अन् मलाही!

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
14 Jan 2016 - 9:10 pm

एक सांगू? ऐकशील?
ते कंगव्यातून सुटणारे केस
राहूदे तसेच, भुरभुरूदे
तेवढाच त्यांना विरंगुळा
...अन् मलाही!

वाराही कधी लाडात येतो
पदराशी सलगी करतो
तू तशीच राहा, मला सावरू दे
खेळू दे त्या दोघांना
...अन् मलाही!

मोकळी छान हसताना
इकडे तिकडे पाहताना
वेडी डूलं झुलत राहतात
झुलू दे त्यांना मजेत
...अन् मलाही!

गालावरच्या खळ्यांना
लाल ओठ नि चंद्रबिंदीला
न्याहाळत बसतो आरसा
पाहू दे ग निवांत त्याला
...अन् मलाही!

- संदीप चांदणे

कविता माझीप्रेम कविताभावकविताशांतरसकलावाङ्मयकविताप्रेमकाव्यमुक्तक

प्रतिक्रिया

एक एकटा एकटाच's picture

14 Jan 2016 - 10:47 pm | एक एकटा एकटाच

वाह!!!!!!!

झक्कास

प्रचेतस's picture

15 Jan 2016 - 10:34 am | प्रचेतस

भारी.

सस्नेह's picture

15 Jan 2016 - 10:41 am | सस्नेह

एक शंका. 'वेडी डूलं' की 'वेडे डूल' ?

प्रचेतस's picture

15 Jan 2016 - 10:44 am | प्रचेतस

डूलं

वेल्लाभट's picture

15 Jan 2016 - 11:02 am | वेल्लाभट

कल्ला !

मस्तच! खुसखुशीत

अजया's picture

15 Jan 2016 - 11:08 am | अजया

वा! मस्तच.

चांदणे संदीप's picture

15 Jan 2016 - 12:51 pm | चांदणे संदीप

____/\____

Sandy