सध्या एक जुनी बातमी वाचली ,,,पुण्याच्या एक RTI कार्यकर्ते ची हत्येच्या तपासाची.......
तो कार्यकर्ता एका रोड बनवणाऱ्या कंपनीने अवैधरित्या संपादित केलेल्या जमिनीची माहिती बाहेर काढत होता. जेव्हा त्या कंपनी चे गैरव्यवहार बाहेर पडायला सुरवात झाली ,,,त्या नंतर लगेचच या कार्यकर्त्याला पुण्यात अतिशय क्रूर पद्धतीने मारून टाकण्यात आले . त्या नंतर पोलिसानी ज्या पद्धतीने तपास केला त्याचे परिणामी CBI कडे case सोपवण्यात आली. त्या कार्यकर्त्याच्या सख्या भावाने त्याचा लढा पुढे चालू ठेवलाय. तो highcourt मध्ये स्वतः म्हणणे मांडतोय.आणि सगळ्यात वाईट म्हणजे cbi ने पण त्याला आता ठेंगा दाखवलाय . CBI केस बंद करायच्या विचारत आहे म्हणजे बंदच केली होती ,पण त्या सख्या भावाने पुन्हा कोर्टात पिटीशन दाखल करून CBI ला CASE तपास करायला भाग पाडले.
कार्यकर्त्याच्या हत्येला 5 वर्ष उलटून गेल्यावर पण काहीच तपास नव्हता . त्या सख्या भावाचा संशय त्या रोड बनवणाऱ्या कंपनी च्या मालकावर होता ,ती कंपनी महाराष्टाली खूप मोठी रोड बनवणारी कंपनी आहे.ज्यात खूप मोठया लोकांचे आर्थिक हितसंबंध गुंतले आहेत.
एखाद्या चित्रपटाला शोभेल अश्या काही गोष्टी या case मध्ये घडल्या आहेत.
आता सगळ्या पात्रांची नावं सांगतो.
ज्याचा खुन झाला ते सतीश शेट्टी
त्यांचा सख्खा भाऊ संदीप शेट्टी
रोड बनवणारी कंपनी IRB इन्फ्रा.
कंपनी चे मालक वीरेंद्र म्हैसकर.
या हत्येची पार्श्वभूमी बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती असेल .
सतीश शेट्टी RIT कार्यकर्ते होते.irb इन्फ्रा ने मुंबई पुणे द्रुतगती मार्ग या शेजारील गावात अवैधरित्या जमीन संपादित केली होती असा सतीश शेट्टी ना संशय होता . माहितीच्या अधिकाराखाली त्यांनी सगळी माहिती मागवली आणि त्यांच्या लक्षात आले कि इथे काही काळेबेरे कारभार चाललाय.ज्यामध्ये सरकारी अधिकारी ,irb इन्फ्रा चे अधिकारी ,राजकीय लोक यांचे हितसंबंध गुंतले होते. त्यांनी irb विरोधात complaint दाखल केली. त्यानंतर त्यांना IRB कडून साम, दाम,दंड ,भेद हि नीती अवलंबली गेली. आधी धमकीवजा समाजवण्यात आले.तरी ते ऐकले नाहीत. मग 2 कोटी ची लाच देण्याची गोष्ठ झाली ती हि त्यांनी नाकारली. मग त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यांनी मग पोलीस संरक्षण मागितले कारण त्यांना काही लोकांकडून धोका होता .त्या लोकांची नावे पण त्यांनी पोलिसांना लिहून दिली . तरीपण त्यांची हत्या करण्यात आली.
या नंतर या हत्येचा तपास सुरु झाला.
