सिंहगड ने पुण्यातुन निघालो.नेहमी प्रमाणे ट्रेन तुडुंब भरलेली. दरवाज्या जवळच्या पैसेज मधे श्वास घेत उभा होतो. समोर एक मुलगा,साधारणता विशितला, स्वताच्याच् बॅग वर बसला होता. खेड्यातला असावा आणि मुंबईला कुठेतरी कामाला असावा. त्याच्या जवळ तळहातात मावनार नाही असा फ़ोन होता. तसा तो काहीखुप महागडा वगैरे नव्हता. म्हणजे चीन च्ं मॉडल असावं.
लोनावला क्रॉस केल्यावर एक विक्रेता आला. त्यामुलाने मोबाइल साठी स्क्रीन गार्ड विकत घेतले. विक्रेता ९० ला वगैरे म्हणतहोता पन घासाघिस करुण त्याने ते ७० ला
घेतले.
आपले अगोदरचे काढून फेकून दिले. नविन मधे ७० ला तिन मिळाले होते.
एक घेतले फ़ोन वर बसवले. थोड़ी हवा आत राहिली म्हणून एका बाजुन उचकटले तर ते चोळा मोळा झाले. तो दरवजात बसलेला असल्यामुळे ते गार्ड ही काढून फेकून देने त्याला सोपे गेले.
मग त्यांने दूसरे स्क्रीन गार्ड काढले. बसवायच्या धांदलित ते हाताला चिकटले. ते ही फेकावे लागले. मग तो थोडा वेळ तसाच बसून राहिला.
त्याची तगमग वाढली. त्याला रहवेना. बॅग ची चैन ओढुन त्यानं शेवटचे स्क्रीन गार्ड ही काढले.
हळू हळू. एकदम काळजी घेत त्यानं ते बसवायला सुरुवात केलि. डोक्यात ७० रुपये होते. डोळे ताठरले. हात थोडा थरथर ला आणि ट्रेन चा थोडा हादरा बसला. स्क्रीनगार्ड अर्धा
मोबाईल वर अन अर्धा बोटावर गुंडळाला गेला. मुलाचा ताल गेला. रागात त्यानं गार्ड चा चोळा मोळा केला अणि फेकून दिला.
मोबाइल खिशात ठेवला आणि दोन्ही हातात छेहरा धरून बाहेरची पळती झाडे पाहू लागला.
प्रतिक्रिया
19 Oct 2015 - 6:15 pm | नाव आडनाव
अरे बापरे ! असं झालं? काय काय होतंय आजकाल. हेच कलियुग. अजून काय.
(आता तुम्ही "धन्य झालो" असा प्रतिसाद देणार ना? :) ) . मी तुमचा प्रतिसाद ओळखला हा पण किस्सा म्हणून लिहा.
19 Oct 2015 - 6:26 pm | आनंद कांबीकर
आज तिसरा दिवस आहे मिपावर. होऊ की हळू हळू हुशार!
तरीपन धन्यवाद चामोह अवरत नाही.
19 Oct 2015 - 6:21 pm | चांदणे संदीप
मोबाईलच फ़ेकून दिला असता तर…. प्रश्नच मिटला असता. असो, खूप हसलो! :)
धन्यवाद!
Sandy
19 Oct 2015 - 7:38 pm | विवेकपटाईत
आवडली, लक्ष्यात ठेवण्या सारखी घटना.
19 Oct 2015 - 7:40 pm | एक सामान्य मानव
बापरे खेड्यातल्या गरीब तरुणावर ओढवलेला हा प्रसंग वाचून अंतकरण हेलावले...
19 Oct 2015 - 8:19 pm | आनंद कांबीकर
मी तर रडलोच
19 Oct 2015 - 8:31 pm | सतिश पाटील
फारच हृदयद्रावक कहाणी...
19 Oct 2015 - 8:43 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
काळ बदलला आहे रे आनंदा.
हे वाचताना चुकून ट्रेनचा गार्ड तर नाही ना असे वाटले.!!
19 Oct 2015 - 10:05 pm | आनंद कांबीकर
ट्रेन चा गार्ड नाही
19 Oct 2015 - 9:04 pm | प्यारे१
मला तर त्यानं वैतागून ट्रेनमधून उड़ी मारली असं काही वाचायला मिळतंय असं वाटलं होतं. नशीब एवढं दु:खद नाही.
