(उष:काल)

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
12 May 2019 - 10:56 am

पेरणा अर्थात

हळू हळू एकेक करत
उलगडत चालले आहे...

ज्याच्याकडे पहात पहात
आम्ही आमचे मार्ग शोधायचो
तो तारा आता कितीतरी
मागे पडला आहे
आणि तो एकुलता एक चंद्रही...
ज्याची स्वप्नं दाखवत दाखवत
आईने दुधभात भरवला

दररोज नव्याने प्रकाशमान होणार्‍या सत्याला मी
तर्काच्या कसोटीवर जोखत राहतो
आणि मनातल्या मनात विचार करत रहातो
उद्या कोणती नवी जाणीव उलगडेल !

आज सकाळी डोळे उघडले
तर ते समोरचे हिरवेकंच झाड
मोहराने गच्च बहरले होते
त्याचा मंद सुवास आसमंत दरवळत होता
आता लवकरच ते मधुर फळांनी लगडलेले असेल

या विश्वाच्या पासार्‍यातली एकेक रहस्य
हळूहळू उलगडत चालली आहेत
अलगद, हळुवार, पण अतिशय स्पष्ट पणे

जो मुलगा समोरच्या मैदानात मनसोक्त हुंदडायचा
त्याने आज हिमालयाचे एक उत्तुंग शिखर सर केले ,
त्या मुलाचे डोळे आता हिमालयाच्या
पलिकडचे क्षितीज शोधत आहेत....

जुन्या गोष्टी वेगळे रुप घेउन
नव्याने समोर येणे ही आजकाल
जणू नित्याची गोष्ट झालीय...

अंतिमसत्या पर्यंत पोचण्याची
उत्सुकता आता प्रचंड वाढली आहे ,

काही काळा पूर्वी अनंत वाटणारे हे विश्र्व
ज्याचा अवाका अमर्याद होता,
आज जाणवले की ते माझ्यातच सामावले आहे
आता नवा दरवाजा उघडेल माझ्यासाठी
हा उष:काल...

मला खात्री वाटते
की लवकरच मला उलगडेल,
या विश्र्वाचे रहस्य
आणि मग सज्ज होईन मी ...
अजून एका नव्या शोधासाठी

पैजारबुवा,

आरोग्यदायी पाककृतीकाणकोणकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडबालगीतऔषधोपचारकृष्णमुर्ती

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

12 May 2019 - 11:10 am | यशोधरा

सुडंबन सुरेख जमले आहे.

नाखु's picture

12 May 2019 - 12:10 pm | नाखु

लागले नेत्र पैलतिरी

पै बुवांच्या आत एक कवीसुद्धा दडला आहे हे जाणून असलेल्या मंडळाचा सभासद नाखु

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 May 2019 - 12:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर !

जालिम लोशन's picture

12 May 2019 - 1:46 pm | जालिम लोशन

ह्याला म्हणतात positive attitude.

चांदणे संदीप's picture

13 May 2019 - 8:18 am | चांदणे संदीप

सकारात्मक गोष्टी आवडतात. ही कविताही अतिशय आवडली.
प्रत्येक ओळीगणिक एक वीट रचली जाऊन शेवटी स्वयंप्रेरणेचा, मार्गदर्शक दीपस्तंभ बांधला गेला.

पैजारबुवा दंडवत. ____/\____

Sandy

नि३सोलपुरकर's picture

13 May 2019 - 12:01 pm | नि३सोलपुरकर

पैजारबुवा ____/\____.

सकारात्मक कविता आवडली