये

लै वेळा सहमत. याच भावना शब्दात मांडायला मला जमत नव्हते.

अमितदादा's picture

11 Aug 2016 - 1:24 am | अमितदादा

हा एक खदखदनारा विषय आहे, आज वाईट आणि भ्रष्ट् लोकांचं खूप मोठ नेटवर्किंग दिसत ते एकमेकांना सांभाळून घेतात मग ते कोणत्याही पक्षाचे असो किंवा विचारसरणीचे असो। चांगल्या लोकांचं मात्र नेटवर्किंग होत नाही आणि झालं तरी जास्त वेळ टिकत नाही। जेंव्हा जेंव्हा चांगल्या लोकांचं एकजूट झाली तेंव्हा तेंव्हा चांगले बदल पाहाय मिळाले आहेत। IRB ची मुजोरी कोल्हापूर च्या लोकांनी पाहिले आहे , सतेज पाटील हसन मुश्रीफ यासारख्या मंत्र्यांच्या आश्वासन आणि आवाहनाला IRB ने केराची टोपली दाखवली होती कारण एकच सगळी सरकारी यंत्रणा manage करायचं कसब आणि क्षमता। कोल्हापूरात ND पाटील, गोविंद पानसरे यासारखे खमके आणि प्रामाणिक नेते होते म्हणून irb चा पडाव झाला। सलमान खान च प्रकरण सुद्धा न्यायवस्तेवरील विश्वास कमी करणार प्रकरण आहे।

अजित दादा, ताटकरेसाहेब यांचे नाव ज्या घोटाळ्यातंले आहे तो म्हणजे काही हजारो कोटींचा सिंचन घोटाळा.कोकणातील धरणे बांधण्यात जी कंत्राट अवैधरित्या देण्यात अली त्याबद्दल चे प्रकरण काही दिवसात जोर धरेल असे दिसते आहे....आणि मोठे मासे गालाला लागतील अशी अशा आहे

गणामास्तर's picture

11 Aug 2016 - 9:32 am | गणामास्तर

भलत्याच अपेक्षा आहेत कि हो तुमच्या. हे वाचून बघा जरा http://www.loksatta.com/mumbai-news/settlement-between-ncp-bjp-to-projec...

सुबोध खरे's picture

11 Aug 2016 - 9:43 am | सुबोध खरे

मास्तर
हि नुसती "चर्चा" आहे. मोठे साहेब "आहेत" तोवर आणि शिवसेनेची "कटकट" चालू आहे तोवर भाजप उगाच बिळात हात घालणार नाही. पुढच्या निवडणुकीच्या अगोदर अजित दादा आणि तटकरे साहेब सरकारी जावई बनतील असे जाणकार सांगतात. कारण आताच लफडं बाहेर काढलं तर जामीन वगैरे मिळवून हे लोक परत आम्हाला सूडबुद्धीने वागवतात म्हणायला तयार असतील. आणि लोकांची स्मरणशक्ती फारच कमकुवत असते असे एक इंग्रजी म्हण सांगते.
राजकीय बुद्धिबळ कसे खेळले जाते हे कोणीच सांगू शकत नाही.

चंपाबाई's picture

12 Aug 2016 - 11:58 am | चंपाबाई

मांडवली होइल

गणामास्तर's picture

12 Aug 2016 - 12:18 pm | गणामास्तर

चंपाबाईंशी सहमत.

मनातल्या मनात : च्यायला काय पण दिवस आलेत.

चंपाबाई's picture

12 Aug 2016 - 2:22 pm | चंपाबाई

इतिहासात मराठे व मोघलांच्यात शेकडो मांडवल्या झाल्या.

पानिपतानंतर खुद्द पेशवे व अब्दाली यानी एकमेकाना नजराणे पाठवुन आता मित्रत्वाने राहू असे प्रेम खलिते पाठवले होते.

मुम्बैतील हिकडची गादी व तिकडची गादी कधी मारामार्‍या करतात कधी एकत्र वडापाव खातात.

मोदीजीसो निवडुन आल्यावर मा. साहेबसो यांच्याकडे चहा प्यायला गेले होते.

अजुन लोकांचा भाबडेपणा संपत नाही.

गंम्बा's picture

12 Aug 2016 - 2:41 pm | गंम्बा

चंपाबाई कधी कधी मुद्याचे बोलतात.

सुबोध खरे's picture

12 Aug 2016 - 6:27 pm | सुबोध खरे

मांडवली होईलच असे नाही. कारण जर भाजपाला पूर्ण बहुमत मिळाले तर कुणाची दाढी धरायची पाळी येणार नाही. सत्तर वर्षेपैकी बरीच वर्षे काँग्रेसने केवळ सक्षम विरोधी पक्ष नसल्याने सत्तेत होता.
मोठ्या "साहेबांचे" किती दिवस बाकी आहेत हे कुणी सांगू शकत नाही. परंतु सध्या कृषी उत्पन्न बाजार समित्या, सहकारी बँका,साखर कारखाने, बी सी सी आय अशा बऱ्याच ठिकाणहून पीछे हाट चालू आहेच त्यातून साहेबांच्या नंतर सक्षम नेतृत्व कुठे आहे? सध्या उरलेले दिवस "बाहेर" राहण्यासाठी "साहेबच" मांडवली करीत आहेत असे "ऐकिवात" आहे.
प्रत्येकाचा "वैभवाचा" आणि "पडता" काळ असतो आणि वैभवाच्या काळात केलेली गुंतवणूक पडत्या काळात कामास येते. तेंव्हा नुसता ओरबाडून खाल्लं असेल तर फाके मारायची पाळी येउ शकते.
भुजबळ साहेबांचे उदाहरण पाहून घ्या.

चंपाबाई's picture

16 Aug 2016 - 6:48 am | चंपाबाई

तेंव्हा नुसता ओरबाडून खाल्लं असेल तर फाके मारायची पाळी येउ शकते. भुजबळ साहेबांचे उदाहरण पाहून घ्या.

आणि थोडे आम्हालाही द्या !

शोलेमध्ये गब्बरसिंग गाववाल्याना धमकवायला सचिनला मारून टाकतो, तसे आहे हे. एखाददुसरी केस चालवली की बाकीचे आपोआप मांडवलीला येतात.

काँग्रेस भ्रष्ट आहे हे सांगुन वाजपेयीही पाच वर्षे खुर्चीत होते. किती काँग्रेसवाल्याना शिक्षा दिली ?

