रियल रियल
बरे झाले मीराबिरा, राधागिधा तेव्हाच होऊन गेल्या....
मिनिटाला मेसेज, तासाला कॉल, हाऊ आर यूच्या
लिक़्विड जमान्यात
प्रेमबिम, हळवेबिळवे, मनात संगत
ओहो....ते काय असते आणि?
आठवण बिठवण वेड्यांचा बाजार...
एक कॉल मारायचा
नाहीतर मेसेज धाडायचा
बात करनेका मामला खतम.
मनात आठवण, झुरणे बिरणे
अरेरे, हाताबाहेरच्या केसेस...
डिजीटल डिजीटल फिजिकल फिजिकल
एवढेच काय ते रियल रियल
बाकी जग तो मृगजल मृगजल...