"चक्रव्यूह"
रुतलेला मी
खोल चक्रव्यूहात
"मी" पणाच्याच
खेचणारं आकर्षण
चक्रव्यूहाच्या केंद्रात
केलेली प्रत्येक कृती
उचललेलं प्रत्येक पाऊल
परिघात चक्रव्यूहाच्याच
सभोवती रिंगण नात्यांचं
हा, ही, हे, तो, ती, ते,
तेही जोडलेले एकमेकांशी
Covalent बॉन्डने
"मी" पणाच्याच
आहेत ही नाती निरर्थक
की तेच सत्य?
घडू पाहतो स्फोट
पण घडत नाही
कारण कवच घट्ट
"मी" पणाचंच
एक कळ तीव्र
छातीत, डाव्या हातात
समोर आहेस का तूच?
आहेस तू absolute?
म्हणतात तसा?