तपास करणारे अधिकारी यांनी जणू आधीपासूनच ठरवले होते कि काही लोकांना जाणूनबुजून वाचवायचे आहेत.त्या साठी त्यांनी बनावट साक्षीदार तयार केले.त्यात त्यांना यश आले नाही. त्यात एक चमत्कार घडला .राज्य सरकार ने हा तपास CBI म्हणजे देशाची सर्वोच्च तपास यंत्रणे कडे कोणीही मागणी न करता सोपवली. त्या वेळी गृहमंत्री होते आपले आबा .जे आता आपल्यात नाहीयत. CBI कडे CASE गेली कि लोकांना वाटते कि आता दुध का दुध और पाणी का पाणी होते.तसंच सतीश शेट्टी यांचे भाऊ ना पण वाटले ,आणि तपासाची सूत्रे cbi ने मुंबईच्या STF कडे दिली . STF ने चालढकल केली त्यात एक वर्ष गेलं ,त्यानंतर HIGH कोर्ट मध्ये STF म्हटले कि आम्हाला लोंकांची चौकशी करायची आहे,तेव्हा HIGH कोर्ट ने ताशेरे ओढत म्हटले कि या लोकांची नावे संदीप शेट्टी ने एक वर्षांपूर्वी तुम्हाला
सांगितली आहेत .आणि तुम्ही एकवर्ष नंतर तीच नावे आम्हाला सांगताय .मग तुम्ही एक वर्ष काय केलं? अशी ऑर्डर पण त्यांनी दिली ,याची दखल CBI चे एक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेऊन STF कडून तपास काढून घेतला आणि पुण्याचा ACB कडे दिला.नंतर तपासाणे जोर धरला. IRB च्या कार्यालयांवर छापे टाकले .खुप गोष्टी पुढे आल्या. परंतु त्यानंतर CBI च्या वकिलांनी कोर्टात ARGUMENT करणंच
बंद केलं.का कोणास ठाऊक,
थोड्याच दिवसांनी हि case बंद करायचा निर्णय cbi ने घेतला.
परंतु संदीप शेट्टी यांनी हार न मानता पुन्हा कोर्टाचे दरवाजे ठोठावले .पुन्हा नव्याने पिटीशन दाखल केली . आणि त्यात रिस्पॉन्डन्ट म्हणून cbi चे डायरेक्टर ,आणि तपास करनारे अधिकारी यांना केले.त्यावेळी कोर्टाने पण संदीप शेट्टी ना विचारले कि
आपण इतक्या वरिष्ठ पातळीच्या लोकांना कसे काय रिस्पॉन्डन्ट करू शकता...त्यावेळी संदीप यांनी स्वतः कोर्टाला आपले म्हणणे पटवून दिले व कोर्टाने हे मान्य केले.
आणि आता height म्हणजे CBI हि CASE पुन्हा रेइन्वेस्टीगेट करणार आहे.म्हणजे इतके वर्षे cbi काय भाकऱ्या थापत होते कि काय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
यात हितसंबंध कसे काय आहेत आणि कोनाकोनाचे आहेत याचा थोडा अभ्यास केला तर असे दिसून येते कि आपल्या देशातील खुप मोठ्या मोठ्या लोकांचा हात आहे.
देवेंद्र म्हैसकर जे फोर्ब्स मासिकानुसार देशातील पहिल्या 50 श्रीमंत लोकांमध्ये आहेत. आणि श्रीमंतीचे रहस्य काय तर रोड तयार करायची मोठी मोठी कंत्राट याना मिळत गेली. Virendra हे नवीमुंबई येथील एका कॉलेज मध्ये डिप्लोमा झालेले आहेत.
त्यानंतर ते त्यांच्या कौटुंबिक व्यवसायात दाखल झाले. वीरेंद्र म्हासीस्कर चे वडील कंत्राटदार असताना ते मुंबई मध्ये स्थायिक होते.शिवसेना भाजपा च्या जवळचे होते .ह्या हितासंबंधाच्या जोरावर त्यांनी युतीच्या सरकार वेळी खूप मोठी कंत्राटे मिळवली .आणि त्यावेळी महाराष्ट्र सरकार मध्ये बांधकाम व परिवहन मंत्री होते नितीन गडकरी . साहजिक गडकरी यांच्या संमती शिवाय इतकी मोठी कंत्राट मिळणं शक्य नव्हतं. आणि नितीन गडकरी यांचे सुपुत्र देखील या कंपनी च्या भगिनी कंपन्या मध्ये डायरेक्टर बॉडी वर होते असा एक आरोप आहे . या कंपनी मध्ये शरद पवार यांचे पण हजारो शेर आहेत आणि हे त्यांनी जाहीर केले आहे.
