छोटी राज्ये

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
25 Mar 2016 - 2:48 pm

.
महाराष्ट्रामधे गेले काही दिवस गाजत असलेला मुद्दा म्हणजे छोटी राज्ये.
वेगळी राज्ये, छोटी राज्ये या मुद्यावर अणेंची सोपी विकेट घेण्यात आली.
पण
एक लक्षात घेणे गरजेचे आहे. एका अणेंवर जबाबदारी टाकून उपयोग नाही

अटलजींच्या काळातच ३ नवी राज्ये अस्तित्त्वात आली होती. सध्याचे मुख्यमंत्री आणि नागपूरचे केंद्रीय मंत्री विदर्भवादी आहेत.
विदर्भ आणि मराठवाड्याने महाराष्ट्रातच राहणे कसे त्यांच्या हिताचे आहे हे फक्त पश्चिम महाराष्ट्राचे नेतेच सांगत असतात.
भाजपाच नव्हे तर काँग्रेसमधेही वेगळ्या राज्यांचे समर्थक आहेतच. लोकभावना पाहता काही उमेदवारांना पक्षाच्या विरोधातही भूमिका घ्यावी लागणार आहे.

जगभरात प्रशासकीय सोयीसाठी छोटी राज्ये हा विषय चर्चिला जातो. सर्वत्र विरोधाचे मुद्दे एक सारखेच असतात. त्याच त्याच भावना अस्मिता गैरत पुढे केल्या जातात.

वास्तविक नव्या राज्यांसाठी पूर्वी जशी हिंसक आंदोलने झाली तशी न होता त्यासाठी असलेल्या संविधानात्मक तरतुदींचा आधार घेतला जावा ही अपेक्षा आहे

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

गॅरी शोमन's picture

25 Mar 2016 - 3:08 pm | गॅरी शोमन

कै. डॉ .श्रिकांत जिचकार यांचे लेखन पहावे. त्यांनी वेगळ्या विदर्भाच्या मुद्याला काँग्रेसचे मंत्री असताना सकारात्मक प्रतिसाद दिला होता परंतु आत्ता ही योग्य वेळ नाही असे म्हणले होते असे आठवते. समर्थनार्थ एकच मुद्दा आकडेवारी सहीत दिला होता तो असा वेगळा विदर्भ केल्यास विधानसभा आहे, राजधानी आहे पण सनदी अधिकार्‍यांचे पगार देता येतील इतके उत्पन्न नाही. राज्याच्या उत्पन्नाची सर्व मोठी साधने पश्चिम महाराष्ट्रात एकवटली आहेत.

राजकीय विरोध तर आहेच पण हा मुद्दा सुध्दा महत्वाचा आहे. आजही विदर्भात कारखाने नाहित ज्यातुन विक्रीकर किंवा अन्य करातुन राज्याला उत्पन्न मिळेल. जे काय उत्पन्न आहे ते शेतीवर आधारीत ज्यावर कोणताही कर लागु शकत नाही आणि उलट हमी भाव देण्यासाठी सरकारला बाजारभावापेक्षा जास्त दराने ते खरेदी करावे लागते.

पैसा's picture

25 Mar 2016 - 6:12 pm | पैसा

एकाच विषयावर दोन धागे आजच्या दिवशी! काय योगायोग!

भीमराव's picture

26 Mar 2016 - 4:59 pm | भीमराव

समजा जर झालेच तुकडे तर ह्या नव्या राज्यांची नावे काय असतील? वेगळ्या राज्यांच्या राजधान्या कोणत्या होतील? पश्चिम महाराष्ट्राच्या राजधानीचा मान कुनाला मिळेल? बेळगाव चा समावेश कुठल्या संयुक्त लघुराष्ट्रात होईल? विदर्भाची मागणी खुप जुनी आहे मग एखादे महाराष्ट्र गीतासारखे विदर्भ गीत प्रचलीत आहे का?प्राथमीक शिक्षणासाठी बोलीभाषांचा विचार होईल का? मुंबई कोणाची .....?

मिपाआजोबा मंडळाच्या प्रतीक्षेत
बाब्या

काळा पहाड's picture

27 Mar 2016 - 12:44 am | काळा पहाड

समजा जर झालेच तुकडे तर ह्या नव्या राज्यांची नावे काय असतील? - १) महाराष्ट्र, २) पास, ३) पास
वेगळ्या राज्यांच्या राजधान्या कोणत्या होतील? - १) मुंबई २) पास ३) पास
पश्चिम महाराष्ट्राच्या राजधानीचा मान कुनाला मिळेल? - मुंबई
बेळगाव चा समावेश कुठल्या संयुक्त लघुराष्ट्रात होईल? - कर्नाटक
विदर्भाची मागणी खुप जुनी आहे मग एखादे महाराष्ट्र गीतासारखे विदर्भ गीत प्रचलीत आहे का? - पास
प्राथमीक शिक्षणासाठी बोलीभाषांचा विचार होईल का? - पास. विदर्भ मराठवाडावाले बघून घेतील
मुंबई कोणाची .....? - १०५ की १०७ हुतात्मे देणार्‍यांची. अर्थात महाराष्ट्राची.

आशु जोग's picture

27 Mar 2016 - 12:22 am | आशु जोग

:)