मळली तर वाळवा

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जे न देखे रवी...
17 Oct 2015 - 2:14 pm

(प्रेरणा : सांगायलाच पाहिजे का ? )

रस्त्यांवरच्या डबक्यांपासून जरा जपून फिर
भिजेल विजार खाशी तुझी, ढळता लक्ष्य जर
जबरदस्तीने उडतात काय, शिंतोडे कधी सांग
तूच आपल्या पाटलुनीला, नीट पोटरीवरी धर
यंदा रस्त्यात हाकू नकोस, बीआरटी लेनमध्ये ने
कामी येई अश्यावेळी, मधला डांबरी थर
सुटच फुल्टू वेगाने तू, बाकी बघू मग
कोण सापडे मामाला आणि, कोण निसटे भुर्र
किती मळणार रे तूझी, ओली विजार आज
मळली तर वाळवणे, हेच तुझे कार्यालयीन काज

अनर्थशास्त्रमुक्तक

प्रतिक्रिया

मांत्रिक's picture

17 Oct 2015 - 2:18 pm | मांत्रिक

फर्मास!!!

दमामि's picture

17 Oct 2015 - 2:20 pm | दमामि

खिखिखि
हे विडंबन नक्की राहील, आमचं उडालं.:)

पाटीलअमित's picture

17 Oct 2015 - 2:23 pm | पाटीलअमित

tumcha ka udale ?

काय कल्पना नाय बॅा, तुम्हाला कळलं तर कळवा.

अत्रुप्त आत्मा's picture

17 Oct 2015 - 2:35 pm | अत्रुप्त आत्मा

मस्सस्सत!

टवाळ कार्टा's picture

17 Oct 2015 - 9:04 pm | टवाळ कार्टा

खिक्क

नाखु's picture

19 Oct 2015 - 3:36 pm | नाखु

मळक्या पँटवाल्या संघटणेचा सक्रीय (सुक्का) सभासद

उरली तर पळवा या आगामी विडंबनाच्या प्रतिक्षेत!!

-सांगा वर कुठे?