NiluMP's picture

16 Aug 2016 - 8:19 pm | NiluMP

+१०००००

सुबोध खरे's picture

11 Aug 2016 - 9:54 am | सुबोध खरे

सुरुवातीला प्याद्यांचा बळी जातो मग हत्ती घोडे आणि उंट येतात. "शेवटी" राजाला वाचवण्यासाठी वजिराचाहि बळी दिला जातो. पण त्याची वेळ यावी लागते. सुरुवातीलाच "वझिराच्या" मागे लागल्यास डाव "उलटण्याची" शक्यता असते.

जाबाली's picture

11 Aug 2016 - 10:16 am | जाबाली

अश्याच कित्येक केसेस बाकी आहेत. अनेक वर्ष हे चालू राहतं. पिढ्यानपिढ्या हे चालत राहू शकतं. आपण बदल करू शकतो ह्या भ्रमात भरपूर लोक आहेत आणि होऊन गेलेत. भारतीय सिव्हिल फोर्सस मध्ये काहीही बदल होणार नाहीत हे लक्षात घ्या. उत्तरोत्तर हे सगळं खराब होत जाणार आहे. ह्यात बदल होण्या साठी जहाल मतवादी विचारांची गरज आहे. गुळमुटे धोरण काहीही कामाचे नाही. आपल्या भारतात कायदा आणि सुव्यवस्था हि खिळखिळी झालेली आहे. वरील लेखन हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.

सुबोध खरे's picture

11 Aug 2016 - 10:31 am | सुबोध खरे

ह्यात बदल होण्या साठी जहाल मतवादी विचारांची गरज आहे. गुळमुटे धोरण काहीही कामाचे नाही.
मग हे क्रांतिकार्य कोण करणार आहे? तुम्ही करता का? आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू.

जाबाली's picture

11 Aug 2016 - 11:19 am | जाबाली

हा माझा व्यक्तिगत विचार झाला. प्रत्येक जण याच विचाराचा असेल असे नाही. हे विचार जेव्हा बहुतांशी लोकांचे होतील तेव्हा जरा बदल जाणवायला लागेल. गोविंद राघो खैरनार यांच्या सारख्यांची गरज आहे (हे फक्त एक उदाहरण झाले). तुम्ही काय किंवा मी काय, आपण फक्त निमित्तमात्र आहोत. आपण एकमेकांच्या पाठीशी उभे असलो तरीही पुष्कळ आहे. अधिक काय लिहू, आपण सर्व सुज्ञ आहातच !

चंपाबाई's picture

12 Aug 2016 - 11:55 am | चंपाबाई

ट्रकभर पुरावेवाले का ?

आता भाजपा सेना सरकारने सगळीच बांधकामे लीगल करायचा विडा उचलला आहे... आता खैरनारप्रेमी लोक गप्प का बसलेत ?

सुबोध खरे's picture

12 Aug 2016 - 12:15 pm | सुबोध खरे

गोविंद राघो खैरनार हे कितीही प्रामाणिक असले तरी व्यवस्थेने त्यांना बडतर्फ़ केलेच ना. केवळ चांगले काम करता येणे एवढेच आवश्यक नाही तर तुम्हाला नियमांच्या चौकटीत राहून आपल्या अधिकाराचा उत्तम वापर करता आला पाहिजे. याचे उत्तम उदाहरण "टी एन शेषन" हे आहे. त्या एकट्या माणसाने हातात पूर्ण अधिकार आल्यावर सरकारला इंगा दाखविला आणि निआवडणूक प्रक्रियेत आमूलाग्र बदल करवून आणले .
हे जमले नाही तर तुमचा "खैरनार" होतो.
"जन पळभर म्हणतील हाय हाय" पण व्यवस्था तशीच राहते.

स्वामी संकेतानंद's picture

11 Aug 2016 - 10:59 am | स्वामी संकेतानंद

जालीय भगतसिंग! :D

योगेश कोकरे's picture

11 Aug 2016 - 11:37 am | योगेश कोकरे

आहे त्या व्यवस्थेमध्ये कायदेशीर रित्या काम करणार हुशार प्रामाणिक लोकांची कमी खूप कमी प्रमाणात आहे . आणि ज्यांना व्यवस्थेबद्दल खूप खोलवर माहिती आहे ते लोक" माझीच गाडी , माझीच माडी ,माझ्याच बायकोची बायकोची गोलगोल साडी " ह्या मध्ये गुंतलेले दिसतात . आणि प्ली ज हा ,,माझे हे विधान कोना एकाला उद्देशून नाही . त्यामुळे मिपाकरांनी वयक्तिक घेऊ नये.

गंम्बा's picture

11 Aug 2016 - 12:08 pm | गंम्बा

आहे त्या व्यवस्थेमध्ये कायदेशीर रित्या काम करणार हुशार प्रामाणिक लोकांची कमी खूप कमी प्रमाणात आहे .

व्यवस्था आकाशातुन पडली नाहीये ना व्यवस्थेत काम करणारे दुसर्‍या समाजातुन आले आहेत.
व्यवस्थे मधे समाजाचेच प्रतिबिंव दिसते आहे.

संत घोडेकर's picture

11 Aug 2016 - 12:11 pm | संत घोडेकर

+१
सहमत

योगेश कोकरे's picture

11 Aug 2016 - 1:23 pm | योगेश कोकरे

म्हणजे जे चाललंय ते असाच चालत राहणार तर . प्रत्येकाने "जे आहे ते असाच राहणार हे ,त्यात बदल व्हायची सुतराम शक्यता आहि "असं जर विचार केला तर बदल कसा होईल . कमीतकमी मी माझ्या परीने थोडाफार बदल घडवण्याचा प्रयत्न का करू नये ? असा विचार करणे पण महत्वाचा आहे . छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घ्यावा ,पण तो शेजाऱ्याच्या घरात व्हावा " हि मानसिकता सोडायचा थोडातरी प्रयत्न करावा हि अपेक्षा. ..........आता लोक "यावर तुम्ही काय केले ?" असे बालिश प्रतिसाद द्यायला मागेपुढे बघणार नाहीत.

कैलासवासी सोन्याबापु's picture

15 Aug 2016 - 3:56 pm | कैलासवासी सोन्याबापु

अवघड प्रश्न आला की त्याला "बालिश" म्हणणे आजकाल फॅशन मध्ये आले आहे का काय!

योगेश कोकरे's picture

16 Aug 2016 - 8:46 am | योगेश कोकरे

अवघड प्रश्न म्हणे . हॅहॅहॅ ....... इथे काय निखिल वागळेंचा आजचा सवाल सुरु करताय काय सोन्याबापू ?