पण कार्यकर्ता विश्वास सरपोतदार किंवा धनन्जय माने यांच्या ओळखीतला असणार नक्की!
-70 रुपये
19 Oct 2015 - 9:09 pm | असंका
छान! मस्त! सुरेख!
तुम्ही नवीन वाटत नाही.
धन्यवाद!
19 Oct 2015 - 9:12 pm | असंका
रच्याकने, मुलाचा ताल गेला म्हणजे नक्की काय झालं?
19 Oct 2015 - 10:07 pm | आनंद कांबीकर
संतापुन भान हरपने
19 Oct 2015 - 10:14 pm | चांदणे संदीप
'तोल' वरचा फक्त मात्रा गेला.
(अर्थ जवळपास तोच आहे! ;-) )
19 Oct 2015 - 10:46 pm | आनंद कांबीकर
तोल जाने म्हणजे काहीतरी चुकीचे करने सारखे पणताल जाने म्हणजे तांडव होण्याची शक्यता
19 Oct 2015 - 10:09 pm | आनंद कांबीकर
...संपला तिसरा दिवस
19 Oct 2015 - 11:49 pm | द-बाहुबली
परवा (शुक्रवारी) सकाळी ब्रिज ऑफ स्पाइज बघायला कोथरुड सिटी-प्राइडवर सकाळी ८ ला पोचलो. चित्रपट ९ला होता म्हणून तिकीट खिडकी समोरच्या हिरवळीजवळच्या कट्यावर बसलो. एक जण अजुन येणार होता त्याची वाट बघत कँडीक्रश ओपन केला. अधुन मधुन इकडॅ तिकडे मान वळवुन सभोवतालचा कानोसा घेत होतो. तितक्यात इयत्ता ११वी अथवा बारावीतील एक मुलगी तिच्या शाळा/कॉलेजचा युनीफॉर्ममधे एकटीच तिकीट खिडकीवर आली.
अजुन विक्री सुरु न्हवती म्हणुन मी मान पुन्हा मोबाइलमधे खुपसली. सावली कोणाची जवळ आली म्हणून समोर बघतो तो ती मुलगी अगदी दोन फुटावर उभी... नाइटआउट मुळे जाणवणारा जडपणा डॉळ्यात व मनात ताजा असल्याने ति असे समोर येण्याचा मला जरा धक्का बसला त्यातुन सावरायच्या आत संवाद सुरु झालेला होता.
ती:- एक्स्युज मी फोर्टी रुपीज आहेत का ? मला तिकीटाला कमी पडत आहेत...
मी स्वगत:- काय ? नक्कि काय ऐकलं मी ? ही पैसे मागतेय ? मला ? का ? ही मला ओळखते की मी हिला ओळखतो ?
एव्हाना माझ्या डोळ्यात जडपणासोबत नक्किच बावळटपणाची झाक उतरली असावी.
मी धक्यातुन सावरायचा प्रय्त्न करत आवसान गोळ करत :- काही बोलायचा प्रयत्न करणार इतक्यात...
ती हलकेसे स्मित करतः- मी नेक्स्ट टाइम भेट झाली की परत करेन
मी स्वगत:- मी हे काय ऐकतोय ? कोण ही ? डोळ्यात कसाबसा करारीपणा आणत मी काही बोलणार इतक्यात..
ती बिधास्तपणे:- म्हणजे इथे अथवा तुम्ही म्हणाल तिथे मी परत देइन.
आता मी चक्क हादरलो, वाढतं वय अथवा डोळ्यांवरील झापड याला कारणीभुत असावी अन्यथा प्रसंगावधान राखायला इतका वेळ शक्यतो घेत नाही.
मी कडक सुरातः- व्हाय शुड आय गिव यु ? वेर आर योर पॅरेंट्स ? व्हाय डोंट यु आस्क देम फॉर मनी ?
ती:- आज आइ-बाबा दोघेही गावाला गेलेत अन मी एकटीच आलि आहे सोबत फ्रेंड्सही नाहीयेत, म्हणून...
