मुक्तक

पूर्वेच्या समुद्रात- ८

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
1 Nov 2015 - 1:25 am
मुक्तकप्रकटन

माझी शायरी

एस.योगी's picture
एस.योगी in जे न देखे रवी...
29 Oct 2015 - 12:06 pm

आजवर वेळोवेळी काही लिहिण्याचा प्रयत्न केलाय.
काही लेखन प्रासंगिक आहे.
काही ठरवून झाले आहे.
तर काही सुचेल तसे मांडलेले आहे.
मिसळपाव च्या अथांग सागरात हे अर्घ्यदान करीत आहे.
आपलाच
एस.योगी.

-------------------------------------------------------------------

मेहफूझ पाता हू खुद को अंधेरो में
उजाला कही मेरा गम उजागर न कर दे ..

-----------------------------------------

टूटते हुए वादे देखकर जीते रहे जिंदगीभर
और वोह है की हर रोज इक नया वादा करते रहे..

-----------------------------------------

कविता माझीमुक्तक

चिमुकल्या कविता...

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जनातलं, मनातलं
28 Oct 2015 - 2:44 pm

मराठीतला सर्वात छोटा, परिचित आणि सर्वाधिक लोकप्रिय काव्यप्रकार म्हणजे चारोळी. चंद्रशेखर गोखले यांच्या चारोळ्यांनी तर एक संपूर्ण पिढी नादावली होती. ते काव्य अर्थात आवडलं होतं. पण त्याहून वेगळ्या काही कविताही आवडल्या आहेत.
प्रविण दवणे यांची बोन्साय ही अशीच एक कविता. म्हटलं तर आवडली, म्हटलं तर अजिबात आवडली नाही. ही कविता पहिल्यांदा वाचली तेव्हा चौकट राजा या चित्रपटातले काही प्रसंग डोळ्यासमोर तरळले होते.

बोन्साय

मुक्तकप्रकटन

माझी शाळा: मोठेपणीचा निबंध!

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जनातलं, मनातलं
21 Oct 2015 - 12:17 pm

काय भुर्रकन गेले ते दिवस! शाळेचे! कळलंसुद्धा नाही!

कॉलेजात जायच्या आणि पुढे काहीतरी बनायच्या ध्येयापुढे आपल्या बालपणाच्या सोनेरी पानाला आपण अगदी सहज, उडत्या पांढर्‍या म्हातारीला तिच्या बीमधून काढून एकेक करून वार्‍यावर भिरकावून द्यावं तसं भूतकाळाच्या अंगणात नेमाने रतीब घालत टाकून आलो. आता ते बालपणाच सोनेरी पान दुरून फक्त पाहता येतं. परत मिळवता येत नाही, इतकंच कशाला, त्याला स्पर्शही करता येत नाही! मुकलो त्याला कायमचंच!

आज मेंदूला ताण देत वर्गातल्यांची नावे आठवावी लागतात. कोण कुठे बसायचं, कोण कस शिकवायचं हे इतरांकडून विचारून खात्री करून घ्यावी लागते!

कथामुक्तकशिक्षणमौजमजाप्रकटनविचारलेखअनुभवमतविरंगुळा

चकती वाचे

निनाद's picture
निनाद in जे न देखे रवी...
20 Oct 2015 - 11:10 am

अनंतवर्ती अनभिसंहित अनमोल माहिती
चकती वाचे अनापरीवर्तक अनालेखित पंक्ती

अनुज्ञापन अनुक्रिया अनुदेशन ही पद्धती
अनुनयी अनुमोदनात अनेकोत्तरी रीती

अन्योन्य धारिता क्षीणनकारी अन्वस्ती
अनेकोत्तरी अन्वस्तीय धागे तरी भीती

अपच्छेद अपरा अनुरूपता असे अवनति
अनुवाद असे अप्रारुपी शोधू तरी किती

अवरक्त विदा अवरोधितात का भिंती
अवश्लेष्मल तरी अवाढव्य असे माहिती

(पैसा ताईंनी आठवण करून दिली... त्यामुळे भोगा आय मिन वाचा! :) )

अनर्थशास्त्रकाहीच्या काही कवितामुक्त कवितामुक्तकमौजमजा

सत्य घटना

आनंद कांबीकर's picture
आनंद कांबीकर in जनातलं, मनातलं
19 Oct 2015 - 6:09 pm

सिंहगड ने पुण्यातुन निघालो.नेहमी प्रमाणे ट्रेन तुडुंब भरलेली. दरवाज्या जवळच्या पैसेज मधे श्वास घेत उभा होतो. समोर एक मुलगा,साधारणता विशितला, स्वताच्याच् बॅग वर बसला होता. खेड्यातला असावा आणि मुंबईला कुठेतरी कामाला असावा. त्याच्या जवळ तळहातात मावनार नाही असा फ़ोन होता. तसा तो काहीखुप महागडा वगैरे नव्हता. म्हणजे चीन च्ं मॉडल असावं.
लोनावला क्रॉस केल्यावर एक विक्रेता आला. त्यामुलाने मोबाइल साठी स्क्रीन गार्ड विकत घेतले. विक्रेता ९० ला वगैरे म्हणतहोता पन घासाघिस करुण त्याने ते ७० ला
घेतले.
आपले अगोदरचे काढून फेकून दिले. नविन मधे ७० ला तिन मिळाले होते.