चौकटराजा's picture

11 Aug 2016 - 11:03 am | चौकटराजा

मुवि, तुम्ही हा देश सोडून जा. जिथे जाल इथे काही खटकेल मग तोही देश सोडून दुसरीकडे जा.जिथे जाल तिथला पत्ता मला
कळवा. मी तुमच्याकडे राहायला येईन घरातली कामे मला सगळी येतात. ( भाकरी मस्त करतो मी ... हे एक वानगी दाखल)
मला फक्त भाकरी पिठले भात वरण असा बेत चालतो. मग मी आजूबाजूची प्रेक्षणीय स्थळे ( सर्व प्रकारची) पाहीन.
केल्याने देशाटन होईल.. पंडित मैत्री म्हणजे तुमचा सहवास आहेच. बघा कसा वाटतो बेत.

अभ्या..'s picture

11 Aug 2016 - 11:19 am | अभ्या..

गांव अभी बसा नही, लूटेरे हाजीर.
.
.
.
चौरा आणि मुवि दोन्ही काकानो हलकं घ्या बरं.

नाखु's picture

11 Aug 2016 - 11:25 am | नाखु

आधीच नाट लावतोस

हे दोघं तिकडं गेल्यावर, तुला घेऊन जाणार होतो मी, अता बस तुझ्यामुळे मलापण जायला मिळणार नाही...
जरा म्हणून धीर धरत नाहीस.

मुवीनगरी स्थीत चौकटमहालास भेटोत्सुक नाखु मित्रपरिवार

चौकटराजा's picture

11 Aug 2016 - 6:36 pm | चौकटराजा

सभेत संचार का काय म्हणतात ना ते हे सोलापूरवाले व गाववाले करताहेत !!
@ अभ्या, हलके काय घ्या... इथे देश सोडून जाण्याचा विषय आहे ! मुविके भौना को समझो !

कोणत्याही संवेदनाशील भारतीय माणसाला अत्यंत खिन्न करणारी पोस्ट आणि त्यावरचे काही (सगळेच नव्हेत) बाष्कळ, भरकटलेले, कॉलेजच्या नाक्यावरच फक्त चालतील असे, किंवा मूळ लेखातील एखादाच बारीकसा मुद्दा घेऊन त्यावरून लेखकाला धोपटणारे प्रतिसाद आणि प्रतिप्रतिसाद.
काही प्रतिसाद खरोखरच चांगले असतात म्हणून आम्ही वाचतो पण दाणे थोडे आणि फोलपटे भाराभर असे होऊ लागले तर वाचकांचा प्रतिसाद वाचावायाचा उत्साह कमी होत जाईल ह्याचे भान ठेवावे अशी नम्र विनंती आहे.
लिहिण्याजोगे काही नसेल तरीही लिहिलेच पाहिजे असे नाही.

योगेश कोकरे's picture

11 Aug 2016 - 1:29 pm | योगेश कोकरे

"पण दाणे थोडे आणि फोलपटे भाराभर "हे वक्तव्य एक्दम सूचक वाटले. असो फोलफटे कचऱ्याच्या डब्यात जाऊदेत . आणि शेंगदाण्यानं पण फोळफाट्या शिवाय पर्याय नाही....

शलभ's picture

11 Aug 2016 - 3:35 pm | शलभ

सहमत

आदूबाळ's picture

11 Aug 2016 - 3:52 pm | आदूबाळ

आयाम कन्फ्युज्ड.

साल १२९०: माझा एक पूर्वज दुर्गादेवीच्या दुष्काळात 'जगण्यासाठी' म्हणून कर्नाटकातून महाराष्ट्रात आला. आडनावातली कानडी छटा वगळता कर्नाटकात आता काहीही उरलेलं नाही.

साल १९०५: माझे पणजोबा गावातल्या शेतीपेक्षा पुण्यातल्या नोकरीत जास्त उत्पन्न मिळतं म्हणून पुण्यात आले. गावात आता काहीही उरलेलं नाही.

साल २०१x: पुण्यातल्या नोकरीपेक्षा भारताबाहेर 'क्वालिटी ऑफ लाईफ' चांगली आहे म्हणून मी भारतात सगळी निरवानिरव करून परदेशात स्थायिक झालो, तर ही घटना १२९० आणि १९०५ च्या घटनेपेक्षा वेगळी कशी?

संदीप डांगे's picture

11 Aug 2016 - 4:32 pm | संदीप डांगे

तिघांपैकी कोणी मातृदेशाला शिव्या घातल्या का मायग्रेशन करतांना?

अकोल्यात करिअर शक्य नाही म्हणून मी मुंबईत आलो, QUality of life चांगले म्हणून मी मुंबईतून नाशकात आलो, पण म्हणून मी अकोला व मुंबईस नाकारात्मकतेने बघत नाही, मला जिथे जे शक्य होते ते केले, पण देशाचा घाऊक प्रमाणात द्वेष शक्य नाही कारण देश म्हणजे कोणतं ही एकाच शहर, समुदाय, क्षेत्र नव्हे।

जयंत कुलकर्णी's picture

11 Aug 2016 - 5:25 pm | जयंत कुलकर्णी

डांगेसाहेब,
मुविंनी खरोखरीच शिव्या घातल्या आहेत का हो ? त्यांनी त्यांना स्थलांतर का करावेसे वाटते याची काही कारणे दिली आहेत उदाहरणे दिली आहेत याचाच दुसरा अर्थ असा की ही कारणे जर दूर झाली तर कदाचित त्यांच्या मनात हा विचार आला नसता..... :-) आणि तसे म्हटले तर far stretched... शहराचे काही तरी तुम्ही नाकारलेच की.... देशासाठी जे शक्य आहे ते सगळेच करीत असतात याचा अर्थ उणिवांवर बोट ठेऊ नये असे नाही....कदाचित ते उद्वेगाने बोलले असतील. ते का हेही समजून घेतले पाहिजे असे मला वाटते. असो.... या धाग्यावरील हा माझा शेवटचा प्रतिसाद कारण हे न संपणारे आहे व शेवटी निर्णय वैयक्तिक आहे... :-)

संदीप डांगे's picture

11 Aug 2016 - 5:45 pm | संदीप डांगे

वरील प्रतिसाद मुविंबद्दल नव्हता, जनरल आहे,

आपल्या देशातल्या फक्त उणिवांवर बोट ठेवणे आणि शष्प माहित नसता परदेशाबद्दल गुणगान करणे हे शोभा डे टाईप आहे, अशा वृत्तीची मला चीड आहे, ह्यात कोणावरही वैयक्तिक चिखलफेक नाही तर हे माझे फार जुने मत आहे. ह्या प्रकारात कोणी सन्माननीय मिपासदस्य येत असतील तर केवळ योगायोग समजावा, धन्यवाद!

