प्रतीक्षा

निळ्याभोर उंच नभी
सावळे काळे विखुरलेले मेघ
त्याखाली अथांगशा धरणीवर
हिरवेगार एक छोटेसे शेत
-जसे माझे स्वप्नातील सुंदर जग-
शेताच्या मधूनच जाते लांबडी
पायवाट एक हिरवट तांबडी
एक रेषा जशी आडवी तिडवी
छेदीत त्या शेताला वाकडीतिकडी
-करीत जणू माझिया स्वप्नांचा भंग-