त्यात आता पुन्हा युतीचे सरकार आहे . आणि राज्यातली व्यक्ती नितीन गडकरी आता केंद्रात आहेत . साहजिक त्यांचे वजन केंद्रात खुप आहे.
योगायोग बघा , जसं केंद्रात bjp सरकार आले तसं सतीश शेट्टी case मध्ये cbi काम करणं बंद झालंय, म्हणजे ते मनापासून काम करत नाहीय. त्यांना हि case काहीही करून बंद करावी असे आदेश आहेत असाही आरोप संदीप शेट्टी यांनी केला आहे.
इतकं सगळं लिहायचं कारण कि आपल्या देशात विश्वास ठेवायचा तर कोणावर . राज्यसरकार,राज्यपोलिस, तपास यंत्रणा,राज्यकर्ते,CBI, CID, मंत्री कि आणखी कोण?
आपण अराजकतेकडे वाटचाल करत आहोत का?
असे आणखी 14 rti कार्यकर्ते यांचे बळी गेलेत,,,,त्यांचा तपास शुन्य
दाभोलकर गेले, कलबुर्गी गेले,पानसरे गेले,
यांना जेम्स बॉन्ड ने मारले काय?
कि कोणीही या गोष्टींचा छडा लाऊ शकत नाही
का यांनी सर्वांनी स्वतः स्वतः च्या हत्या केल्या,,,सलमान खान case मध्ये चिंकारा काळविटाने पिस्टल ने आत्महत्या केली का?कि फुटपाथ वर झोपलेले लोक स्वतः सलमानच्या गाडीखाली गेले. न्याय लवकर मिळत नसेल तर लोकांनी किती दिवस कोर्टाच्या पायऱ्या झिजवायच्या,,,,स्वतः च्या नोकऱ्या सोडून नुसतं कोर्ट कचेरी करायची,,,,आणि यासाठी जो पैसा लागतो तो आणायचा कोठून?
एकंदरीत माझा स्वतःचा विश्वास या देशावरूनच उडालाय ...इथे पैसा फेको तमाशा देखो असाच प्रकार चाललेय. ज्याच्याकडे पैसा ,सत्ता त्याच्याकडे न्याय . आता तीन महिन्यापूर्वी सतीश शेट्टी प्रकरणामध्ये पहिली अटक झाली आहे आणि ज्यांना अटक झालीय ते आहेत याच case चे तपास करणार पुणे ग्रामीण पोलिसांचे अधिकारी. यांनी जाणीवपूर्वक बोगस पुरावे तयार करून खोटी case तयार केली.मूळ पुरावे नष्ट केले.चुकीचा तपास केला. ANi या हत्येत indirect सहभाग असल्याचा या वर आरोप आहेत. संदीप शेट्टी यांच्या मते हे दोन अधिकारी irb चे पुण्यातले हस्तक असून या case मधले खुप छोटे मासे आहेत. हत्या होऊन 5 वर्ष उलटलेली आहेत.पुढे काय होईल माहित नाही.
मिपा करानो आपल्याला काय वाटते , या प्रकरणात तसेच या सारख्या दुसऱ्या प्रकरणात न्याय मिळायची शक्यता किती आहे? कि जिथे इतके मोठे लोकांचे लागेबांधे असतात .