सुबोध खरे's picture

11 Aug 2016 - 8:17 pm | सुबोध खरे

शष्प माहित नसता परदेशाबद्दल गुणगान करणे
माझ्या अल्प माहितीनुसार मुवि नि बरीच वर्षे "परदेशात" काढली आहेत तेंव्हा त्यांनी लिहिलेले हे काही तरी नक्की आधारावरच आहे याची मला खात्री आहे. तो शोभा डे यांच्या प्रतिसादाइतका भंपक नक्कीच नाही.

संदीप डांगे's picture

11 Aug 2016 - 8:18 pm | संदीप डांगे

हे मुविंबद्दल नाही हे परत कितीदा सांगू?

नाखु's picture

11 Aug 2016 - 4:41 pm | नाखु

स्थायिक कुठेही व्हा पण फक्त भारताला शिव्या द्या /दूषणे द्या इतके करा तुम्ही (मुळचे)भारतीयच आहात हे वेगळं सिद्ध करावं लागणार नाही. अधून मधून चवीपुरते माहाराष्ट्राला चार दूषणे दिलीत तर महाराष्ट्री म्हणून ओळ्ख ठसठशीत होईल.

प्रतिसाद भाऊंसाठी आहे आणि त्यांनी तो व्य्क्रोक्तीपुर्ण नक्की घेतील याची खात्री आहे म्हणून्च दिला आहे.

बाकी प्रगतीसाठी स्थानांतर आणि स्थलांतराला आमचा कधीही आक्षेप नाही आणि नव्हताही.

देशप्रेम दाखवायला भारत भारतीय हे शब्द प्रत्येकाच्या पोस्ट मध्ये आहेत मुळात स्थानिक प्रश्न हे स्थानिक विचार करूनच सोडवायचे आसतात त्यात भारत आणू नका .
भारतीय शब्द आला की आशि पण प्रगत राज्यातील जनता बिथरते आणि होणारे आक्रमण लक्षात घेवून स्थानिक समस्येला महतव देत नाही ..

झेन's picture

11 Aug 2016 - 7:38 pm | झेन

ते ट्रक च्या मागे लिहिलेलं असतं ते

"१०० में से ९९ बेईमान,
फिर भी मेरा भारत महान"

अजून एक

“ सरफरोशी की तमन्ना है तो सर पैदा कर
तीर खाने की हविस तो जिगर पैदा कर “

आपल्या समाजाला दीडशे वर्षाची गुलामगिरी सुरवातीला जड गेली असेल पण नंतर बहुदा आपल्याला सवय झाली असावी. कदाचित समाज म्हणून आपल्याला त्यातच सुख वाटतं असावे. इथले नेते (राजकीय पुढारी, नोकरशहा, NGO,”विचारवंत”) ह्या देशाला आपण घडवायचे आहे विसरून लुबाडायचे आहे असे समजतात. त्यांना काय दोष द्यायचा आपण सामान्य माणसं तेच करतो जिथे आणि जेंव्हा शक्य असेल तसं. आपणच कळत न कळत झेंडे मिरवतो यथा राजा तथा प्रजा का उलटं काय माहित. अपवाद असतातच.

मागे एका जागतिक अर्थशास्त्रज्ञाचे नजीकच्या भविष्यात भारत महासत्ता बनेल का यावरचे मत वाचले. तो म्हणतो जे राष्ट्र स्वातंत्र मिळाल्यावर आधी “रिसोर्सेस वाढवण्यावर भर देण्याऐवजी डिस्ट्रीब्यूशनचंच प्लानिंग करतो तो सहजासहजी महासत्ता बनू शकतं नाही”.

मला उत्तर माहित नाही पण हे माझं घर आहे जेवढं आणि जिथे शक्य आहे तिथे माझ्या कुवतीप्रमाणे मी दुरुस्त करायचा प्रयत्न करेन.

NiluMP's picture

11 Aug 2016 - 8:47 pm | NiluMP

+१

आपल्या समाजाला दीडशे वर्षाची गुलामगिरी सुरवातीला जड गेली असेल पण नंतर बहुदा आपल्याला सवय झाली असावी. कदाचित समाज म्हणून आपल्याला त्यातच सुख वाटतं असावे.

उलट झालं खरं तर. सुरुवातीला एतद्देशीय राज्यकर्त्यांचा सावळा गोंधळ पाहता टोपीकराचं राज्य सुखाचं वाटत होतं. नंतर भारतीय राष्ट्रवाद ही संकल्पना जन्माला येऊन गुलामगिरीची जाणीव झाली.

जे राष्ट्र स्वातंत्र मिळाल्यावर आधी “रिसोर्सेस वाढवण्यावर भर देण्याऐवजी डिस्ट्रीब्यूशनचंच प्लानिंग करतो तो सहजासहजी महासत्ता बनू शकतं नाही”.

याचं कारण म्हणजे भारताची समस्या कायमच रिसोर्स डिस्ट्रिब्युशन हीच होती. भारतातल्या दुष्काळाचं कारण रिसोर्सेसची वानवा हे नसून कोलमडलेली डिस्ट्रिब्यूशन यंत्रणा होतं हे अमर्त्य सेन यांनी सिद्ध केलं. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर सत्तर वर्षांच्या काळात डिस्ट्रिब्यूशन यंत्रणा सुधारण्यावर भरीव काम झालं आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Aug 2016 - 10:29 pm | कैलासवासी सोन्याबापु

आम्ही युपीश्शी मंदी अगदी वरवर सेन-भगवती कलगीतुऱ्याबद्दल वाचले होते आबासाहेब, जमल्यास त्यावर एक कांडकं लेख पाडावा ही तुमचे पाय घट्ट धरून विनंती!

सेन आजच्या राज्यकर्त्यांचे दोडके का झालेत ते अजून सुस्पष्ट होईल

-अर्थशास्त्राचा धसका घेतलेला , बापुस

आदूबाळ's picture

11 Aug 2016 - 11:53 pm | आदूबाळ

लेख नको, पण हा विषय महत्त्वाचा आहे.

थोडं सुलभीकरण करतो आहे, कृ समजून घ्या.