मी :- व्हाय शुड आय गिव यु ? (मनात ना तु भिकारी आहेस ना फ्रेंड ना नातेवाइक... मग मी पैसे का द्यावेत )
ती:- जरा दोन तिन क्षण शांत गेल्यावर इट्स ओके इफ यु कॅन नॉट गिव ऑर डु नॉट... तिचे वाक्य तोडत मी विचारले ?
मी:- विच मुवी ?
ती:- तो साडेआठला आहे तो..
मी:- क्रिमसन पिक ?
ती:- हो. नाही नाही तलवार.
मी:- ठीक आहे. तिकीट काढायच्यावेळी कमी पडले तर बोल, मी तिथेच पैसे देइन. आता आधी खिडकी सुरु होउदे.(मनातल्या मनात हीने क्लास बंक केलाय पिच्चरसाठी, जे आपणही करत होतो अन अनेकदा त्यासाठी पैसे मित्रांकडुन उसनेही घेतले आहेत त्यामुळे पैसे न देउन हिच्या आनंदावर विर्जण टाकायला नको, शांतपणे ओळख करुन घेउ अन सरळ घरी पालकांना भेट देउन त्यांच्या कानावर हा प्रसंग शांतपणे घालु)
ती हलकसं स्मित अन थँक्यु म्हणून समोरच्या जिन्यापाशी जाउन बसली. चार पाच मिनीटाने काय झाले तिलाच ठाउक.. तिने आवाज दिला एक्स्युज मी मला फोर्टी रुपीज मिळाले आहेत तुम्ही देउ नका थँक्यु. जरा वेळ गेला माझा एक सहकारी तिथे ठरल्या वेळेला आला अन आम्ही तिकीट काढायला रांगेत उभे राहीलो पण त्यामुलीने मात्र तिकीट न काढता मल्टीप्लेक्सच्या बाहेर पाउल ठेवल्याचे दिसले...
20 Oct 2015 - 8:42 am | असंका
चांगलंय....
(ठरवून बोअर करणं तेवढं पण सोपं नाही तर!!)
20 Oct 2015 - 9:00 am | आनंद कांबीकर
..वाचले ४० रुपये
20 Oct 2015 - 1:49 pm | द-बाहुबली
माहित नाही...
कारण ती मुलगी ज्या हायस्कुलचा गणवेश घालुन तिथे आली होती ते बघता तिच्याकडे ४० रुपये नसावेत हे पटणे अवघड होते. पण.. परिस्थीतीचा विचार करता.. शक्य आहे या जगात काहीही घडणे शक्य आहे
१) मल्टीप्लेक्समधे मुली कधीच एकट्या येत नसतात या माझ्या सिध्दांताला तिने छेद दिला... मुलगी/स्त्री मॉल्मल्टीप्लेक्समधे एकटी दिसली की समजुन जायचे तिचा बॉयफ्रेंड (व काही तुरळक प्रसंगी मैत्रीणींचा ग्रुप) आसपासच कुठेतरी आहे. एकटी मुलगी दाखवा अन रु. १ लाख बक्षीस मिळवा ;) (अन्यथा त्या मुलीला चित्रपटांचे हाताबाहेर अॅडीक्शन आहे ज्यावरुन तिच्या घरात वाद नक्किच होत असावेत.)
२) ट्रुथ अन डेअरचा खेळ चालु आहे अन त्यांचा कंपु नक्किच आजुबाजुला उभा राहुन आपली गंमत बघत आहे.
परीणामी तिला चित्रपटांचे वेड आहे हा निष्कर्श काढला...
टाइम टेबल बघितले तेंव्हा माहित होते ८.३० ला कोनताही चित्रपट तिथे न्हवता. तलवार १० वाजता होता. तो मागच्या आठवड्यात ८.३० नक्किच होता कारण मी त्याच वेळी बघीतला होता पण या आठवड्यात तलवारचे सर्व शो १० व नंतरचे होते. ८.३० च्या चित्रपटाचे तिकीट ७०- ते ९० असते तर १०.३० च्या त्याच चित्रपटाच्या तिकीटात किमान रुपये ४० ने नक्किच वाढ केलेली असते. हे बघता ती जुन्या वेळापत्रकानुसार बजेट ठेउन आली असल्यास रुपये ४० कमी पडने योग्यच आहे. काय योग्य नाही तर मनोरंजनासारख्या क्षुल्लक कारणासाठी तिर्हाइतासमोर असे हात पसरणे...! त्यात तुम्ही म्हणाल तिथे येउन मी परत करेन असे म्हणून तिने मला सपशेल घाबरवले. मग त्याचे कारण काहीही असो. दॅट वाज समवाट अ प्रो स्टेटमेंट .