प्रतिक्रिया
17 Aug 2016 - 10:16 pm | योगेश कोकरे
खुप कमी लोकांनी हा लढा पुढे कसा चालू राहील किंवा शेट्टी नी दिलेला लढ्याला मदत कशी होईल या बाबतीत विचारले. नशीब दाभोलकर पानसरे यांच्या मृत्यू नंतर खूप संघटना त्यांच्या खुनाच्या तपासाचा पाठपुरावा करत आहेत . अशी खूप कमी लोक शेट्टी यांच्या पाठीशी आहेत . त्यामुळे दाभोलकर पानसरे कलबुर्गी यांच्याबाबत सरकार दक्ष आहे असं वाटतं. पण यावरून एवढं नक्की आहे कि ज्याचं जळतं त्यालाच कळत....लोक तुमच्या मदतीला येतील अशी अपेक्षा करू नका
9 Feb 2019 - 10:35 am | एकुलता एक डॉन
nanter kay jhale
12 Feb 2019 - 12:35 pm | Rajesh188
देशाची राजकीय सामाजिक परिस्थिती खरोखर चिंताजनक आहे .
जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपण स्वतःचीच पाठ थोपटून घेतो .पण खरोखर आपल्या देशात लोकशाही आहे .
मतदान जे होत ते खरोखर योग्य व्यक्तीला होते का ? तर ह्या प्रश्नाचं उत्तर नाही असेच आहे .
लोक मतदान करताना जात,धर्म,भाषा, ही बाब लक्षात घेवून मतदान करतात .खूप लोकांना तर मतदान करणे हा आपला सर्वात मोठा अधिकार आहे आणि योग्य व्यक्तीला निवडून देणे आपल्या भविष्यात काय वाढून ठेवलं आहे ते ठरवत आसात ह्याची सुधा जाणीव नाही त्या मुळे च nalike लोक राज्य करतात .
भारतात समाज विघुरलेला आहे जरी आपण ऐक देश ऐक राज्य म्हणत आसू तरी समाजात जाती जाती मध्ये ,धर्म धर्मा मध्ये भाषा प्रांत ह्या खूप मजबूत भेदभाव आणि द्वेष आहे .ह्यामुळे राजकारणी लोक बरोबर भावनिक खेळी खेळून निवडून येतात .
आर्थिक प्रगती आणि कायदा आणि सुव्यवस्था ,brashtachar मुक्त प्रशासन हे कधीच निवडणुकी चे मुध्ये बनत नाहीत आणि कोण्ही ह्या मुद्यावर निवडणुका लढवल्या तर जनतेला ते मुदे महत्त्वाचे वाटत नाहीत आणि नेमकी चुकीचं माणसं निवडून आणतात .
आशि ही mature भारतीय जनता देशाला कंटाळून दुसऱ्या चांगल्या देशात स्वार्थ साठी गेली आणि तिथे थोडी मोकळीक मिळाली तर त्या चांगल्या देशाचा सुधा भारत बनवतील हे मात्र नक्की .
सामाजिक काम करणाऱ्या संघटना आपल्या देशात नाहीत ज्या द्वारे दबाव आणू शकतो .
काही होत्या पण समर्थन मिळाले की ते पण राजकारणात गेले परत जैसे थे .
तेव्हा आता स्वतःच लोकांनी संघडतीत व्हावे आणि पहिले स्वतःला बदलाव तरच काहीतरी मार्ग निघेल .
एनजीओ आपल्याच धुंदीत आसतात जे फंडींग करतात त्यांच्या साठीच काम करतात आणि खूप एनजीओ लोकहिताचे काम करत नाहीत हे पण सत्य आहे .
दुसऱ्या देशात जाणे हा काही मार्ग नाही
24 Feb 2019 - 11:43 am | मराठी_माणूस
महत्वाचा समजला जाणारा "चौथा स्तंभ" अशा लोकांच्या प्रायोजकत्वाखाली चर्चासत्रे घडवुन आणतो.
24 Feb 2019 - 2:23 pm | नगरीनिरंजन
तथाकथित देशभक्त सरकार आल्यावर तरी माहिती अधिकार कायदा व कार्यकर्ते यांना पुष्टी मिळेल; राजकीय देणग्यांच्या बाबतीत पारदर्शिता येईल असे वाटले होते; पण म्हणतात ना, भरवशाच्या म्हशीला टोणगा!
भक्त मंडळी मात्र ह्या टोणग्यालाच पारडी म्हणून सिद्ध करण्यात मग्न आहेत.