समजा, म्हाताऱ्या आईबापांना दोन मुलं आहेत. थोरला चांगला धट्टाकट्टा आहे, धाकटा जरा अशक्त आहे. घरात एकूण दोनच भाकऱ्या आहेत. ध्येय आहे - एके दिवशी चार भाकऱ्या मिळवायचं.

सेन म्हणतात: आहेत त्या भाकऱ्या चौघांना वाटून द्या. कोणी उपाशी नाही राहिलं पाहिजे. सगळे अर्धपोटी राहिले तरी चालतील. भाऊ उद्या अर्धपोटी काम करतील. कदाचित चार भाकऱ्या कमावू नाही शकणार, पण तीन तरी मिळवतील. म्हणजे पोटं जरी भरली नाहीत तरी आजच्यापेक्षा उद्या बरी परिस्थिती असेल. चार भाकऱ्या कदाचित परवा मिळतील.

भगवती म्हणतात: थोरल्या भावाला आज दोन्ही भाकऱ्या खाऊदे. म्हणजे उद्या काम करायला तो ताजातवाना जोमदार असेल. बाकीचे उपाशी तर उपाशी. धाकटा घरी म्हाताऱ्या आईबापांची काळजी घेईल. थोरला दिवसभर राबेल आणि संध्याकाळी चार भाकऱ्या घेऊन येईल. एका उपासाच्या बदल्यात तिघांची पोटं भरतील.

---///---

हे थोडंसं टिळक-आगरकर वादासारखं आहे. अंतिम ध्येय एकच, पण पोचण्याचे मार्ग वेगवेगळे.

इथे अंतिम ध्येय आहे दारिद्र्य कमी करण्याचं. ऐतिहासिक टर्म वापरायची तर अंत्योदयाचं.

भगवती म्हणतात efficiency वाढवा, नव्या संधी निर्माण करा. त्याने रिसोर्सेसचा साठा वाढेल आणि उत्पन्नाची दरी कमी होईल. मोठ्या आकाराच्या अर्थव्यवस्थेत सगळ्यांना खायला पुरेसं असेल, पर्यायाने equity आपोआप येईल.

सेन म्हणतात equity आणा आधी. आहेत ते रिसोर्सेस नीट वाटण्याकडे आधी लक्ष देऊ. नाहीतर श्रीमंत जास्त श्रीमंत होतील, गरीब जास्त गरीब.

मूळ स्वरूपात हा वाद खूप जुना आहे. सद्यकालीन राजकीय परिस्थितीत सेन यांना लाल रंग फासला गेला आणि भगवतींना भगवा.

अर्धवटराव's picture

12 Aug 2016 - 3:24 am | अर्धवटराव

रिसोर्सचा साठा वाढवणे/पैदा करणे व आहे त्या साठ्याचे नीट डिस्ट्रिब्युशन करणे या परस्परपुरक गोष्टी आहेत ना?

हो. प्रायॉरिटी कशाला द्यायची हा मुद्दा आहे.

डिस्टरीब्युशनला दिली तर साठा कमी वेगाने वाढेल.

साठा वाढवण्याला दिली तर डिस्टरीब्युशन योग्य होईल का हे सांगता येत नाही.

रिसोर्सचा साठा वाढवणे/पैदा करणे व आहे त्या साठ्याचे नीट डिस्ट्रिब्युशन करणे या परस्परपुरक गोष्टी आहेत ना?

नाही. अभ्यासांती असे अनेक वेळा दिसुन आले आहे की उत्पादन चांगले किंवा सरासरी असुन सुद्धा वितरण बरोबर नसल्यामुळे भुकबळी आणि कुपोषण हे होते. आफ्रीकेतल्या अनेक देशांमधे गेल्या ३-४ दशकात झालेल्या मानवी ट्रॅजेडी साठी राज्यव्यवस्था नसणे, कायदा व सुव्यवस्था नसणे हीच कारणे दिसुन आली आहेत.

इतकेच काय, पण नैसर्गीक आप्पत्तीच्या काळात सुद्धा व्यवस्था आणि लॉ/ऑर्डर जिथे चांगले आहे तिथे बळी/नुकसान कमी होते.

पण देशाच्या पॉलिसीचा विचार करता व्यवस्था आणि रिसोर्स एकमेकांना कुठे छेदतात? दोघांपैकी एकाकडे लक्ष्य द्यावे अशी परिस्थिती निर्माण कुठे होते? अन्यधान्य, औषधी, इंधन, शैक्षणीक साधनं... हे सगळं निर्माण करण व वितरण करणं हे एकाच प्रोसेसचे ट्प्पे आहेत ना? वर उदाहरण दिल्याप्रमाणे सुदृढ मुलाला जास्त जेवणं द्यावं कि सर्वांना सारखं जेवण द्यावं हा विचार तात्पुरती अ‍ॅडजेस्ट्मेण्ट म्हणुन एकवेळ करावा लागत असेल, पण पॉलिसी बनवताना दलित-पददलीतांच्या अगदी प्राथमीक शिक्षणाची व्यवस्था करणे व टाटा-बिर्ला मंडळींच्या औद्योगीक प्रगतीला चालना देणे हे एकाच सर्वंकष पॉलिसीमधे बसतं.

एकाच पॉलिसीमध्ये बसतं हे खरं आहे. पण पॉलिसीचं implementation करताना (विशेषतः बजेटमधले पैसे सोडताना) "आज माझी काय गरज/निकड/प्रायॉरिटी आहे?" हाच प्रश्न समोर उभा असतो.

अदुबाळ धागाकारत्यांच्या आणि तुमच्या परवानगीने तुमच्या उदाहरणात थोडीशी भर घालू शेतकऱ्याला चार मुले असतील तर ..
..थोरला चांगला धट्टाकट्टा आहे, दुसरा जरा अशक्त आहे. अश्या परिस्थितीत तिसरा आणी चौथा मुलगा थोरल्याचे अनुकरण करायचा प्रयत्न करतील का दूसऱ्याचे ह्यावर त्या घराचे भविष्य अवलंबून असेल.
बाकि देश्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर

- देशाच्या वेगवेळ्या प्रांतात एकेकाळी पुढारलेल्या जाती, आज आरक्षण मागयचा प्रयत्न, आपली सारी न्युसेंस व्हॅल्यू पणाला लावून करत आहेत.
- वेगळ्या राज्याच्या दर्जासाठी सुद्धा अशीच स्पर्धा.
- आमच्या महापौर म्हणतात GST मधून मुंबईला वगळा.
- एक मुख्यमंत्री आहेत त्यांना अस्तित्वातली कुठलीही चौकट मान्यच नाही.
- काश्मीर हा प्रश्न दिवसेंदिवस गुंतागुंतीचा आणि महाग होतोय.
- साध्या पाण्याच्या प्रश्नावर स्वतंत्र भारतातली दोन राज्य कुठल्या स्तरावर भांडतात.

