उन जळत रणरणे, मृग़जळास लांबवी
सकल जनही त्रस्त ते, दु:ख दाटले मनी
जीव कसा तगमगे, जन गृहात कुंठती
वाटसरू कुणी नसे, वाट उरे एकली
ग्रीष्माने त्रासून हा, आसमंत पेटवी
सूर्यही बघ जळतसे, सागरास आटवी
अवेळ हीच साधूनी, आस तुझी का गमे?
तृष्णा ही मज गिळे, कंठ तुझा शुष्कवी
भेटीलाच माझिया, सांग कोण परी निघे?
ग्रीष्माला वारूनिया, कोण सखी अवतरे?
प्रतिक्रिया
26 Aug 2016 - 12:14 pm | पैसा
सुरेख! कविता खूप आवडली.
26 Aug 2016 - 12:20 pm | बाजीप्रभू
छान आहे कविता,
थोडी अगोदर (मे महिन्यात) आली असती तर समयोचित झाली असती.
27 Aug 2016 - 12:23 pm | क्षमस्व
छान।
1 Sep 2016 - 11:28 am | ज्योति अळवणी
सुंदर कविता.... आवडली