मुक्तकविनोदसमाजजीवनमान

आवडलेलं काही...

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जनातलं, मनातलं
17 Oct 2015 - 4:59 pm

कविता हा अभिव्यक्तीचा सहजसोपा आणि तितकाच हवाहवासा आविष्कार. मला कविता आवडते. अगदी हायकू, चारोळी, छंदबद्ध आणि मुक्तछंद हे आणि असे सगळेच प्रकार आवडतात.

उर्दू शायरी हा असाच जिव्हाळ्याचा विषय. हायकू तीन ओळींचा, त्याहून कमी, म्हणजे दोनच ओळींमध्ये केवढं सांगता येतं, ते सिद्ध करणाऱ्या अशा असंख्य ओळी भेटत राहिल्या. नकळत मनात रेंगाळत राहिल्या. रचनाकार नाही माहिती, पण या ओळींचा उल्लेख आला की त्या शब्दप्रभूंना मनोमन सलाम केला जातो. अशाच काही ओळी देतेय... वाचकांनी भर घातली तर माझा हा आनंदाचा ठेवा आणखी वाढेल...

सजदे में आज भी झुकते है सर
बस, मौला बदल गया देखो...

मुक्तकविरंगुळा

मळली तर वाळवा

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जे न देखे रवी...
17 Oct 2015 - 2:14 pm

(प्रेरणा : सांगायलाच पाहिजे का ? )

रस्त्यांवरच्या डबक्यांपासून जरा जपून फिर
भिजेल विजार खाशी तुझी, ढळता लक्ष्य जर
जबरदस्तीने उडतात काय, शिंतोडे कधी सांग
तूच आपल्या पाटलुनीला, नीट पोटरीवरी धर
यंदा रस्त्यात हाकू नकोस, बीआरटी लेनमध्ये ने
कामी येई अश्यावेळी, मधला डांबरी थर
सुटच फुल्टू वेगाने तू, बाकी बघू मग
कोण सापडे मामाला आणि, कोण निसटे भुर्र
किती मळणार रे तूझी, ओली विजार आज
मळली तर वाळवणे, हेच तुझे कार्यालयीन काज

अनर्थशास्त्रमुक्तक

शब्द

नीलमोहर's picture
नीलमोहर in जे न देखे रवी...
16 Oct 2015 - 5:44 pm

प्रेरणा: http://www.misalpav.com/node/33189

शब्दांचा पसारा सारा,
शब्दांचाच आसरा,

शब्द भुलवून नेतात,
शब्द झुलवत ठेवतात,

शब्द दिलासा देतात,
शब्द अंतही पाहतात,

शब्द मने तोडतात,
शब्द नाती जोडतात,

शब्द वार करतात,
शब्द घायाळ करतात,

शब्दांच्या जखमा सलतात,
मनात निरंतर उरतात,

जखमा ज्या कधी न भरतात,
जखमा त्या वेदना देत जगतात,

कायमस्वरूपी....

फ्री स्टाइलमुक्तक

असंच काहीतरी

प्यारे१'s picture
प्यारे१ in जनातलं, मनातलं
15 Oct 2015 - 3:11 am

लिहावंसं वाटतं; कधीकधी उगाचच वाटतं.
काय लिहायचं ते नंतर ठरतं.

शिवशिव करतात हात, धडधडते छाती
होईल का नीट सुरुवात, की होईल साऱ्याची माती

लिहीलंय सगळ्यांनी खूप, कशाला हवी आणखी भर
आहे तेच झालंय फार, कशाला हवी पसाऱ्यात भर

शब्द झालेत द्वाड खूप, शब्दांना लागतंय वाटीभर तूप
म्हणतात येऊ बाहेर आम्ही, स्मराल जेव्हा सार्थ रुप

कुठली आम्हां सवड तेवढी, कशाला लागतोय एवढा वेळ
भरभर ठोकू खिळे 'रफट'चे, अहो सगळा तर आहे सोपा खेळ

खेळ खेळता फसतो डाव 'असला' खेळ खेळता फसतो डाव
उरती अक्षरे मृत वाकडे अन् रुततो उरी द्वेषाचा घाव

मुक्तकप्रकटनविचार