मनाचा एकांत - चिमण्या
डाव्या हाताच्या मुठी एवढ्या चिमण्या
हा हा करतात
या जीवघेण्या ओसाडीत....
कुठे दाणे टिपत असतील?
कुठे पाणी शोधत असतील?
घरटे कुठल्या आडोशाला असेल?
यांच्यात यांचे दफन कसे करत असतील?
कोण करत असेल?
चिमण्या निमित्त असतात............
आपल्याच छाटलेल्या मनाचे
हे तासनतास भिरभिरणे असते.....
.
.
.
दुसरं काय असतो
एकांत म्हणजे तरी!
---- शिवकन्या