शोध

मयुरMK's picture
मयुरMK in जे न देखे रवी...
21 Nov 2015 - 11:21 am

शुभ्र उमदा मी एक अश्व
करीत पादाक्रांत हे विश्व
करावयाचा आहे शोध
घ्यावयाचा आहे बोध
.....................मृत्यूचा!
बाळगुन मनाशी जिद्द
चपल तनुत एक उमेद
नजरेत एकाच ध्येय
धावणार मी असाच आहे
......................सुसाट!
माझिया जन्मानेच मला
जीवन्मंत्र आहे दिला
येणार ना मरण तुला
.....................कधीही
पण,मनी ती एक आस
भेटावयाचे मरणास
संपणार कधी हा प्रवास
एकचि ध्यास तो खास
....................अंतरात
आणि अशाच एका दिनी
यश प्राप्तिले प्रयत्नानी
पाहिले मरणाचे रूप
ते तर होते प्रतिरूप
....................जन्माचे!
मृत्युस त्या भेटता तत्क्षणी
टोल माझा खोल जाऊनी
भावना,वेदना लोपल्या
नव्हत्याच आत्ता कोठल्या
........................जाणिवा!
परतून पुन्हा होतो जन्मत
तोच मी,आत्माही तोच
बदलली केवळ काया
नव्या रुपात आता कराया
...........................मार्गक्रमण!
फ़क्त गाडी ती बदलीत
या गाडीतून त्या गाडित
पुन्हा एकदा तोच प्रवास
तोच मार्ग शोधण्याचा
........................मृत्युस.

मुक्त कवितामुक्तक

प्रतिक्रिया

मांत्रिक's picture

21 Nov 2015 - 11:49 am | मांत्रिक

आवडली. थोड्या टाईपिंगच्या चुका झाल्या आहेत. त्या टाळता आले तर बरे.
बाकी नवीन आहात का? स्वागत!

मयुरMK's picture

21 Nov 2015 - 12:00 pm | मयुरMK

मी नवीनच आहे इथे आणि ह्या क्षेत्रात सुद्धा आणि लहान पण आहे मार्गदर्शन करा :)

रातराणी's picture

21 Nov 2015 - 1:28 pm | रातराणी

आवडली कविता.

शिव कन्या's picture

21 Nov 2015 - 2:22 pm | शिव कन्या

छान लिहीलंय.
सहाव्या कडव्यातील दुसरी ओळ ????
तोल म्हणायचंय का?
मांत्रिक भौं शी सहमत.

मयुरMK's picture

21 Nov 2015 - 8:24 pm | मयुरMK

प्रतिसादा बद्दल धन्यवाद

पद्मावति's picture

21 Nov 2015 - 10:13 pm | पद्मावति

खूप छान जमलीय कविता. आवडली.

एक एकटा एकटाच's picture

22 Nov 2015 - 12:25 am | एक एकटा एकटाच

चांगलीय

मयुरMK's picture

22 Nov 2015 - 9:47 am | मयुरMK

सर्वाना प्रतिसादाबद्दल आणि चुक सुधार्ल्याबद्दल धन्यवाद . शुभ प्रभात

जव्हेरगंज's picture

22 Nov 2015 - 9:53 am | जव्हेरगंज

.....................मृत्यूचा!
......................सुसाट!
.....................कधीही
.
.
यातही यमक जुळवले असते तर अजुन क्लास झाले असते!!!!

मयुरMK's picture

22 Nov 2015 - 10:06 am | मयुरMK

सुधारित आवृत्ति टाकेन.

चांदणे संदीप's picture

22 Nov 2015 - 10:33 am | चांदणे संदीप

त्यापेक्षा नवीन विषय, भाव असलेली कविता लिहायला घ्या आणि त्यात मात्रीकभाऊंनी केलेली सूचना प्रत्यक्षात आणायचा प्रयत्न करा.

मयुरMK's picture

22 Nov 2015 - 10:42 am | मयुरMK

आत्ताच एक टाकली आहे पहा माझ्या वडीलानी केली आहे .

चांदणे संदीप's picture

23 Nov 2015 - 3:18 pm | चांदणे संदीप

वोक्के सर!