हे सगळे देश्याच्या फक्त डीस्ट्रीब्युशन मध्येच वाढता हिस्सा मागण्यामुळे होत नाही का ? आता हे सगळे पश्न सध्याच्या सिस्टीम मधून सत्तेवर आलेले राज्यकर्ते मग कुठल्याही पक्षाचे असो सोडवू शकतील का ?

शाळेत शिकलेली लोकशाहीची व्याख्या आता कालसुसंगत वाटत नाही. आजची व्याख्या लोकशाही म्हणजे ज्याची न्युसेंस व्हॅल्यू जास्त त्याच्या तालावर नाचणारी व्यवस्था. कुठल्यातरी शायराच्या शब्दात “ ये वो जमूरीयत है जहाँ बंदो को गिना जाता है तोला नही जाता “

बर मग आपण यात काय करू शकतो ? सकारात्मक राहायचा वागायचा प्रयत्न करू आणि बाकि काही नाही तर निदान मिपाकर म्हणून दुसरा कुठला तरी राग एकमेकांवर न काढता फक्त मुद्द्यांवर बोलू.

आदूबाळ's picture

12 Aug 2016 - 9:31 pm | आदूबाळ

शाळेत शिकलेली लोकशाहीची व्याख्या आता कालसुसंगत वाटत नाही. आजची व्याख्या लोकशाही म्हणजे ज्याची न्युसेंस व्हॅल्यू जास्त त्याच्या तालावर नाचणारी व्यवस्था.

झेनभाऊ, हे असंच आहे हो. असंच असतं. असंच होतं. बळी तो कान पिळी हे कॉर्पोरेटपासून देशापर्यंत लागू होणारं अंतिम सत्य आहे.

आपलं शाळाशिक्षण झालं त्या काळात भाबडेपणा जरा जास्त असावा ;)

बर मग आपण यात काय करू शकतो ?

माझं मतः का-ही-ही करू शकत नाही.

तुम्हाला एक आठवण सांगतो. माझी एक आत्या गिरगावात राहते. आयुष्यभर नोकरी केली ती ऑफिसं मरीन लाईन्स ते कुलाबा या भागात पसरलेली. मुंबईची खडान्खडा माहिती आणि विलक्षण प्रेम. तिच्याबरोबर लहानपणी फोर्ट भाग जसा पाहिला तसा परत कधी दिसला नाही.

डिसेंबर २००८च्या पहिल्या आठवड्यात आमच्याकडे काही महत्त्वाचा कौटुंबिक कार्यक्रम होता. २६ नोव्हेंबर २००८ च्या घटनेनंतर आम्ही तिला फोन वगैरे करून ती सुरक्षित आहे ना याची खात्री केली. डिसेंबरच्या कार्यक्रमाला आत्याबाई आल्याच नाहीत! फोन बंद, मोबाईल बंद. शेजार्‍यांकडे फोन केला तर त्यांनी सांगितलं की आत्याबाई आठवडाभर घरातून बाहेरच पडलेल्या नाहीत. घराची दारं वगैरे घट्ट बंद. हाकेला ओ ही देत नाही.

मुंबईतच राहणारा तिचा भाऊ शेवटी बाहेर ठिय्या देऊन बसला. चार तास हाका ऐकल्यावर तिने दार उघडलं. झालं असं होतं, की २६/११च्या घटनेने तिला जबर मानसिक धक्का बसला होता. मानवी आयुष्यात आणि शेंगेच्या फोलपटात विशेष फरक नसतो हे कळण्याइतकं वय होतं तिचं; पण कसाब आणि मंडळींचा नंगानाच, दहशत आणि तिच्या प्राणप्रिय मध्यमुंबईवर आलेलं संकट तिला आतून उध्वस्त करून गेलं होतं. काका सांगतो की कसाब आणि मंडळींना ही आयुष्याच्या उतरणीला लागलेली मध्यमवर्गीय बाई ऐकवणार नाहीत अशा शिव्या देत होती.

आता मला सांगा - देशाला हादरवून टाकणार्‍या या घटनाक्रमात माझ्या आत्याच्या वांझोट्या संतापाला काय अर्थ होता? ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहेत त्याबद्दल आपण डोक्याला शॉट का लावून घ्यायचा?

मला वाटतं मुविही हेच म्हणत होते.

मुक्त विहारि's picture

13 Aug 2016 - 4:05 pm | मुक्त विहारि

माझे जे काही देशा बाबत मुद्दे आहेत, त्यात "सुरक्षा" हा विषय प्रथम स्थानी आहे.

अर्थात,

हे मुद्दे पण माझे नसून, "चाणक्य"चेच आहेत.

देशाच्या उन्नती बाबत, "सर्वांगिण, सार्वकालिन आणि जनतेला विश्र्वासात घेवून," राज्यकारभार कसा करावा? ह्या बाबबत त्याने फार उत्तम विचारमंथन केलेले आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Aug 2016 - 2:07 am | डॉ सुहास म्हात्रे

आजची व्याख्या लोकशाही म्हणजे ज्याची न्युसेंस व्हॅल्यू जास्त त्याच्या तालावर नाचणारी व्यवस्था. कुठल्यातरी शायराच्या शब्दात “ ये वो जमूरीयत है जहाँ बंदो को गिना जाता है तोला नही जाता “

हे सर्वच क्षेत्रांत सार्वकालिक सत्य आहे. माणुस असाच होता, आहे आणि राहील... काही संतमहात्म्यांचा अपवाद वगळता.

हीच संकल्पना लोकशाहीच्या संदर्भात थोड्या वेगळ्या शब्दात अशी मांडता येईल... "जर जनतेला आपल्या मतांची संयुक्त किंमत समजली-उमजली आणि जर अशी जनता सार्वजनिक भल्यासाठी (कॉमन गुड) एकत्र आली तरच लोकशाहीत चांगले काम करण्यासाठी सरकारवर जनतेचा दबाव तयार होतो."

जेथे ज्या ज्या प्रमाणात ही परिस्थिती आहे, तेथे त्या त्या प्रमाणात चांगली-वाईट लोकशाही व्यवस्था आहे.