म्हणून रु चाळीस वाचण्यापेक्षा त्यामुलीच्या पालकांच्या कानी ही गोष्ट जाण्याचे टळले हे मला जास्त चुक वाटते.
20 Oct 2015 - 2:18 pm | असंका
आता जमलं. फारच बोअर झालं.
:(
20 Oct 2015 - 2:30 pm | द-बाहुबली
रोचक प्रतिसाद.
(ठरवून टुकार प्रतिसाद लिहणं तेवढं पण सोपं नाही तर!!)
20 Oct 2015 - 2:58 pm | असंका
:-))
4 Nov 2015 - 12:21 am | निओ
:))
1 Nov 2015 - 8:33 am | आनंद कांबीकर
...किंवा ८.३० ला मूवी नाही हे उशिरा ध्यानात आले असावे.
19 Oct 2015 - 11:57 pm | टवाळ कार्टा
पातेल्याचा पुनर्जन्म???
4 Nov 2015 - 2:55 am | सागरकदम
कोण कोण ?
19 Oct 2015 - 11:58 pm | दिवाकर कुलकर्णी
असला कसला म्हणायचा ह्यो फोन,
एकबी गार्ड बसंत नाही,
खर म्हणजे चायनाचा फोन हुता तर फोनच फेकून
देयाचा,गार्ड सलामत तो फोन पचास
20 Oct 2015 - 9:07 am | उगा काहितरीच
तुम्ही मदत करायची की त्याला . ;-)
20 Oct 2015 - 10:43 am | आनंद कांबीकर
...साधे पुस्तकाला कव्हर बस्अवता येत नाहि अम्हाला, स्क्रिन्अगार्द काय बस्वनार.
20 Oct 2015 - 9:51 am | नाखु
(ग) धड्या खालील सारांश (आपण काय शिकलो या धर्तीवर):
धावत्या ट्रेन मध्ये गार्ड लावू नये (वेळप्रसंगी साखळी ओढून गाडी थांबवावी) आणि निवांत गार्ड लावावे.
विक्रेता जरी देशी असला तरी माल चायनीज असू शकतो.
खालील गाण्यातील झाडे पहा आणि तुम्ही चार-दोन प्रसंग आठवून चवर्ण करा
आगीन गाडी
20 Oct 2015 - 1:58 pm | टवाळ कार्टा
अश्लिल
20 Oct 2015 - 2:15 pm | नाव आडनाव
चूक. त्यांनी "क्रिकेट" असा शब्द लिहिला पण नाहीय. त्यामुळे प्रतिसाद अश्लिल नाही.
20 Oct 2015 - 2:17 pm | द-बाहुबली
गार्ड हा शब्द लिहलायं ना ? मग झालं तर.
20 Oct 2015 - 4:08 pm | टवाळ कार्टा
अज्जुन सोज्ज्व्ळ(च) र्हैलास रे =))
20 Oct 2015 - 10:07 am | अत्रे
मुक्तपीठ मटेरियल!
20 Oct 2015 - 1:31 pm | तर्राट जोकर
काय लोकंहो. एक प्रामाणिक कथा नीटपणे लिहिली तर लगेच टर्र उडवाया लागले बॉ. म्हटलं तर किती गहन अर्थ आहे ह्या घटनाचक्रामधे. भारतीय जनजीवनाचे चित्रण सुरेख केले आहे. मला तर आवडली बुवा. छानसं रसग्रहण लिहिता येईल.
20 Oct 2015 - 1:52 pm | द-बाहुबली
मला तर नेमाडेंचा भास झाला लेखनशैलीमधे. धागालेखकाने समाजजिवनाचे अतिशय तर्ल प्रतिबींबाचे प्रदर्शन या धाग्यात मांडले आहे.
20 Oct 2015 - 8:11 pm | आनंद कांबीकर
...