मन१'s picture

12 Aug 2016 - 10:05 am | मन१

फेमस अर्थशास्त्री , इकॉनॉमिक टाइम्सचे माजी संपादक, कॅटो इन्स्टिट्यूटवाले स्वामिनाथन अय्यर हेही तुमच्याशी बरेचसे सहमत दिसताहेत आ.बा.
त्यांचा एक लहानसा पण माहिपूर्ण लेख --
http://blogs.timesofindia.indiatimes.com/Swaminomics/drought-not-a-big-c...
.
.
त्यातला एक भाग --

Then came the green revolution.This, it is widely but inaccurately believed, raised food availability and ended import dependence. Now, the green revolution certainly raised yields, enabling production to increase, even though acreage reached a plateau. But it did not improve foodgrain availability per person. This reached a peak of 480 grams per day per person in 1964-65, a level that was not reached again for decades. Indeed, it was just 430 gm per day per person last year. Per capita consumption of superior foods—meat, eggs, vegetables, edible oils—increased significantly over the years. But poor people could not afford superior foods.

How then did the spectre of starvation vanish? Largely because of better distribution. Employment schemes in rain-deficit areas injected purchasing power where it was most needed. The slow but steady expansion of the road network helped grain to flow to scarcity areas. The public distribution system expanded steadily. Hunger remained, but did not escalate into starvation. By the 1990s, hunger diminished too.
.
.
दरडोइ अन्नोप्लब्धी, आणि प्रत्येकाला अन्न पोचवण्यात डिस्ट्रिब्युशन / वितरण व्यवस्थेचं महत्व आहे; असं ते म्हणताहेत.
.
.
वैधानिक इशारा -- finance,commerce, economics मध्ये मी निरक्षर आहे.

झेन's picture

11 Aug 2016 - 10:24 pm | झेन

तिकडे तरी गडबड आहे, माझ्या समजण्यात नाहीतर समजवण्यात कुठे तरी लोच्या आहे.
जर आल ईज वेल आहे तर इथे काही जण हताश होवून देश सोडून निघालेत. त्यांची कारणं पण चूकीची वाटत नाहीत. ते ब्रेनड्रेन का काय ते भास काय वो.

तिकडं युरोप मधून बाहेर पडायचे स्वतःचे प्रश्न पडलेले असताना ईंग्रज इथल्या पुलाच्या देखभालीच्या उसाभरी करतोय . आम्हाला जिवंत माणसापेक्षा मेलेल्या गाईंची लैच काळजी, पडंनाका पूल नवीन काढुकी टेंडर. झालंच तर नविन कर्ज काढून प्रत्येक शहरात ब्यारटी काढू, प्रत्येकदिवशी दोनदा मरणार्या माणसाला हेल्मेट घालू.
इथं रीसोरसेस म्हणजे फक्त नैसर्गिक नाय वो.

संदीप उन्नीकृष्णनचा वर कोणीतरी उल्लेख केला आहे त्याच्यासारखी उमदी तरूण मुले हकनाक ब़ळी जातात तेव्हाही खूप वाईट वाटतं. राजकीय सोयीसाठी पर्यावरणाचा बळी दिला जातो तेव्हाही वाईट वाटतं. या सगळ्याला आपण एकेकटे काही उपाय करू शकत नाही म्हणून हतबलता येते; जिचा तसा काही उपयोग नसतो. पण तरीही आपले मध्यमवर्गीय संस्कार मुलांना अशा भ्रष्ट व्यवस्थेशी जुळवून घ्यायला शिकवू शकत नाहीत. जमेल तेवढा प्रतिकार करावा पण आपल्या देशातल्या व्यवस्थेशी, आपल्याच लोकांशी लढताना हुतात्मा व्हायचीही गरज नसते. त्यातून काहीही साध्य होत नाही. आपले मन, संवेदना जिवंत ठेवणे एवढेच आपल्या हातात आहे. आज उद्या नाही, कदाचित काही पिढ्यानंतर अशा जिवंत अनेक मनातून एखादी ठिणगी पडेल, त्यातून उत्पन्न झालेला अग्नि सगळे हीण जाळून टाकेल.

उपाशीपोटी माणसाला उद्योग करुन १० रुपयाचे १५ रुपये करणं, पुस्तकं घेणं, स्वच्छतेची साधनं गोळा करणं वगैरे शक्य नसतं. तो त्या पैशातुन आधि पोट भरेल. आपलं तेच रडगाणं आहे. जगावर अनेक युद्ध लादुन, करायचा तो सर्व सत्यानाश झाल्यावर आलेल्या शहाणपणातुन (काहि) विकसीत राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था व समाजव्यवस्था प्रगल्भ झाल्या आहेत. त्यांच्याशी भारताची वन टु वन तुलना करणंच चुकीचं आहे.

आरटीआय, व्हिसलब्लोअर्स, एन. जी. ओ. वगैरे संस्थांची गळचेपी होताना आपण बघतो, कायद्याचे धिंडवडे निघताना बघतो तेंव्हा फार काहि अचंबीत करणारं होतय असं आपल्याला वाटतं. पण अ‍ॅक्च्युली ते तसं नाहिच. कायदा पुरेसा सुदृढ असता आणि मोडला गेला असता तर आश्चर्य वाटायला हवं. पण कायद्याचं मनगट अजुन मातिचच आहे म्हटल्यावर ते मुरगळणाच. अश्रु गाळुन कायदा मजबूत होणार नाहि. (विकसीत राष्ट्रांमधे एन.जी.ओ वगैरेची जितकी साळसूद गळचेपी होते त्याला तोड नाहि. बकरा हलाल करा वा खटका, त्याच्या नशीबातली सुरी चुकत नाहि. तो वेगळा मुद्दा आहे.)

परकीय परिपक्व सिव्हिलाइज्ड सोसायटीशी तुलना करताना त्यातील मुल्यात्मक बाबींकडे झोळेझाक करुन फायदा नाहि. मुल्य जर नाकारली तर दृष्य परिणाम कधिच अवतरणार नाहि. मग रस्त्याच्या कडेला कितीही कचराकुंड्या ठेवा, त्याच्या आजुबाजुलाच कचरा होईल. हे मुल्यात्मक बदल व्हायला लागायचा तेव्हढा वेळ लागेलच.

थोडक्यात काय, तर अजुन फार लांबचा पल्ला गाठायचा आहे. आता कुठे सुरुवात झाली आहे.

संदीप डांगे's picture

12 Aug 2016 - 6:53 am | संदीप डांगे

+१

संदीप डांगे's picture

12 Aug 2016 - 6:53 am | संदीप डांगे

+१

अंतरा आनंद's picture

12 Aug 2016 - 10:12 am | अंतरा आनंद

अतिशय योग्य प्रतिसाद.

परकीय परिपक्व सिव्हिलाइज्ड सोसायटीशी तुलना करताना त्यातील मुल्यात्मक बाबींकडे झोळेझाक करुन फायदा नाहि

जगावर अनेक युद्ध लादुन, करायचा तो सर्व सत्यानाश झाल्यावर आलेल्या शहाणपणातुन (काहि) विकसीत राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था व समाजव्यवस्था प्रगल्भ झाल्या आहेत. त्यांच्याशी भारताची वन टु वन तुलना करणंच चुकीचं आहे.

पिलीयन रायडर's picture

12 Aug 2016 - 8:31 pm | पिलीयन रायडर

तुम्ही फार मुद्द्याच बोलता! मागेही तुमचा तो कयदे विषयक एक प्रतिसाद फार आवडला होता.

तुम्ही फार मुद्द्याच बोलता

याला +१.

अर्धवटराव's picture

12 Aug 2016 - 10:58 pm | अर्धवटराव

आमची सौ नेमकी याच्या उलट तक्रार करते :ड

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Aug 2016 - 2:13 am | डॉ सुहास म्हात्रे

ते पण एक सार्वकालिक, सार्वस्थलिक सत्य आहे :) ;)

याबाबतीत मिशेल ओबामामी आम्हास अत्यंत पूजनीय आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Aug 2016 - 11:35 am | डॉ सुहास म्हात्रे
अभिदेश's picture

13 Aug 2016 - 2:21 am | अभिदेश

प्रतिसाद ... असेच लिहिणार होतो.

कपिलमुनी's picture

13 Aug 2016 - 12:30 pm | कपिलमुनी

याच प्रकरणाची दुसरी बाजू लौकरच लिहीतो .
( सध्या ट्रेलर दाखवायची फॅशन आहे)

अभिजीत अवलिया's picture

16 Aug 2016 - 12:11 am | अभिजीत अवलिया

मु.वि. काकांनी जे मुद्दे उपस्थित केलेत ते योग्य आहेत.

एक उदाहरण द्यायचं झाले तर -
तुम्ही भारतात कार चालवत आहात आणी अचानक चुकीच्या बाजूने गाडी चालवत येणारा एक बाईक वाला तुम्हाला धडकला.
--- 100 लोक गोळा होतील. कुणाची चुकी आहे हे बघणं प्रश्नच नाही. तुमची गाडी मोठी आहे त्यामुळे चूक तुमचीच. मग काही जण तुमच्यावर हात टाकतील आणी बाकीचे सगळे जण वाहत्या गंगेत हात साफ करून घेतील. तुमच्या कार वर पण दगड मारून काचा फोडून टाकतील. (10 पैकी 9 वेळा हेच होईल).

हीच गोष्ट एखाद्या विकसित देशात घडली उदा. इंग्लंड.
-- (मुळात चुकीच्या बाजूने कुणी गाडी चालवणाराच नाही.) आपण समजू की दोघेही योग्य बाजूने गाडी चालवत आहेत आणी तरी पण बाईक वाला तुम्हाला धडकला.
कार आणी बाईक वाला दोघेही शांत असतील. पोलीस येतील. ज्याची कुणाची चूक असेल तो चूक मान्य करेल. दुसऱ्या व्यक्तीची माफी मागेल. जो काही दंड असेल तो भरून टाकेल. दोघेही निघून जातील.

हा फरक आहे विकसित देशातल्या लोकांच्या मानसिकतेचा आणी भारतातल्या लोकांच्या मानसिकतेचा. तुमची चूक नसताना देखील लोक तुम्हाला मारझोड करू शकतात. (मुळात तुमची चूक असली तरी तुम्हाला शिक्षा करायचा अधिकार लोकांना नाहीच).

त्यामुळे ज्याला आपल्या देशातले वातावरण चालत असेल आणी जो त्यात तग धरू शकतो त्याने इथे राहावे. ज्याला विकसित देशात जाऊन (जिथे भारतापेक्षा फार मोठ्या प्रमाणात कायदा पाळला जातो) राहायची इच्छा आहे त्याने शक्य असेल तर तिथे जाऊन स्थायिक व्हावे.

शेवटी प्रत्येकाचे आयुष्य हे स्वतः:चे असते. ते कोणत्या देशात, कोणत्या वातावरणात घालवायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. लोक काय का म्हणेनात तिकडे.

शेवटी काय ठरलं? या देशात राहायचं की जायचं? To stay or not to stay?

संदीप डांगे's picture

16 Aug 2016 - 6:23 am | संदीप डांगे

देशातच राहूया पण कुंथत- कुढत... ;)

पण काळ सोकावतोय!
ही कळकळ आहे लेखात जागोजागी.
राजकारणी लोक, भ्रष्ट अधिकारी व पोलिस या अभद्र युतीचा पुढील कार्यक्रम मुंबई -पुणे द्रुतगती मार्गाचे रुंदीकरण करण्याचा घाट घातला जातोय, तेव्हा याच जमिनी सरकार चढ्या दराने विकत घ्यायला भाग होईल. इतका सरळ हिशोब न घाई न गोंधळ. पण शेट्टींचे खरे देशप्रेम नडले, व ते प्राण पणाला लागले कारण त्यांचा देशावर, कायद्यावर, पोलिस व न्याय व्यवस्था, पत्रकारिता यावर असलेला विश्वास. परंतु जनता (वरील मिपाकर जे विषयान्तरण व गांभीर्य दूर करण्याचे सत्कर्म करता करता हे भान ही विसरले की श्री शेट्टी यांचे बलिदान व्यर्थ चालले ) जागरूक रहावी ही व शेट्टी यांच्या कायदेशीर लढाईला पाठबळ देणे हा हेतु साध्य करण्यास हातभार लागावा व पाठींबा द्यावा, कायदेशीर लढा सरकारवर दबाव आणून तपासाचा वेग व दिशा वाढवावी हा आग्रह जनतेतून पोहोचवावा याचसाठी हा लेखनप्रपंच दिसतोय.
मला तरी एका सामाजिक सैनिकाची समाज कंटकांकडून निघृण हत्या जोवर खुन्यांना शिक्षा होत नाहीं तोवर हा विषय लावून धरण्यास कुठल्याही माध्यमाची मदत घ्यावी लागली तर नि:संकोच हाक द्यावी, असे वाटल्यास समर्थनच द्यावे असे वाटते.
कृपया विषय गंभीर आहे याची जाण बाळगा, अगोचर पणा थांबवा!